६. धर्म, पंथ, पक्ष आणि संप्रदाय
धर्माचा जीवनव्यापी अर्थ
मित्रा! ही गोष्ट जशी जातिपाती व गरीबीश्रीमंतीच्या वादांबद्दल झाली त्याप्रमाणंच धर्माधर्माच्याहि बाबतीत झालेलं धर्म ही एकच वस्तु आहे व ती सर्वांची आहे. कारण धर्म याचा अर्थच समाजाची सर्वांगीण धारणा व प्रगति करण्याचा मार्ग हा आहे. देशकालपात्रभेदानुसार प्रत्येक व्यक्तीचं परस्परासंबंधीचं स्वत:विषयी कर्तव्य आणि निसर्गाला अनुसरून उन्नतीची वागणूक याचां अंतर्भाव धर्मातच होतो. प्रार्थना, उपासना, सदाचार, ज्ञानसाधना इत्यादि गोष्टीहि मानवाला सुखशांतीचा लाभ करून देण्यासाठी आवश्यकच असल्यामुळं त्याहि धर्मातच येतात. समाजाची अर्थव्यवस्था, समाजातील वीराचं, बुद्धिवंताचं व सत्ताधीशाचं तसंच सर्व प्रकारच्या लोकाचं कर्तव्य, समाजाची संपूर्ण रचना इत्यादि गोष्टीहि देशकालपरिस्थिति लक्षात घेऊन सर्वांच्या शांति व प्रगतीस उपयोगी अशाच असाव्या लागतात आणि म्हणून त्याहि धर्मांतच येतात. एकूण धर्म म्हणजे व्यक्ति व समाज याच्या जीवनास सर्वतोपरी उन्नत व सुखी करण्याचे प्रत्येक काळांतील सर्व मार्ग ! हा अर्थ एकदा स्वीकारला म्हणजे मग सर्वांच्या वैयक्तिक कर्तव्याला, हक्काला व जबाबदारीला एक अशी सरळ दिशा लागते की मग त्यांच्यात धर्मांच्या नावाखाली संघर्ष उत्पन्न होण्याचं कारणच उरत नाही. केवळ *आमच्या पोथीत कोण्या एका काळी सांगितलेला धर्ममार्गच सत्य, आमचाच महात्मा श्रेष्ठ व आमचीच उपासनापद्धति ईश्वरमान्य* अस आकुंचित दृष्टान समजत गेल्यानच सारे गोंधळ उत्पन्न झाले आहेत.
श्रीमंती व गरीबीचा उगमाची कहानी
विविध धर्मपंथांच्या उगमाची कहाणी
मानवसमाजाच्या हिताच्या मार्गाला म्हणजेच समाजधर्माला सोडून तसंच देशकालानुरुप आचरावयाच्या लोकधारणेच्या राष्ट्र-धर्माला बाजूस सारुन व्यक्तिधर्म ज्या वेळी वाट चालू लागला, *आत्मार्थ पृथ्वी त्यजेत्* या प्रमाणं आत्मोन्नति किंवा आत्मसुख यापुढं जगाची सुद्धा फिकीर करावयाची नाही ही प्रवृत्ति जसजशी दृढ होत गेली, तसतशी व त्या वेळेपासून धर्मकल्पना विशिष्ट साच्यात वाढू लागली. ऐहिक जगांची आपणावर काही जबाबदारी आहे व समाजासंबंधीचं आपलं काही कर्तव्य आहे, ही गोष्ट डोळ्या-आड होत गेली आणि पारमार्थिक कर्तव्यच एकमेव धर्म ठरु लागला. त्यांत जे ज्ञानी होते त्यांनी ज्ञानमार्ग वाढवला, कित्येकांनी योग-प्रक्रियांना महत्व आणलं आणि कित्येक भक्ति, कर्मठता, तीर्थयात्रा, जपतप व मंत्रतंत्राच्या मागे लागेल. याप्रमाणं त्यांतील गुरुलोक जेव्हा एकांगी मार्गानं वाहायला
लागले तेव्हा त्यांच्या प्रभावात नि प्रवाहात आलेले लोक यांचे विशिष्ट गट झाले व त्यांची परंपराच उत्पन्न होत गेली; आणि त्यानांच *पंथ* *मार्ग* *संप्रदाय* अशी नावं मिळत गेली. कित्येकांनी तर केवळ स्वत:च्या गुरुपणासाठी, लौकिकासाठी नि स्वार्थासाठी नवनव्या योजना भोळ्या समाजापुढं मांडून त्याच्यांत भलतीच क्षुल्लक व्रतं वगैरे वाढवली अन् त्यांनाच धर्मा चा शिक्का मारला. हा सर्व एकांगी गोंधळ पाहून कित्येक जाणत्या लोकांनि चीड निर्माण झाली व त्यांनी आपला संप्रदाय अलग केला; अर्थात् त्याला जेव्हा मोठं स्वरुप आलं तेव्हा तोहि धर्मच बनूं लागला अशा रीतीनं थोडथोड्या मतभेदामुळं किंवा त्यांच्या आचाराच्या वेगवेगळ्या नियमांमुळ काही पोथीनिष्ठ, काही तत्वनिष्ठ, काही व्यक्तिनिष्ठ व काही स्वार्थनिष्ठ पंथ वाढत गेले व त्यांनी मनुष्यसमाजाला सुख देण्याची काही तत्वं पुढं करून आपापल्या पंथांना धर्माचं रुप दिलं. ते धर्म समाजतून अलग
युगप्रभात
पाडले त्यांच्यातहि जेव्हा अनेक कारणांनी विकृति शिरली व मतभेद वाढले तेव्हा परस्परांना शत्रु समजण्याइतकी भयानक भावना वाढ घेऊ लागली व सत्तेचा किंवा शक्तीचा दुरूपयोगी करुन, कारस्थान लढवून किंवा तरवार चालवून देखील आपापल्या मताचा प्रचार त्यांनी सुरु केला. धर्मांच्या व पंथाच्या नावाखाली करण्यात आलेले अत्याचार व घातपात यांची साक्ष इतिहासच नव्हे तर वर्तमान समय देखील देत आहेच.
हे सारे धर्मभक्त म्हणजे हत्तीजवळचे आंधळे!
वास्तविक कोणताहि धर्म मूळधर्मापासून भिन्न नाही, कुणाचिहि नीतितत्वं वेगळी नाहीत नि कुणाचाहि देव निराळा नाही; मूळसूत्र एक आहे. देशकालपरिस्थिती व लोकांची पात्रता नि रुचिभिन्नता यामुळं त्यांच्या आचारविचारांत फरक पडलेला आहे. पण तो आपली माणुसकी विसरुन परस्परांचा द्वेष करायला थोडाच शिकवितो? हत्ती एक आहे पण तो दहा आंधळ्यांना दहा त-हेचा भासतो; कारण त्यापैकी कुणालाच त्याचं संपूर्ण रुप आकलन करता येत नाही. जो तो हातात सापडेल त्या हत्तीच्या अवयवाला हत्तीच समजून बसला आहे नि त्यामुळ एकाचं मत दुसऱ्याशी मिळत नाही; शांततेनं सर्वाच्या मतांचा त्यांच्या त्यांच्या दृष्टीतून विचार करून समन्वय करण्याइतका विवेक व धीर नसल्यामुळं प्रत्येकजण परस्पराला मारायला उठला आहे; अशीच या विविध धर्मभक्तांची शेकडो वर्षापासून अवस्था झालेली आहे. तसंच अन्य धर्मातील लोकहि धर्मतत्व न जाणतां दुराचार माजवतात. ज्या धर्मात बुद्धिस्वातंत्र्य व मत्सहिष्णुता यांना स्थान आहे त्या धर्माकडून दुसऱ्यावर अत्याचार बहुतेक होत नाहीत; पण ज्यांत जास्तीत जास्त पोथीनिष्ठता, व्यक्तिनिष्ठता, कट्टर कर्मठता व एककल्लीपणा यांना स्थान देण्यांत आल असेल त्यांच्याकडून
श्रीमंती व गरीबीचा वाद
धर्माच्या नावांवर समाजात गुंडगिरी व अघोर पाप होणं स्वाभाविक आहे. गुंडलोक अशी पापं करुनहि धर्माचं पांघरुण घेतात त्यामुळं सामान्य चिकित्सक माणूस धर्म या शब्दाचाच द्वेष करु लागतो व साधारण समाजात *आपला धर्म व परक्याचा धर्म* ही विरोधाची भावना वाढत जाऊन ते परस्परांचा द्वेष करु लागतात नि दुःख भोगू लागतात. या गोंधळांतून उन्नतीऐवजी अध:पात व संकटच जनतेच्या वाट्याला येतात; अर्थात् खऱ्या अर्थानं या सर्वच वागणुकीला धर्माचा मार्ग म्हणता तरी येईल का?
विविध पक्ष हे जिवंतपणाचं लक्षण आहे काय?
मित्रा! धर्माचा लहान भाऊ संप्रदाय आहे. हे तत्वांच्या नावावर देवाला नाचवितात तर संप्रदाय हे बुवांच्या नावावर जनतेला नाचवितात. कित्येक संप्रदाय देवतांच्या म्हणजे कित्येक थोर व्यक्तिच्या नावावरहि आपलं राज्य दहापाच कुटुंबात स्थापन करीत असतात. वास्तविक सर्वाची जन्मरीति एकच आहे. ज्या रीतीने धर्माचे तुकडे झाल्यासारखे दिसतात त्याच रीतीनं एकेकाळी संप्रदा यांचे तुकडे
झाले व त्याच पद्धतीनं आज पक्षापक्षांचेहि तुकडे होत आहेत. पक्ष किंवा संप्रदाय म्हणत नाही; पण मुळांत प्राचीन पंथभेदाच्या व या पक्षभेदांच्या ठेवणीत फरक नाही. जातिधर्म देवभक्तिचे किंवा व्यक्तिनिष्ठेचे विविध पंथ हे आजच्या दृष्टीने मागासलेले पक्ष आहेत व सध्याचे पक्ष हे जीवनांतील प्रश्न बुद्धिवैशिष्ट्य यांवर आधारलेले *सुधारलेल्या आवृत्ती* हे पंथ आहेत एवढाच काय तो फरक.
तू म्हणतोस- *पक्ष निर्माण होण हे बरं की वाईट! हे जीवंतपणाचं लक्षण आहे असं कित्येक म्हणतात अन् हे नाशाचं कारण आहे असहि कित्येकांच म्हणणं आहे ; यात खरं कोणाचं समजावं? मित्रा माझ्या मतानं याचं उत्तर एका शब्दात देऊन
मोकळ होता येणार नाही; ते एकांगी ठरेल कुटुंबातून अलग हा कित्येक वेळा आपल्या स्वार्थान, वेडेपणानं किवा कई विसरुन बाहेर निघतो हे खरं असल तरी, कित्येकदा बिभीषणास व प्रल्हादासारखा असू शकेल, अर्थात त्याची बाजू खरीहि असू शकेल. याप्रमाणंच मूळ धर्माचे व पक्षपंथाचे पुरस्कर्ते यांचाहि सवाल आहे. केवळ चालत आलं तेच चालवीत राहण हे सुद्धा अनेकता अधःपातास व लोकनाशास कारण होतं, म्हणून त्याला अधर्म म्हणणे भाग पडतं. स्वामी रामतीर्थांनी म्हटलं आहे की *कित्येकदा जीवजिवाण राहू लागले म्हणजे जुन्या किल्ल्यांच्या भिंतीच आधी पाडाव्या लागतात व आज उगवलेलं गुलाबाचं चांगल फुल केवळ नवं म्हणून ताज्य न समजता शिरोधार्य समजावं लागतं* हे अगदी बरोबर आहे. परिस्थितीचा विचार करुन सृष्टीच्या चक्रमाप्रमाणं नियमांत व विचारांतहि बदल केलाच पाहीजे, हे जो जाणतो त्यालाच मी खरं सनातन तत्व जाणणारा खरा पक्ष व धर्म टिकविणारा समजतो. नाहीपेक्षा एका काळचा उत्तम पुरुष हा दुसऱ्या काळचा शत्रूहि ठरत असतो आल
लक्षात?
धर्म पोथीच्या पानांत नाही जीवनांत ओळखा!
मित्रा! *देशकालपात्रभेदेन धर्मभेद* हे सूत्र ध्यानात घेऊन ज्या ज्या महापुरुषांनी वेळोवेळी धर्मतत्वांना नव्या आचारांत उतरविल, समाजाला तत्वानुसार नवं वळण दिलं, तेच अवतार. देव ऋषि व संत ठरले. आपण त्यांचे गोडवे गातो, त्यांच्या तत्वज्ञानाची पूजा करतो पण त्यांच्या काळांत आज कितीहि बदल झाला असला तरी त्याच पुस्तकी रेषांवर पावलं टाकतो पण आपल्या वेळची परिस्थिती ध्यानात घेऊन त्यांची तत्वं निराळ्या पद्धतीन, व्यवहारात आणायला मात्र तयार होत नाही आणि म्हणूनच रामाचे
भक्त होऊनहि आमच्यात राम येत नाही, आम्ही गुलामच राहतो. धर्माच्या नावांवर हवे ते जुन्यांतले जुने उपक्रम करुनहि आम्ही सुखी न होता दिवसेंदिवस गढ्ढ्यांतच जातो. याचं मुख्य कारण हेच आहे की, तत्वं सनातन असली तरी व्यवहार व आचार यांची घडण ही वेळोवेळी बदलली पाहीजे व समाजाची सुखशांति व प्रगतीस पोषक अशी धारणा-अशी रचना केली पाहिजे, हाच खरा धर्माचा अर्थ आपण विसरुन गेलो आहोत.।
मित्रा! ह्या सर्व भानगडी आज आपल्या देशापुरत्या तरी व्यवस्थित करुन व हे धर्माधर्माचे नि पक्षोपपक्षांचे गोधंळ शांत करुन सर्वांना राष्ट्रधर्माची जाणीव करुन देणं आवश्यक आहे. देश संघटित करण्याची, त्याला बलवान व बुद्धिमान करण्याची तसंच अन्नवस्त्रांच्या दृष्टीनं स्वावलंबी व समृद्ध बनविण्याची अत्यंत जरुरी आहे. म्हणूनच मी तुला म्हणतो की पोथ्याची पानं डोळ्यापुढून थोडी बाजूला सारुन सध्याची राष्ट्राची परिस्थिती पाहा नि त्याला सुखी व उन्नत बनविण्यासाठी सर्वामिळून विचार करुन पाऊल टाक. जे काम करावयाचं ते वेळप्रसंग पाहूनच करावयास पाहिजे. निव्वळ देव-देव करुन भागत नाही अन् निव्वळ देश-देश करुनहि शांतता स्थापन होत नाही; या सर्वांचा समन्वय करुनच कार्य करायला पाहिजे. तसं जर नसतं तर पूज्य गांधीजीनी देव व देश या दोहोशीहि स्वत:ला निगडित कां करून घेतलं असतं?