ज्ञाने ज्ञानी केले सर्व ।

ज्ञाने ज्ञानी केले सर्व । निरसोनी देहभाव ॥
बोधे लाविली समाधी । ऐक्य केली भेदसंधी ॥
जना दाखविला देव । नाही माया दुजा-भाव ।॥
तुकड्या म्हणे दोन खोटे । एक दाविले गोमटे ॥