आरती आडकुजी स्वामी !

आरती
(चाल : आरती अंजनि तनयाची...)
आरती आडकुजी स्वामी ! सुमंगल स्मरतचि गुणनामी ॥धृ०॥
धन्य तव लिला वर्णवेना ! अल्पमति करितो दिन स्मरणा ॥
भक्तकल्पद्रम गुण - धरणा ! स्मरत निज काम क्रोध हरणा ॥
(चाल) नम्र राहिल तव गुण गाया ।
करिशी भव तरण ! जनन हरि मरण ! दाउनी चरण ।
भ्रमण करावी आत्मारामी ॥ सुमंगल 0 ॥१॥
स्वरुप वर्णवे न निगमाला ! मार्ग दावाया अवतरला ॥
भक्त निज करावया धाला ! कसारा. - गृही प्रगट झाला ॥
(चाल) करुनिया नरतन निजधाम ।
प्रवासा सोड ! बघुनि धरि गोड ! गांव वरखेड ।
बेडि तोडोनि रमे प्रेमी ॥ सुमंगल0 ॥२॥
संशय - रहित वृत्ति धरुनी ! स्थीर जाहले गुणा हरुनी ॥
विसर पाडिला सु - रसवदनी ! नेत्र निज वैराग्ये - सदनी (चाल) शोभती कुरळ केश माथा ।
अजानू मूर्ति ! पद्म पदि धरिती दीना दे स्फूर्ति ।
कीर्ति गाताचि येइ कामी ॥ सुमंगल 0 ॥३॥
धन्य वरखेड भाग्यवासी ! प्रगटले जिथे अविनाशी ॥
सुखी जाहले बहू त्रासी ! समाधी डुले सहज जैसी ॥
(चाल) चढवुनी अलक्ष मुद्रेला ।
दास तुकड्यास ! नेई चरणास ! लावि तव आस ।
भास मज होई श्रीराम ॥ सुमंगल 0॥४॥