स्मर हरिनाम मनि मनुजा! याविना न गति कवणासि मिळे
स्मर हरिनाम मनि मनुजा! याविना न गति कवणासि मिळे ॥धू०।।
दुर्लभ हा नरदेह सुखास्तव, अवचित तुज दिधला देवे ।
नश्वर सुख घेता गमविशि मग, यमदंडा पाठीच फळे ।1२॥।
सार्थक घे करुनी नरदेही, वेळ पुन्हा ऐसी नाही ।
चाख गुरुबोधामृत हृदयी, सुख तुझे तुजलागि कळे ।।२॥।
तुकड्यादास म्हणे समजी गुज! वर्म कळुनी घे गुरू-वच्ने ।
वाग तसाची जगति गड्या ! मग, देव सखा होऊनि वळे ।।3॥