तुकड्यादास
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
अखंड व्यापक आत्मा परिपूर्ण
अखंड व्यापक आत्मा परिपूर्ण । तेथे रूपवर्ण दुराविती ॥
भेदाभेद दोन्ही जाती हरपोनी । अद्वय निशाणी एकरस ।।
अचल अमर अविनाश ज्योति । जरा नाही रिती वेळा त्यासी ॥
तुकड्यादास म्हणे माझा मीच झालो। गुरु-कृपे धालो याच मार्गी।।