गळ्याचाहि गळा जीवाचा जिव्हाळा


 गळ्याचाहि गळा जीवाचा जिव्हाळा। डोळियाचा डोळा पांडुरंग ॥
लेणे लेववी जो लेणिया वाचोनी । भूषवी भूषणी स्वानंदाच्या ॥
दीप्त करी सुख दुःखाचिये अंगी । रंगवी या रंगी अहोरात्र  ॥
तुकड्यादास म्हणे माझा जीवभाव । सर्वस्वी हा देव निश्चयाने ॥