गुरूचे चिंतन नित्य चिरंतन । त्यांतचि तन्मय मन हे उन्मन ।।
गुरूचे चिंतन नित्य चिरंतन ।
त्यांतचि तन्मय मन हे उन्मन ।।धृ0।।
धगधगते ज्वाला त्यागाची । उज्वल-ज्योती निज ज्ञानाची ।
हाती कमळें जनसेवेची । नित्य शिकविते विचार - मंथन ॥ १॥
शांति ध्वज लहरे महाद्वारी । उत्साहाची वाजत भेरी |
गगन गर्जना मानव तारी । सत्य-अहिंसा निर्भय भूषण ॥२॥
दरी-कंदरी वसती सुंदर । कीर्ती जयाची हिमालयावर ।
तुकड्यादासा अविरत गहिवर । स्वानंदाचे मस्तकिं चंदन ॥३॥