सुख दिसले डोळियाने, सांगो मी त्या खुणा
सुख दिसले डोळियाने, सांगो मी त्या खुणा ।
मज वाटे सुख नाही, हरि-भक्तीच्या विना ||धू० ।।
जरि द्रव्या साचवीले, परि चिंता पावते ।
भीतीने पाठि-पोटी, नच शांती लाभते ।।1॥।
जरि घरचे भाग्य लाभे, स्त्री-सुखही मोहके ।
तरि मृत्यूच्या भयाने, दु:ख होते दाहके।।२॥।।
जरि ख्री-धन दोन्हि लाभे,सोख्याच्या वाटणी ।
परि पुत्र ना तयासी, झुरती त्यावाचुनी ।।३॥।
जगतीची वेभवे ही, लंगडी बा ! नाशती ।
तुकड्याची हाक घ्या ही,प्रभु-स्मरणी द्या मती ।।४ ।।