वसे त्र्यंबक - शिखरी ।

वसे त्र्यंबक - शिखरी । त्र्यंबकेश राज्य करी ॥
ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर । गोदावरीचे माहेर  ॥
तिथोनिया प्रगटली । विश्वव्यापके वंदली ॥
तुकड्यादास धन्य झाला ।  नाथ निवृत्ती भेटला ॥