येशिल ना शेवटी तू, गुरुराया ! धावुनी

येशिल ना शेवटी तू, गुरुराया ! धावुनी ।
जव नेती ओढुनीया, मम प्राणा काढुनी ॥|धृ०।॥।
मरण्याचे संकटाला, नच कोणी आपुले ।
देशिल ना साथ ते तू, शिरि धरुनी कर भले ।।१॥।
जन म्हणती- लवकरी या, काढाना आतुनी ।
मग रचती ना चिता या, देहासी निजवुनी।।२॥।
कुणि म्हणती- ठिक झाले, काळाने ओढला ।
म्हणशिल ना - मीच नेला, माझा हा तान्हुला ।।३॥।
तुकड्याची प्रेम- भक्ती, भोळी चहुबाजुंनी ।
परि अंती ध्यान लागो, गुरु स्मरणी रंगुनी ।।४॥।