हरिगुण गात राहि मना ! जा चुकेल भव-संकट सारे

हरिगुण गात राहि मना ! जा चुकेल भव-संकट सारे ॥ध्व०।।
विषय सेविता व्छोण निवाला? सांग तरी जगतात असा ।
राव, रंक जभ सोडुनि गेले, कीर्ति न ती तिळमान्न उरे ।1१॥।
भक्ति सुखाविण शांति न पावे, अनुभव गाती संत असे ।
जा सद्‌गुरुला पूस गड्या ! मग मन बोधे जागीच मुरे ।॥।२॥।
तुकड्यादास म्हणे सावध हो, शोध करी हृदयी अपुल्या ।
नरजन्माची दुर्लभ वेळा, दवडु नको विषयी बा रे !1॥1३॥।