७. भारताचा भविष्यकाळ
प्रथम प्रभात उदित तव गगने
मित्रा! तुझा हा प्रश्नच आज मी अनेक ठिकाणी ऐकत आहे की- का हे! असं कधी तरी होईल का की सर्वच लोक साक्षर, बुद्धिमान, बलवान एकजाति व एकपंथी झालेले आहेत? असा कधीतरी दिवस उजाडेल असं वाटतं काय तुम्हाला? यावर उलट मीच असं विचारत आहे की, मित्रा! असं होणार नाही असं तरी तुला कां वाटावं? जे देश आज जगाला ऋणी करण्याइतके धनाढ्य आहेत, जगाला खतम करण्याची पैज मारण्याइतके बलाढ्य आहेत, जगाची घडीच बदलून टाकण्याइतके सुशिक्षित आहेत, त्यांचा एकेकाळचा इतिहास भारतदेशाच्या उज्ज्वल पूर्वइतिहासाच्या मानान किती खालच्या दर्जाचा होता म्हणून सांगू. अरे! या भारताच्या इतिहासाची सर जगांतील क्वचितच देशांच्या इतिहासाला येईल, हे त्या देशांतील लोकांनीच कबूल केलं आहे. भारत हा पूर्वेचा देश असल्यामुळं सूर्याचा उदय जसा त्यांत सर्वाच्या आधी व्हावा त्याप्रमाण सर्वच प्रकारचा ज्ञानप्रकाश त्यांत सर्वारंभी उदयास आला आहे. जगांतील अन्य देश ज्यावेळी अज्ञानाच्या अंधकारात घोरत पडले होते त्यावेळी भारतांतील ऋषीचा वेदघोष चालू होता. त्यांच्या उद्घोषांनी जागलेल्या पाखरांकडेच साऱ्या जगाला जागं करण्याचं श्रेय आहे विसरु नकोस.
भगवान रामचंद्राचा किंवा श्रीकृष्णाचा काळ घेतला तरी *त्यावेळी बाकीच्या देशांत काय होतं? तोंडाला रंग फासून. चामडीबल्कलं गुंडाळून नि हाडादगडाचे अलंकार घालून रानटी पद्धतीन
भारताचा भविष्यकाळ
नाचणारे लोक अगदी अलिकडच्या काळापर्यंत सुद्धा तिथं वावरत होते. पण त्यांच्या भाग्यानं एकदा उचल घेतली अन् ती स्थिती इतक्या झपाट्यानं पालटली की आज त्याच देशाच्या समोर हा एकेकाळचा जगद्गुरु भारतदेश निवळ कचरा होऊन पडलेला आपणांस दिसून येतो.
सर्व पंथाचं स्वतंत्र संवर्धन म्हणजे राष्ट्रनाश
भारत देशाचा असा अध:पात होण्याचं मूळ या देशांतील तत्वज्ञानांत नाही तर ते तत्वज्ञानाच्या विपर्यासात आहे. बुद्धि गहाण ठेवली जाऊन पोथीनिष्ठा, व्यक्तिनिष्ठा व पंथनिष्ठा वाढत गेली आणि स्वार्थी व धूर्त लोकांनी सर्वाच्या हिताऐवजी स्वत:च्या सुखाचा विचार दृष्टीसमोर ठेवून विचका करुन टाकला. उदारमतवादीपणामुळं शेकडो मतांना वाव देता देता प्रत्येक मताचा गट पडत गेला; शेकडो पंथ, जाति व धर्मसंप्रदाय फोफावत गेले आणि समाजाची शक्ति दुभंग नव्हे छिन्नभिन्न होत गेली. नव्यानव्या पंथाची भर पडत गेली; पण सर्वानी कुठं तरी एकत्र यावं नि आपलं बंधुत्व ओळखावं, सर्व पंथमतांना कुठंतरी एका ध्येयात विलीन करावं नि देशकालपरिस्थितीचा विचार करुन आज अनावश्यक किंबहुना बाधक ठरणाऱ्या पंथमताचं व रुढ्याचं विसर्जन करुन टाकावं, हा विचार मात्र शिल्लक राहिला नाही. त्यामुळं प्रत्येक गट अलग झाला, इतकचं नव्हे तर आपापल्या पात्रावर पोळी आढण्यासाठी किंवा आपापल्या प्रतिष्ठेसाठी भांडू लागला. अशा रीतीनं सारा समाज शक्तिहीन, मानव्यरहित व आपासांत डोकी फोडणारा बनून आयताच दुसऱ्यांच्या घशांत गेला. सामान्य जनतेला सर्वांगीण विकासाचं शिक्षण देण्याऐवजी त्याला मूर्ख ठेवून राबवून घेणं हेच बहुतेकाचं धोरण बनत गेलं व अशा रीतीनं एकदा उंच शिखरावर नांदलेला भारत देश पूरा गर्तेत गेला. या पडत्या काळांतहि या देशांत अत्यंत मोठमोठी माणसं, अनेक वीर, संत व गुणज्ञ पुरुष
युगप्रभात
होऊन गेले; तरीपण या जातिजातीच्या व पंथापथाच्या फुटाफुटीमुंळ त्यांना आपल्या इच्छेनुसार काम करता आलं नाही; सामान्य लोकांतील भ्रामक संस्कारांमुळं त्यांना पाहिजे ती दृष्टि पाहिजे त्या प्रमाणांत लोकांत रुजवता आली नाही आणि अखेर त्यांनाहि या गोंधळापुढ हातच टेकावे लागले किंबहुना त्याची सर्वांच्या हिताची उच्च मतं देखील एका संप्रदायाच्या नावाखाली दडपून बाजूस फेकण्यात आली.
मित्रा! संघटित व्यवहार नाही व संघटित शेती नाही, एक पंथ नाही एक जाति नाही, एक देव नाही व एक पुढारी नाही. किंबहुना आम्ही एका ईश्वराची लेकरं, एका देशाचे घटक व एका गावचे रहिवासी इतकी बंधुत्वभावना देखील नाही; असं झाल्यानंच या लोकांना एवढं खाली यावं लागलं आहे. सत्ता, संपत्ति, प्रतिष्ठा इत्यादि सर्वच गोष्टी या फुटीर वृत्तीमुळं माकडांच्या हातांत कोलीत नि यादवांच्या हातांत लव्हाळी मिळाल्याप्रमाणं सर्वांच्या शासच कारण झाल्या. लहान-लहान राज्ये स्थापन करुन बळी तो कान पिळी या न्यायानं आपसांत वळण लागलं आणि व्यापक दृष्टीनं विचार करुन सारा देशच सुखी व उन्नत करावयाचा ही कल्पना अगदी मागं पडली.
राष्ट्राच्या नवनिर्मितीचा पाया
मित्रा! आज मात्र तसं राहिलेलं नाही. सारा देश आपला आहे ही दृष्टि आता जवळजवळ सर्वांनाच येऊ लागली आहे. निदान हे सर्वांना आज कळू तरी लागलं आहे. फार दिवसाचं ग्रहण आता हळूहळू वितळत चाललं आहे. भारताच्या भाग्यानं लो.टिळक, महात्मा फुले, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद यांसारखे थोर थोर पुरुष लाभले, त्यामुळं देशानं आपली मान बरीच वर काढली आहे आणि थोडं तरी जीवनाकडे पाहण्याचं ज्ञान त्याला येऊ लागलं आहे. मित्रा!
भारताचा भविष्यकाळ
आता प्रथम एकच केलं पाहिजे की देशांत एकहि व्यक्ति निरक्षर राहता कामा नये. प्रत्येकाला माणुसकीची नीति व जीवनाचं खर तत्वज्ञान कळलं पाहिजे. देशप्रेमाबरोबर देशाची नौका कुणीकडे जात आहे हे ओळखण्याची दृष्टिहि सर्वांनी आली पाहिजे. प्रत्येक जनांत स्वावलंबन व लोकसेवा याचं प्रेम वाढलं पाहिजे. प्रत्येक मानव देशाचा शिपायी बनून लढू शकला पाहिजे; अर्थात् तो डोळस, नीतिमान आणि सहृदय असा शिपायी बनला पाहिजे, केवळ रंगरूप नव्हे. बुद्धीनं व बळानं टिकविण्याची कुवत सर्वात येणं हेच पहिलं महत्वाचं कार्य आहे. अर्थात् त्याबरोबर सर्वांच्या निर्वाहाचा प्रश्नहि तितक्याच व्यापक विचारानं सोडवता आला पाहिजे. *व्याघ्राचिया भुके बघावी ती गाय। याचे नाव काय पुण्य असे ? हे श्रीसंत तुकारामाचं वचन लक्षात घेऊन केवळ मूठभर लोकांच्या सोयीसाठी सर्व समाजाला बेकार व भिकार न बनविता, सर्वांना सुखानं राबविता व जगविता आलं पाहिजे. जे लोक ज्या कार्यात हुशार असतील त्यांना त्या कार्यास लावलं पाहिजे व शिलेबाजी नि पक्षपात बंद केला पाहिजे. जात-पंथ, देव-धर्म व गुरु-ग्रंथ सर्व एकत्र आणून, त्यांत जे कोणी राष्ट्रधर्म जागवणारे व विशाल दृष्टि देणारे असतील तेवढे ठेवून, बाकीच्यांना देशांत अन्न निर्माण करण्याच्या कामास लावलं पाहिजे किंवा गंगेत शिरवून दिलं पाहिजे. हे जर कायद्यानं अमलात आणलं आणि प्रचाराद्वारे रुजवलं ना, तर हा-हां म्हणता देश अगदी तूं म्हणतोस तसा आदर्श होईल. सारे कथाकार-पुराणिक, तमासगीर, पोवाडेवाले, बुवापंडित अन् मास्तर व पुढारी यांना जर सक्तीनं या महत्वाच्या एकाच दिशेनं प्रचार करण्याकडे लावलं तर हजारो वर्षापासून साचत आलेला केरकचरा नाहीसा होऊन सारा समाज नव्या तेजानं चमकू लागेल.
राष्ट्रोन्नतीच्या कळ्या उमलू लागल्या
मित्रा! देश आता या उन्नतीच्या मार्गावर लागलाच माहे समान. *माझा देश केव्हा उन्नत होणार?* हा प्रश्न तुझ्याप्रमाणेच आज अनेकांच्या हृदयात थैमान घालीत आहे. तुझ्याप्रमाणंच सर्व लोकांनी आपली समज वाढवून घेऊन नि हृदय मोठं करुन देशाकरिता प्राण खर्ची घालण्याची तयारी केली नि आपल्या जवळपासच्या लोकांतहि आपली जागती दृष्टि दिली तर काय होणार नाही? खरे ! पाहता पाहता नव्या युगाची प्रभात पुन्हा या कोमेजून गेलेल्या भारताच्या बगीच्यांत
नवनवी फुलं फुलावायला लागेल ; आलं लक्षात ?