रेड्यामुखी वेद बोले ।

रेड्यामुखी वेद बोले । ऐसे संती वाखाणिले ॥
ऐसा ज्याचा अधिकार। सखा तो हा  ज्ञानेश्वर ॥
वाचे चालविली भिंत । केला चांगा गर्वहत ॥
तुकड्या म्हणे वानू काय? I भक्ता दाविला उपाय ॥