राष्ट्रपित्याची अमर भावना पूर्ण कराया चला
( चाल : हटातटाने पटा रंगवूनि ... )
राष्ट्रपित्याची अमर भावना पूर्ण कराया चला I
चला रे ! सगळे मिळुनी चला ॥धृ0॥
देश जाहता स्वतंत्र आता देशासाठी तुम्ही
तुम्हात्मा नाहि कशाची कमी ।
हे अपुले ते दुसरे म्हणूनी जिभा विटाळू नका
पहा राव नी रंक सारिखा ।
वीर शिपायी बना लडा जारि संकट आले कुणी
देश हा होऊ न ह्यावा ऋणी ।
( अंतरा ) ही प्रचंड शक्ती युक्ती घ्या पाठीशीं ।
सत्यास नम्र व्हा परि न नमा शुत्रुसी ।
येउ द्या मरण जरि आले या भूमिशी ।
सावधान व्हा करा तयारी सोडुनिया गलबला
चलारे सगळे मिळुनी चला ॥१॥
पहा - पहा हे चारि बाजुनी ऐकुं येते कसे
जीव हा उडू - उडू बघतसे ।
द्वेष कुणाशी नाश कुणाचा चोर कुणाच्या घरी ?
वाहवा ! न्याय घरीच्या घरी !!
ऐकायला कर्ण नको अणि नेत्र बघाया नको
जीव हा वैभव घ्यावा नको ।
( अंतरा ) ही जबाबदारी आली तरूणांवरी ।
भारता रक्षिण्या व्हा सगळे सामुरी ।
अन्याय करु नका पाहू नका यापरी ।
तुकड्यादास म्हणे यासाठिच देह प्रभूने दिला
चला रे ! सगळे मिळुनी चला ॥२ ॥