लाज वाटे कोणा सांगतांना मुखी


 लाज वाटे कोणा सांगतांना मुखी। आपुलीच शेखी काय वानू? ॥
आम्ही अपराध असतील केले । नसले ते झाले आमुच्याने ॥
लागता ठोकरा जागे होती लोक। कोणा चुके भोग प्रारब्धाचा? ॥
तुकड्यादास म्हणे परि राहवेना । सांगावेसे मना वाटे लोकी ॥