झणि आला हा घनश्याम, गमे हा भास जिवा
झणि आला हा घनश्याम, गमे हा भास जिवा।॥धृू०||
झुणु झुणु वाजति भूवरी पर्ण, कोकिळ गाती हर्षभराने ।
मयुर नाचती अति प्रेमाने, मन घेइल हे विश्राम।। गमे हा० ।।१॥|
नीलवर्ण आकाशी उठला, वाटे हरि गरुडावरि आला ।
झू झूं ध्वनि कर्णी आदळला, वाटली बसिची तान ।। गमे हा० ।।२॥|
किरण मंद ॒पिंगटसे उठले, मंद मंद वायू हा चाले ।
झिलमिल पाणी सुरु जाहले,झाले इंद्रिय एकतान।। गमे हा० ।।३॥।
गर्द तस्ववर हलती सगळे, ऐकति पशु काननिचे चाळे ।
तुकड्यादास म्हणे गोपाळे, उरि भेटतसे बेफाम।। गमे हा० 1४ |