ज्ञानामृत अंजन त्या नेत्री, नाशे पडळचि मोहाचे

ज्ञानामृत अंजन त्या नेत्री, नाशे पडळचि मोहाचे ।
षडविकार॒ अंतरिचे नासुनि, प्रेम मिळे परमार्थाचे ।।१।|
गुरु-वचनी विश्‍वास धरुनी, किति तरले, तरती जगती |
देव-क्रषी गुरुच्याचि प्रसादे, भव तरले निर्भयी साचे ।।२॥|
तूकड्यादास म्हणे गुरुज्ञाने, प्रभूचे रुप हृदयीच मिळे ।
जळेल तम-अज्ञान मतीचे, मन॒ रंगी हरिच्या नाचे ।1३॥|