स्वामी रामदास झाले सावधान
स्वामी रामदास झाले सावधान । होता अक्षवाण लम्नघटी ॥
उठोनिया गेले पंचवटी माजी । केला राम राजी भक्ति-बळे ॥
चालविली सेवा जगा उद्धराया । वीर-वृत्ति व्हाया समाजाची ॥
तुकड्यादास म्हणे स्थापिले हनुमान । देउळे करोन गावोगावी ॥