वैष्णवांचे जे भूषण ।

वैष्णवांचे जे भूषण । तो हा  ज्ञानेश्वर जाण ॥
मंदावला भागवत । दिला उठावया हात  ॥
केले बहुतांचे खंडण । योगयागांचे भांडण ॥
तुकड्यादास म्हणे ज्ञान । ज्ञानदेवे दिले पूर्ण  ॥