अखंड चालविली वारी।

अखंड चालविली वारी। वैष्णवांचे सहाकारी ॥
ज्ञानेश्वर भक्तराज । राजाधिराज महाराज ॥
त्याची कोण जाणे कळा ?। तो हा चैतन्य-पुतळा ॥
तुकड्या म्हणे शरण आलो। संतापायी लीन झालो ॥