स्वतः आचरोनी आचरवी लोका ।
स्वतः आचरोनी आचरवी लोका । रामदास सखा स्वामि माझा ॥
सूर्य-नमस्कारा वाढविले लोकी । मनाचिये श्लोकी जागविले ॥
दासबोधी बहू वर्णियेले ज्ञान । व्हाया सावधान जन लोक ॥
तुकड्यादास म्हणे चालविला पंथ । रामदासी मत पुण्यश्लोकी ॥