कुणि येउनि मज वेड तुझे, लाविले हरी
कुणि येउनि मज वेड तुझे, लाविले हरी!
नव्हतीच अशी मोहनी, तुझी मनावरी ।।धृ०।।
काम-धाम नाठवते, मार्गि चालता।
पाह, कुठे तुजसि? गमे, अंतरी बरी ।।१॥।
बोलता कुणाशि याद ये, तुझी झणीं।
वेडियापरीच पाहती, मला तरी।।२॥।
झोप नाहि नेत्रि, जाग नाहि जागता।
कार्य साधता न ॒ कार्य वाटते करी।।३॥।