३. शांतिसुखाची संजीवनी
देवाची मर्जी की मानवी प्रयत्न
तू म्हणतोस- अहो ! सर्व काही झालं तरी देवाची मर्जी
फिरत नाही अन् त्यासाठी त्याची भक्ति वाढत नाही तोपर्यंत
तुमच्या मानवांकडून काहीच होत नाही. सांगा बरं, त्या मेघमंडळांतून पाऊस पडून ही गावची गावं बरबाद होतात, नद्यांच्या महापुरांनी हजारो पिकलेली शेतं बुडून जातात नि हवाधूंद ( वादळ) सुटून घरच्या घर कोसळून पडतात, तिथं काय तुमचं व्याख्यान कामी पडतं, तुमची सभा लागू पडत की तुमचे बाँब उपयोगी पडतात ?
मित्रा! हे तुझे म्हणणं काही अंशी बरोबर असलं तरी त्यालाहि काही कार्यकारणपरंपरा आहेच; नुसती कुणाची मर्जी किंवा लहर म्हणून भागणार नाही. मी तुला विचारतो, ज्या काळांत हजारो लोक देवाची भक्ति करीत होते त्या काळांत काय महापूर येत नव्हते, झाडं मोडत नव्हती, गावं वहात नव्हती की दुष्काळ पडत नव्हता? अरे ! यापेक्षा कितीतरी पटींनी हानि झाल्याचं आम्ही इतिहासांत वाचलं आहे नि पुराणांत ऐकलं आहे ना ? मग हे प्रकोप थंडावेल नि रोगराई येणारच नाही म्हणून? ऐक जरा ऐक. का रे! जेव्हा हरिद्वार-पंढरपुरांत हजारोनी दिंङ्या नाचत असत व दगडा- दगडातून हरिनामाचा घोष चालत असल्याचा भास होत असे, तेव्हाहि हजारो माणसे कॉलरा, प्लेग आदि रोगांनी मेलीच ना ? मग कां नाही वाचवलं देवानं त्यांना?
मित्रा! त्याला काही कारणं असतात व ती अनेकदा
गुंतागुंतीची असल्यामुळे सामान्य माणसांचा ठोकताळा हा कुचकामीच
ठरतो. ती कारण तुझ्या लक्षात आल्यावर तुला समजेल की हे रोग । प्रतिबंधक व निवारक उपायांनी जसे काही प्रमाणात व का ठराविक भागांतून सर्वस्वी नाहिसे होतांना दिसतात तसेच ते सर्व सर्वस्वी नाहीसे करण्यासाठीहि उपाय असू शकतात. ही पंचमहाभूतं जेव्हा प्रकोपतात तेव्हा त्यांना शांतविण्याचेहि मार्ग आहे. व त्यांचा अवलंब प्रसंगानुसार करावाच लागतो. मित्रा! आपन त्यांचा अजून शोध लावला नसल्यामुळं आपणाला हे अवघड वाटत आणि म्हणूनच आपण निराशेचे उद्गार काढतो.
महान् दैवी शक्तीचा शास्त्रीय प्रयोग
मित्रा! हे लक्षांत ठेव की, भौतिक विकार जसे भौतिक उपायांनी शमवले जातात तसेच दैवी प्रकार दैवी मार्गानीच बदलता येतात आणि या दैवी सामर्थ्याच्या योगानं भौतिक सृष्टीत सुद्धा मोठं परिवर्तन घडवून आणता येतं. पण हे सामर्थ्य केवळ एका व्यक्तीचं असून भागत नाही. जसा हजारो-अरबो थेंब एकत्र होऊन पाण्याचा मोठा वेगवान प्रवाह बनतो व तो मोठमोठ्या पर्वतांनासुद्धा फोडून
पुढं जाण्यास समर्थ होतो, तसाच जगातील कोट्यावधि मनुष्यांची शुद्ध बुद्धी-सात्विक व दैवि ईच्छाशक्ति यांचा जर एक महान् प्रवाह बनविला तर हिरण्यगर्भ नामक सूक्ष्म सृष्टीत आपणाला पाहिजे ती गति-पाहिजे ती चालना उत्पन्न करता येते आणि तिच्या प्रभावान ही स्थूल सृष्टि पाहीजे त्या स्वरुपांत रंगवता येते. पण अस अजून कोणी केलं आहे का अलीकडच्या काळांत ? अरे ! आपण तर
हजारोच्या संख्येनं सुद्धा एका विचारानं प्रेरित होऊन अधिक वेळ एके ठिकाणी जमू शकत नाही, एका पक्षांत अनेक उपपक्ष अन्अ नेक मतं निर्माण होऊन किंबहूना एका व्यक्तीतच क्षणोक्षणी अनेक विचाराच काहूर माजून सारी शक्ति विभागली जाते, मग अशा
शांतिसुखाची संजीवनी
चंचलतेनं एवढी मोठी मानसिक शक्ति कशी संग्रहित होणार आणि सृष्टीच्या एवढ्या भयानक लाटेला मानसिक शक्तीच्या भरभक्कम साठ्याशिवाय कसं अडवून टाकतां येणार ?
मित्रा! ही जगांत परिवर्तन घडवून आणणारी महान् शक्ति निर्माण करण्याची शास्त्रशुद्ध प्रयोगशाळा ध्यानयोग व ज्ञानसाधना आहे आणि तिचचं सुंदर स्वरुप आहे सामुदायिक प्रार्थना परंतु ही सामुदायिक प्रार्थना इतकी महत्वाची चीज आहे, ती अंधश्रद्धेची कसरत नसून संघटित मानसिक शक्ति निर्माण करण्याची इतकी महत्वशाली कवायत आहे, हे लक्षात तरी यावयाला पाहिजे ना समाजाच्या?
पण याचा अर्थ असा मात्र नव्हे की प्रार्थना किंवा देवभक्तिच सतत करीत राहुन बाकीचे सर्व प्रयत्न सोडून द्यावेत. माझे म्हणणं असं आहे की काहीही अवेळी नको; त्याला वेळ हवी, काळ हवा अर्थात् ज्यावेळी जे करणं जरुरीचं असेल तेच इष्ट समजलं गेलं पाहिजे. कुणी जर म्हणेल की आम्ही आमचे सर्व धंदे सोडून प्रार्थनाच करीत बसू तर मला मुळीच आवडणार नाही.
वनांतील एकांतांत भक्ती की लोकांतांत जनसेवा ?
तूं म्हणतोस की, तुम्हांला न आवडलं तरी हा ज्याचात्याचा
स्वत:च्या आवडीचा सवाल आहे, दुसऱ्यांच्या मर्जीचा नव्हे. एकदा भक्तीची रुचि लागली, एकदा देवाचं भजन आवडलं की मग आपल्या आवडत्या वस्तूपासून ते दूर होत नसतात.एकदा देवभक्तीमध्ये माणूस रंगला की मग त्याला प्रांत, देश नि जग कस आवडणार ? अशी किती तरी उदाहरणं आपल्या पोथ्यापुराणांत नाहीत काय, की एकदा ईश्वरभक्तीची गोडी लागताच त्यांनी कायमचा रानाचाच रस्ता धरला आहे म्हणून मग तुम्ही असं दोन्हीहि गोष्टी सांभाळायला कसं सांगता ?
युगप्रभात
मित्रा! रानाचा मार्ग धरणं ही का मनुष्याच्या बुद्धिमत्तेची तू पूर्णता समजतोस? छे तसे मुळीच नाही. शक्ति भरून निघेपर्यंत बिमारांन स्वस्थ पडून राहावं, त्याप्रमाणं दूबळ्या वृत्तीच्या माणसानं एकांतांत जाऊन आपलं उद्दिष्ट साध्य करावं याचा तो मार्ग आहे. एका विशिष्ट अवस्थेत आवश्यक असं ते साधन आहे-साध्य नव्हे आणि हे साधनहि सर्वांनाच आवश्यक आहे असंहि नाही. रानांत गेल्याशिवाय माणसाला पूर्णता प्राप्त होऊ नये असाच ईश्वराचा संकेत
किंवा सृष्टीचा सिद्धांत असता तर आपल्या आत्मस्वरुपाला पोचलेले सज्जनन या भारतांत युद्धाच्या आघाडीवर कसे उभे राहिले असते ?
श्रीकृष्णासारखा दिव्य अवतार मानवसमाजाच्याच नव्हे तर
गुरावासराच्या सेवेस कसा लागला असता ? आणि मोठमोठे ऋषिलोक समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी वाणी व लेखणी झिजवित कसे बसले असते ?
पूर्णत्वाचा स्वाभाविक व सर्वश्रेष्ठ मार्ग
अरे ! रानांतील एकांतवास हा निसर्गाचा सात्विक सहवास आहे; मानवी समाजातील दुःख-दैन्य, वैर-विरोध व विकार- विलासामुळे आपल्या चित्तवृत्ति क्षुब्ध न होतां यमनियमादिकांनी मजबूत व्हाव्यात यासाठी हे निवान्याचं स्थान आहे ; पण हा जीवनोन्नतीचा साधा-सरळ मार्ग नव्हे. सर्वांनी या मार्गाचा अवलंब केलाच पाहिजे हे म्हणणं चूक आहे. घरच्या घरी दंडमोढे मारणारा जसा विजयी वीर नव्हे, निवांत हौदांत पोहणारा जसा बहाद्दर नव्हे तसाच जीवनातील सुखदुःखाचे युद्धप्रसंग टाळून स्वत:ला रानावनात
लपवून ठेवणाराहि महात्मा नव्हे; जीवनातील थोर थोर लांटाशी हसत-खेळत, प्रत्यक्ष विरोधी प्रसंगातूनहि जो आपलं प्रगतीचं पाऊल पुढंच टाकीत जातो तोच खरा महापुरुष लोकांतात एकांत साधतो
तोच खरा चतुर साधक! पळपुट्या आपल्या माथी लावून घेणारा मनुष्य हा देवाचा व देशाचाहि गुन्हेगार समजला जातो, हे लक्षात असू दे.
मित्रा! जो जो पुरुष या भूतलावर जन्मास येईल त्यानं मानवी जीवांची सेवा करण, देशाच्या सुखस्वातंत्र्याचं व स्वर्गांच्या शांतिसाम्राज्याचं ज्ञान परस्परांना करुन देणं, हे त्या प्रत्येकाचं जन्मसिद्ध हक्काचं कर्तव्यच आहे. मग तो घरी असला काय किवा अरण्यांत गेला काय, तथापि हे कार्य त्यानं केलंच पाहिजे नि आपल्यावरील देवाचं, देशाचं नि ऋषीचं कर्ज फेडलंच पाहिजे. जे पुरुष ही गोष्ट विसरुन चालतात व *आम्ही पोहोचलो* असं समेजतात त्यांना आत्मानुभव येण्याला अजून वेळच आहे, असंच समजलं पाहिजे. कारण जे पुरुष आपल्या आत्मतत्वानं पूर्ण होतात त्यांना जग हे जग दिसत नसून ती चैतन्याची लीलास भासमान होत असते व त्यामुळचं त्यांची जगाविषयींची आसक्ति तशीच भीतीहि निघून जात असते. जनसेवा ही त्यांच्या दृष्टीनं लीलामय साधना ठरते व शुद्ध संस्कारांनीच हे विषय त्यांच्यात रुजत असतात.
कर्तव्याचा त्याग म्हणजे कर्मातीत होणं नव्हे!
मित्रा! जगाचं विस्मरण हा निर्वाण पदाचा अंतिम सांधा आहे. जगातून जेव्हा तत्वज्ञ लोक आपला देह सोडून जातात तेव्हाच ते कायमचे जगाला विसरतात आणि आपले आत्मस्थान साधून त्यात लीन होतात. अर्थात् ते ब्रह्मस्थितींत समरस होता- पहुँचे हुए न आये (यद्गगत्वा न निवर्तते) अशा निजधामास जातात. त्या पूर्वीहि ते ब्रह्मस्थितीत याच देही याच डोळा मोक्षाचा सोहळा अनुभवीत आरुढ झालेलेच असतात आणि जगाला सुद्धा ब्रम्हरुपाहून वेगळे अस पाहात नसतात; परंतु हा जगाचा विसर म्हणजे जगाच्या व्यवहाराचा त्याग नसतो तर जगाच्या मूळ स्वरुपाविषयीं लोकांत वावरत असलेल्या
भ्रामक समजुतींचा तेवढा त्याग असतो. जग त्यांना आत्मरुपाहून वेगळ वाटतच नाही, मग त्याचा त्याग आणि भोग का करावासा वाटणार? ते जगाच्या डावात न सापडता जगाचा खेळ व्यवस्थित मार्गावर आणून सोडीत असतात आणि म्हणूनच त्याचं प्रत्येक कर्म हे ब्रह्मार्पण किंबहुना ब्रह्मरुपच होऊन जातं; त्यासाठी कर्माचा-कर्तव्याचा-त्याग करण्याची काहीच गरज नसते. पण तस नसता एखाद्यानं उगाच व्यवहारत्याग करुन अरण्यवास पत्करावा व *आम्हाला समाजाच कार्य करावयाचं* म्हणून साधनं व त्यांच ज्ञान याचा अभावीच ब्रह्मस्थितीचं नि कर्मातील अवस्थेत ढोंग करावं हे देवाला, निसर्गाला नि मानवाला समाजाला धोका देण्यासारखंच आहे. तो परमार्थाला नि व्यवहाराला सद्धा
विघातकच ठरेल आणि अशा मानवाला अखेर सुखशांतीचा लाभ होणारच नाही; आलं लक्षांत ?
आधी देशसेवा, देवसेवा की देहसेवा?
तूं म्हणतोस की - *मग आधी देशसेवा की देवसेवा *?
सांग मित्रा! मी म्हणतो- आधी तूं देहसेवाच कर, पण ती
देशाच्या व देवाच्या वैभवसुखाला नि संकेताच्या साखळीला शोभेल अशी तर कर. तुझ्या राहणीमुळे देशहि नाराज नि देवहि नाराज, असं जर तुझे वर्तन असेलं तर, हा तुझा तिसरा पंथ दैत्याच्याच मालिकेत घालावा लागेल ना ? कारण दृष्ट लोकहि देवाला भजतात नि स्वार्थी लोकहि देशभक्ति करतात; पण त्यांची ही भावभक्ति असते इंद्रियतृप्तीकरिता, वासनापूर्तीकरिता नि फायदेशीर कीर्तीकरिता. त्याचा एकच उद्देश की, हरामाचा द्रव्यसंचय वाढता असला पाहिजे, कष्टाशिवाय प्रतिष्ठा मिळत राहिली पाहिजे, कृतिशिवाय बोलकं अध्यक्षपद मिळालं पाहिजे, सेवेशिवाय सत्ता नि आरामशीर पुढारीपण प्राप्त झालं पाहिजे. देव अन् देश यांच्या ऐवजी ज्यांच्या हृदयाची जागा।
शांतिसुखाची संजीवनी
असल्या हीन वासनांनी घेतली असेल त्यांना कोणाचे भक्त म्हणणार? ते जीवंत दैत्य-मूर्तिमंत राक्षसच नव्हते काय ? हेतु अत्यंत गर्हणीय असतांना त्यांच्या लंब्या देव न् देशभक्तीत काय अर्थ आहे ? त्यापेक्षा आधी आपल्या देहाची शुद्धता नि नीतिनियमपूर्वक व्यवस्था ठेवणं सुद्धा अधिक चांगल म्हटलं पाहिजे.
म्हणूनच मी तुला सांगतो की प्रथम देहसेवाच कर पण. चार सज्जन आवडते होतील व त्यांनाहि तूं आवडशील असं कर. नैसर्गिक राहणी, शुद्ध दिनचर्या, योग्य परिश्रम, स्वत:ला लागणार अन्नवस्त्र स्वत:च निर्माण करण्याची तयारी, देहाशी संबंधित अशा लोकांसाठी झटण्याची प्रवृत्ति, गावाच्या आरोग्यावर-सुरक्षिततेवर व समृध्दीवर आपली देहसुखं अवलंबून असल्यामुळं गावाच्या सुव्यवस्थेकडे लक्ष इत्यादि गोष्टीचा अंतर्भाव तुझ्या देहसेवेतच व्हावयाला पाहिजे आणि नंतर, देशाच्या बऱ्यावाईट अवस्थांतरांचा परिणाम आपल्या
गावावर व पर्यायानं देहावर होणार म्हणून देशाचं कार्य केलं पाहिजे तसंच सर्वांच्या सुखासाठी विश्वचालक देवाचं भजन, प्रार्थना व कार्यहि अंगीकारलं पाहिजे. असं केल्यानंच अखेर देह, देश किंबहुना विश्व चालविणाऱ्या अंतिम चैतन्यतत्वाचं ज्ञान होऊन जीवांना पूर्णत्वांच शांतिसुख प्राप्त होईल; आलं लक्षांत?