कुणाचा धाक बाळगुनी, आपुला धर्म त्जयता का ?
कुणाचा धाक बाळगुनी, आपुला धर्म त्यजता का ?।
नीति ही सोडुनी सारी, प्राण परक्यासी विकता का? ।।धू०।।
आठवा बाळ अज्ञानी, गुरू गोविंदसिंहाचे ।
पुरवि भिंतीमधी त्यांना, न सोडी धर्म तरि ते का ? ।।१।।
सोडता धर्म जरी संभा, न उंचचि राहती डोकी ।
मर्द हा मरती गळ-फासे, न दुसऱ्यासी म्हणे काका ।।२।।
धर्म तो शिकवितो सकळा, अमर हा अंतरी आत्मा |
मराया का भिता ऐसे? ना तरी देह राहिल का? |।३॥।
बाळगा धाक देवाचा, जरी पापे करी कोणी |
आपुल्या सुखस्वातंत्र्या, म्हणे तुकड्या विसरता का? ।।४॥।