आमुचिया पाशी सर्वा आहे पास

 आमुचिया पाशी सर्वां आहे पास । कोणीही आम्हास बोध सांगे ।।
वीट नये जरा ऐकाया गान्हाणी। चित्त नाही क्षणी त्यांच्या बोला ।।
आमुचिया काजा वेळ ना सापडे । ऐकाया पोवाडे वेळ कैचा? ॥
तुकड्यादास म्हणे आपुलाले दुःख । सांगताति लोक ऐके देव ॥