गुरु येउनी मज भेटला, नि भक्ति कर म्हणे
गुरु येउनी मज भेटला, नि भक्ति कर म्हणे ।
विसरुच नको श्रीहरी, अति प्रेम धर म्हणे |।धृ०।।
अति लीन वाग लोकि या, परलोक साधण्या ।
जे दृष्ट लोक त्यांची, संगतीच हर म्हणे।।१॥।।
नच एक क्षणही खोवी, निंदनी कुणाचिया।
मन शुध्द करी, द्रोह-कपट सर्व हर म्हणे।।२॥।
दिसताति सर्व जीव, प्रेम भरुनि पाहि त्या।
प्रभुची सखा जनी-वनी हा, भाव धर म्हणे ।।३॥।
नीती नि न्याय ठेवुनी, संसारि वाग त् ।
तुकड्यास सदा सत्यप्राप्ति, हाचि वर म्हणे ।।४ |