स्वागत करु सगळ्या विद्वजन सुजनांचे

             स्वागत गित
स्वागत करु सगळ्या विद्वजन सुजनांचे ।
विशाल हृदये थोर गुणांचे ॥धृ0॥
अपुल्या गोड रवे जीवन उज्वल व्हाया ।
अनपढ लोकांना कार्यक्षम बनवाया ॥
देशाधर्माच्या अभिमाना स्फुरवाया I
अपुल्या साहित्य भरतिल भाव जनाचे ॥ १॥
विद्या - विनयाने अनुभवुनी सांगाया I
सत्ता आणि प्रियता सेवेने चमकाया ॥
जाती पक्ष मते विसरुनि कार्य कराया ।
देतिल प्रिय वचने स्फुरण्या प्रेम मनाचे ॥२॥
जनता द्विगुणित ही उत्साही होवोनी ।
बघते सर्वांना आदर - पूर्वक नयनी ॥
नंदनवन सगळी खेडी होतिल म्हणुनी ।
जमले मित्रगडी सुख बघण्या समतेचे ॥३॥