११. सौंदर्यशाली राहणी
बावळट सात्विकता की आंबटशोकी सुंदरता?
मित्रा! तू म्हणतोस-*तुमचे हे सेवक-प्रचारक साध्या राहणीचा पुरस्कार का करितात? मनुष्यान पुन्हा आपल्या रानटी राहणीकडे जाव अस तुम्हाला म्हणावयाच आहे काय ? सौंदर्य व कलात्मकता सोडून अंग, कपडे वा घर ही घाणेरडी ठेवण्यात सात्विकता आहे काय ? साजेल ते वापरण्यात व आवडले ते उपभोगण्यातच मनुष्याचा मोठेपणा नाही काय? साधुसत म्हणतात *जग हे मनुष्याच्याच सुखासाठी ईश्वरानं निर्माण केलं आहे ते खोट का आहे?*
मित्रा! वरवर पाहता हे सर्वच बरोबर आहे असं म्हणता येईल; पण सूक्ष्मपणानं विचार केल्यास याच शब्दांनी अनेक पाप झाकता येणहि शक्य आहे; पण सौंदयशाली राहणी हीच राहणी ठेवावी हे मला मान्य आहे; पण सौंदर्यशाली राहणी हीच जीवनांत तर सर्वांत महत्वाचे स्थान घेऊन बसेल व बाकीच्या कोणत्याहि महत्वशाली कार्याला वावच मिळू देत नसेल किंवा सर्व मिळकत सौंदर्यापायीच नष्ट होत असेल तर सौंदर्याच्या नावांवर आंबटशोकीपणाचं पोषणच नाही का होणार? कावळ्याच्या अंगावर मोराची पिस पाहून लोक हसू लागले तर असल्या कृत्रिम व उसण्या सौंदर्याची किंमत ती काय राहिली? छातीचा खोका करुन तो झाकण्यासाठी जोरदार कॉलर किंवा जरतारी गटपट्टा लावला तर त्याला सौंदर्य म्हणवयाच काय? अंगाला सुंगंध व कपड्याला कडक इस्तरी असली की झाल, मग आपल उत्पन्न दोन आण्यानं व कपदार शर्ट नि साबणाचा खर्च
सौंदर्यशाली राहणी
चार आण्याचा असला तरी हरकत नाही; पाहिजे तर कर्ज घ्यावे नी मजा करावी; ही भरमसाठ वाढत असलेली प्रवृत्ति ही माणसाची सुधारणा आहे की, हा राष्ट्रघातकी मूर्खपणा आहे ? चोरीलाबाडीचे धंदे शिकवायला ह्या प्रवृत्याच कारण होत नाहीत काय? विकारांची वाढ करणारी राहणीच उच्च व सौंदर्यशाली म्हणावयाची काय?
मानव-जीवनाचं सौंदर्य कशांत?
मित्रा! सात्विक व हितकर राहणीऐवजी अहितकर किंवा निरुपयोगी पण सुंदर अशी राहणी ठेवण्याकरिता मनुष्य जर पदोपदी शक्तिसंपत्तीची उधळपट्टी करूं लागला, तर त्याचा मोठेपणा देवाला व देशाला आवडतो असं का तुझ म्हणणं आहे? हजार माणसांना खायला नेसायला मिळत नसता मी एकट्यानं सुंदरता व चैन यासाठी हवा तसा पैसा उधळावा, याला मानवी जीवनाच सौंदर्य म्हणता येईल की आसुरी क्रूरपणा? कुशलतेनं दीनदुबळ्याचं रक्तशोषण करुन चेहऱ्यावर अत्तर-पावडर फासणाऱ्या आजच्या कित्येक माणसांत व उघडपणानं माणस खाऊन राख फासणाऱ्या पूर्वीच्या रानटी लोकांत फारसा फरक तो कुठं आहे? जंगली जनावरांच्या झुंडीला भिऊन गुहेत लपणाऱ्या प्राचीन माणसाप्रमाणंच आजचा सुधारलेला माणूस
देखील विमानाच्या हल्ल्याच्या मातीनं पुन्हा त्या गुहेतच शिरु लागला आहेना? मनुष्यांनी स्वार्थाघतेनं मनुष्यसमाजाचा चालविलेला हा अमानुष संहार पाहिला म्हणजे *सुधारणेच्या नावानं जग रानटी अवस्थेकडेच जात आहे* असंच नाही का मनांत येत? *जग मनुष्याच्या सुखासाठी आहे की सर्वांच्या* हा प्रश्न राहतोच. जग सर्वांच्याच सुखासाठी आहे हे जर सत्य असेल तर, सर्वांना सुख मिळेल अशीच योजना सर्वांकडून झाली पाहिजे ना? आणि तसं करावयाचं तर मग स्वत:च्याच चैनीचा विचार करून कसं चालेल? एकाची राहणी
जरिजरतारी व दुसऱ्याच्या अंगावर अपुऱ्या चिंध्या, हे विषमतेचं दृष्य सौंदर्याच्या चौकटीत कसं बसविता येईल? त्यासाठी सर्वांनाच सुखावह होईल अशी साधी राहणीच सर्वांनी स्वीकारायला नको का? चार जणांच्या वाट्याचं सौंदर्य एकट्यानंच गोळा करणं याला चांगुलपण कसं म्हणता येईल? .
मनाला विकाराधीन किंवा गुलाम करील, समाजात दुष्प्रवृत्तींना उत्तेजन देऊन विषमता वाढवील किंवा आपल्या शक्तीच पोषण करण्याऐवजी त्याचं शोषण करील, असल सौंदर्याच वेड हा शाप समजला पाहिजे, जे सत्यावर उभारलेलं व कल्याणदायक फळं देणार आहे, असं राहणं-वागणंच सौंदर्यशाली होय. जे सत्य, जे शिव तेच सुंदर असा सिद्धांत आहे.
स्वच्छतेचं व्यापक स्वरूप
ज्यांत काही सत्व आहे, जीवनाचं तत्व आहे तेच सात्विक सात्विकता म्हणजे गलिच्छपणा व गबाळपणा, हा जो अलिकडे या शब्दाला अर्थ प्राप्त झाला आहे तो चुकीचा आहे ; पण तत्वहीन किंवा तथ्य नसलेली सजावट-बनावट हा सुधारणेचा अर्थहि तितकाच चुकीचा आहे हे विसरु नकोस. *शौच* म्हणजे शुद्धता, स्वच्छता, पवित्रता हे धर्माचं एक मुख्य लक्षणच श्रेष्ठांनी सांगून ठेवलं आहे आणि त्यात गावाची, घरादाराची, कपड्यालत्यांची, अंतर्बाह्य शरीराची व वाणीमनाची सुद्धा स्वच्छता त्यांनी सुचवून ठेवली आहे. पध सध्या आपल्या शौकीन लोकांची स्वच्छता नि सुंदरता इतका दूरवर विचार करायला तरी तयार आहे काय ? गावाचे रस्ते मळांनी गजबजले असले, घराभोवती घाण असली किबहुंना स्वत:च्या अंगावरील कपड्यांत कितीही मळ लपला असला व आठ दिवस स्नान सुद्धा केलेलं नसलं तरी, अत्तराचा छिडकाव केला की स्वच्छता व सौंदर्य
सौंदर्यशाली राहणी
पैदा करता येते, अशी महान घातुक समजूत आजच्या समाजांत वेगानं फोफावत आहे व ती नाहीशी करण्यासाठी सात्विक जीवनाचा आदर्श प्रार्थना ध्यान व ग्रामशुद्धीसाठी ग्रामसफाई नि रामधून आदि कार्यक्रम सद्य परिस्थितीत भारताच्या खेड्याखेड्यांत किती उपयोगी आहेत सौंदर्य वाढविणारे आहेत-हे आमच्या सुशिक्षितांना का बरे कळू नये ? शास्त्रीय दृष्टीनं याचे महत्व कमी आहे असे त्यांना सिद्ध करता येईल का?
स्वावलंबी जीवनाचे सहजसौंदर्य
मित्रा! सौंदर्यपूर्ण राहणी मला पसंत आहे, पण ते सौंदर्य स्वावलंबी व सुखपरिणामी असलं पाहिजे. शरीर व कपडे नेहमी स्वत:च्या हातांनी पाण्याच्या व अवश्य तेव्हा रिठ्यासाबणांच्या सहायानं स्वच्छ करावेत, घर रोगजंतुनाशक शेणानं सारवावं आणि राहणी सात्विकतेनं पवित्र ठेवावी ही अगदी सहजसौंदर्य निर्माण करणारं वर्तन आहे; मग त्यासाठी उगीच भलतेसलते खर्चिक उपाय उर्फ उपद्रव कशाला? तेलाशिवाय स्नान नाही व अत्तराशिवाय कान नाही, इस्तरीशिवाय कपडे नाहीत व कोकोनटशिवाय बाल नाहीत, भांग पाडल्याशिवाय भोजन नाही व विडासिगारेटशिवाय मोठेपण नाही, मसाल्याशिवाय भोजन नाही व सिनेमाशिवाय झोप नाही, या आधुनिक जीवनसूत्रांनी माणसाला जरुरीच आहे काय ? अन् असलीहि अशा काही गोष्टीची जरुरी तर माणूस घरचा धन्नासेठ तरी असला पाहिजे पण तशा धन्नासेठनेहि देशांतील धनाची अशी उधळपट्टी करुन मौज भोगावी व बाकीच्या लोकांना धड लंगोटीहि मिळत नाही इकडे लक्ष देऊ नये, ही लाज वाटण्यासारखीच स्थिती नव्हे काय?
बरं, मी म्हणतो, राहू द्या क्षणभर बाजूला हा घरबारी सामान्य लोकांचा प्रश्न; परंतु सामाजिक कार्यक्षेत्रांत उतरलेल्या ज्या लोकांना-ज्या उपदेशक, सेवक व पुढाऱ्यांना-जनतेच्या पैशांवर आपला
युगप्रभात
निर्वाह करुन आदर्श वागणूक जगापुढं ठेवावयाची आहे नि लोकप्रिय म्हणून लोकांत मिरवावयाचं आहे, त्यांनी तरी कटाक्षपूर्वक साधी सुंदर अशी स्वावलंबी राहणी ठेवलीच पाहिजे ना? महात्मा गांधी टक्कल करीत व अंगावर शेतकऱ्यासारखा कपडा ठेवीत, या लोकांना ते आवडत नव्हते की काय? तसं करण्यात त्यांच्या जीवनी सौंदर्य व श्रेष्ठपण चमकत नव्हत की काय? मी तर म्हणेन की भारतांतील किंबहुना जगातील सर्व सौंदर्यवान लोकांपेक्षा त्यांनी फकीरी सौंदर्यांत अधिक आकर्षण होत. त्यांच्या सौंदर्यावर किती लोक मोहित होते, हे त्यांच्या मृत्यूने लोकांना दिसून आले नाही असे कोण म्हणेल?
यंत्रयुग व राष्ट्रच्या सौंदर्याची साधना
मित्रा! नवनव्या शोधसुधारणा, यंत्रकला किंवा जीवनाचे सौंदर्य वाढवणाऱ्या आधुनिक गोष्टी मला नकोत, अशी तुझी समज झाली असेल तर ती साफ चुकीची आहे. मानवसमाजाचे जीवन ज्यांच्या योगाने अधिक समर्थ व सुखी होत असेल अशा सर्व गोष्टी मला मान्य आहेत; पण ज्यामुळे मूठभर लोकांची चंगळ होऊन लाखो लोक भिकेस लागत असतील अशा शोधसुधारणा कितीही थोर असल्या तरी त्या मी जहरासमान समजतो. आपल्या राष्ट्रांत तयार होऊन आपल्या सर्व सानथोर लोकांच्या जीवनात सुखसौंदर्य वाढविण्यात उपयोगी पडतील आणि मनुष्याचा मानसिक उन्नतीलाहि सहायकच होतील असल्या सर्व सुधारणा व यंत्रकला आम्हाला पाहिजे आहत हे मात्र तू पूर्ण लक्षात ठेव. खेडन खेडे किंबहुना घरनघर स्वावलंबाने सुख भोगू शकेल व प्रत्येक व्यक्ति परस्पराला सहायक होइल, सर्वत्र श्रम आणि सुख यांची योग्य वाटणी होऊन राष्ट्रांत आनंदी आनंद नांदु लागेल ! अशा सर्व प्रकारच्या व्यवस्थेला व व्ययहाराला राष्ट्राच्या
सौंदर्यशाली राहणी
खऱ्या सौंदर्याची साधनामी समजतो. अर्थात प्रत्येक व्यक्तीन आज याच दृष्टीनं आपली वागणूक ठेवावयाला पाहिजे, तरच ती खरी सौंदर्यशाली ठरेल!
आदर्श जीवनाची रुपरेषा
मनाला आवडेल तसे वागणे म्हणजे मनुष्याने इंद्रियाचे गुलाम होणे आहे, समजलास? माणसाला तेच आवडावे की ज्याची जीवनाला जरुरी आहे. माणसाने तेच उपभोगावे, जे शक्तीचा हास करण्याऐवजी विकास करीत समाजांत आपली किंमत वाढवू लागते. माणसाने तशीच राहणी ठेवावी की जी भोगलालसेला प्रवृत्त करणार नाही व चार सज्जन त्याला प्रिय समजतील. असेच खावे की जे नुसते रुचणार नाही तर पचेल आणि इतरांच्या जीवनालाहि पोषक होईल. असेच कपडे घालावेत की ज्याच्यामुळे आपल्या आमदनीत कर्ज व चिंता याची ब्याद मागे लागणार नाही व इतरांच्या इर्षेलाहि जे कारण होणार नाहीत. व्यवहार असाच करावा की ज्यांत आपले व जनतेचहि कल्याणच होईल. निश्चय असाच असावा की ज्यामुळे आपले मन वेडेपीर बनणार नाही; उलट बिघडत गेलेल्या लोकविचाराला योग्य मार्गावर आणून सर्वोदयकारक राहणीतच खरे सौंदर्य आहे हे पटवून देईल मित्रा!
याप्रमाणे वागणे हेच खरे सौंदर्यपूर्ण जीवन आहे व यातच आपले नि राष्ट्राचे कल्याण आहे हे तू निश्चयाने समज!