गीता-वर्म ज्ञानेश्वरी ।

गीता-वर्म ज्ञानेश्वरी । दुजा नाही ऐसी थोरी ॥
बहू करितील अर्थ । परी राहील अनर्थ ॥
देवादिकांचा जो अंत । पार पावताति संत ॥
तुकड्या म्हणे वाचा । वाचताचि खुंटे वाचा ॥