रमशील ना हरी ! तू, भक्तिच्या सुमंदिरी

रमशील ना हरी ! तू, भक्तिच्या सुमंदिरी।
तुज कमल-दली, नेत्रांजलि, न्हाणि अंतरी ॥|धृ०।।
ही भाव-भक्तिची सुमने, माळ वाहि मी ।
बहु सत्वशील वृत्ती तुझ्या, पाऊली धरी ।।१॥।
पद्‌-पूजना करूनि, दीप सोहं जाळुनी।
तुज वरुनि फिरविताच मी-तू भाव हा हरी ।।२।।
हे उरु न देइ देह-धर्म, आपुलेपणा।
तुकड्याचि हाक घे सख्या! ही, आस कर पुरी ।।३॥