होते सेवा काही करावी या देही

 होते सेवा काही करावी या देही । अर्पुनिया पायी स्थीर व्हावे ।॥
येर नाही चित्ती वासना दुसरी । साक्ष आहे हरी-पाय आम्हा ॥
पूर्वजांनी केली वारी पंढरीची । पावले मृत्यूसी त्याचि स्थळी ॥
तुकड्यादास म्हणे आम्ही त्याच मार्गीमरणी माता संगे हेचि करी ॥