कुणि भावबळे आणा हरिला। कुणि प्रेमबळे आणा हरिला
कुणि भावबळे आणा हरिला। कुणि प्रेमबळे आणा हरिला |। धू०।।
ना कळतो तो यम-नियमांनि, ना कळतो तप साधुनिया ।
ना कळतो वनि जप करण्याने, भक्तीने वश होय भला ।।२ ।।
कठिण मार्ग हा असाध्य बहुता ,योग-याग -विधि -प्रणवाचा ।
साध्य होय प्रभु गोड गाउनी, जेसा द्रोपदिला झाला ।।२॥।
कृत -त्रेता-द्वापारी बघता, कठिण मार्ग क वदला ।
कलीयुगी प्रभु नाम-बळाने, वश होई संती कथिला ।।३॥|
तुकड्यादास म्हणे आला हरि, भारतभू ही बघण्याला ।
म्हणा धर्म हा जात लया, प्रभु ! का ऐसा निष्ठुर झाला? ।।४॥