चोर भिती आम्हालागी

चोर भिती आम्हालागी ।भिकारी हा काही मागी? ॥
दूर पळती बिचारे । आम्हा नाही त्यांचे वारे ।।
केण पुसे खाटखुटा?। केण येतो काट्यावाटा? ॥
तुकड्या दासपणे राहे । पक्षा-सम जिणे जाय ॥