सद्‌गुरु अपुला सखा, गडे हो ! सद्गुरु अपुला

सद्‌गुरु अपुला सखा, गडे हो ! सद्गुरु अपुला० ॥धृू०।।
निर्मोही, निर्भयी निरंतर, मार्ग दावि भाविका ।।१॥
अजर, अमर हा आत्मा साक्षी, होउ न दे पारखा ।।२॥
निज स्वरुपाचा बोध दावुनी, दुर करी यम-दुखा ।।३।।
तुकड्यादास म्हणे या या रे ! तिळभरि विसरु नका ।।४॥