*भूदानयज्ञ*
१. या यज्ञाच्या ज्वालाच दिव्य समाज निर्मितील!
भूदान यज्ञ हे आजचे महान धर्मकार्यच आहे. समाजाची धारणा ज्या वेगाने व्यवस्थित रूप घेईल तो मार्गच धार्मिक समजला पाहिजे. टाळ कुटून किंवा भजने गाऊन शेतकऱ्यांची पोटे भरत नाही. भूमीतून भरपूर उत्पन्न न निघाले तर टिळेमाळा आणि पोथ्या-पुस्तके समाजाला
जागवू शकणार नाही आणि समाजाच्या संपत्तीवर सुखाने जगणारे धार्मिक बुवाभक्तही डोळे पांढरे करतील. समाजात आर्थिक विषमतेने कहर माजविला असता तिकडे डोळेझाक करून, समाजाला ब्रह्मज्ञान शिकवीत बसणे ही धार्मिकता नव्हे; तो दुष्टपणा आहे. लोकांची आर्थिक स्थिती सुधारणे हा आजचा महत्त्वाचा युगधर्म आहे आणि याच भावनेने
मी या कार्यास हात घातला आहे.
समाजात एकाजवळ भरपूर संपत्ती असावी आणि दुसऱ्या कष्टा करणाऱ्या शेकडो लोकांना पोटभर अन्नही मिळू नये, ही ईश्वरी रचना नव्हे; हा मानवांनी केलेला सैतानी खेळ आहे. आणि हा प्रकार चालू असेपर्यंत समाजात कोणीही सुखाने राहू शकणार नाही हे उघड आहे. आपल्या देशातील दैववादी अज्ञ समाजही आता जागा झाला आहे.
सर्वत्र बुद्धीचे अंकुर फुटू लागले आहेत. बड्यांनी छोट्यांशी समतेने । वागणे हे न्याय्य तर आहेच पण ते आता अपरिहार्यही झाले आहे. सर्वांनी आता सारखे सुखी व्हावयाचे आहे आणि असे झाले तरच समाजात सुखशांती टिकून राहणार आहे. गेल्या पाचशे वर्षात मोठी म्हणजे धनाढ्य व सत्ताधारी माणसे बहुजनसमाजाशी जशी वागत आली
तशी यापुढे जर ती वागू लागतील तर त्यांच्या घरांवर कौलेही राहणार नाहीत, हे त्यांनी पक्के समजून असावे.
--------------------------------
हितबोध
देवे निर्मिली ही क्षिती
देशाच्या पुनर्रचनेचा हा काळ आहे. आपल्या सर्वच बांधवांचे जीवन सुखी होईल अशी समाजरचना आपणास आकारास आणावयाची आहे. अर्थात् त्यासाठी आपल्या अति मतलबीपणाला व परंपरागत मोटेपणाच्या कल्पनेला झुगारून देणे जरूरीचे आहे. परमेश्वराने काही वस्तू संपूर्ण मानवजातीच्या हितासाठी बनविल्या आहेत आणि
कोणालाही त्यावर स्वत:चे स्वामित्व प्रस्थापित करण्याचा काहीही अधिकार नाही. या नियमानुसारच भूमि ही कोणत्याही एकाची वस्तु नसून ती सर्व समाजाची संपत्ती आहे. भूमिदान मागणे म्हणजे कोणाची मेहरबानी मागणे नव्हे, तर जनतेच्या उचित अधिकाराची ती मागणी
आहे. जमिनदारांना माझी एक विनंती आहे की, त्यांना जशी चार मुले असतील तशीच, देशातील भुकेकंगाल जनता आपले लेकरूच आहे ही जाणीव त्यांनी ठेवावी. जमीन आहे ती कसणाऱ्या लोकांसाठीच आहे:
तेव्हा त्यांची त्यांना ती अर्पण करण्यात आपल्या हृदयाची जास्तीत जास्त उदारता जमिनदारांनी दाखवावी यातच त्यांचे मोठेपण व सर्वांचे कल्याण आहे.
देशातील प्रत्येक मनुष्याचा जगण्याचा जन्मसिद्ध हक्क आहे; आणि ही गोष्ट धर्माला पूर्णपणे मान्य आहे. हा हक्क मारला जाऊन त्यावर उपासमारीचा प्रसंग आला तर, तो पवित्र भावनेने ईश्वराची प्रार्थना करू शकणार नाही की नीतीची बंधनेही पाळण्याला तयार होणार नाही, गरीब जनता अशा स्थितीत सुचेल त्या मागनि क्रांती करण्यास प्रवृत्त
होईल. हे संकट ओळखून, लोकांना तसे करणे भाग पडेल असे काही करू नका. जमीन ही परमेश्वरी देणगी आहे. तिचा धनी परमेश्वर आहे.सर्व लोक त्याची लेकरे असल्यामुळे ईश्वराच्या मालकीच्या जमिनीचा।
--------------------------------
हितबोध
उपभोग सर्वांना सारखाच घेण्याचा अधिकार आहे हे लक्षात ठेवा. दोन हजार वर्षांपूर्वीपासूनच आपल्या पवित्र मायभूमीत सब भूमि गोपालकी असा उदात्त प्रचार चालू झाला होता. ती आपली संस्कृति मध्यंतरी लुप्त झाली; तिचेच आता पुनरुज्जीवन आपणास करावयाचे आहे.
मोठेपणाचे गमक बदलले !
आपल्याजवळ भक्कम जमीन आहे, म्हणून व्यर्थ अभिमान बाळगण्याचे दिवस आता राहिले नाहीत. कोणी किती जमीन मिळवली किंवा कोणाजवळ किती द्रव्य साचले यावर आता माणसाचा मोठेपणा अवलंबून नाही. कोणी किती दान दिले, किती त्याग केला, ही गोष्टच माणसाच्या मोठेपणाचे गमक ठरणार आहे. जो कोणी हे भूमिदान देण्यास
यावेळी माघार घेईल, त्याला ते आज ना उद्या कायद्याच्या बदल्यामुळे किंवा काळाच्या तडाक्यामुळे देणे भागच पडणार आहे. खरा युगधर्म आणि सर्वात्मक ईश्वराची भक्ती आज याच मार्गाने साध्य होणार आहे.
देशभक्तीतून देशभक्ती आणि देशभक्तीतून विश्वव्यापी वृत्ती हाच मनुष्याचा विकासमार्ग आहे. माणूस तीन प्रकारचा आहे- हैवान, इन्सान, भगवान! स्वत:साठी दुसऱ्याचे बळी घेणारा तो हैवान, नेकीने चालणारा तो इन्सान आणि दुसऱ्याचे हित करण्यासाठी स्वत:ची होळी करणारा तो भगवान ! अशा एक भगवानस्वरूपी तपस्वी माणसानेच गरिबांच्या
हिताच्या तळमळीने प्रेरित होऊन भूदानयज्ञाचा श्रीगणेशा केला आहे.
अति स्वार्थ म्हणजे मृत्यूची आराधना !
बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगून आलेल्या पांडवांना कौरवांनी त्यांच्या हक्काची भूमि द्यावी, संपूर्ण राज्य नसले तरी एक गाव तरी द्यावे, म्हणून भगवान श्रीकृष्णाने मध्यस्थी केली. परंतु राज्यमदाने
धुंद झालेल्या कौरवांची स्वार्थलोभी वृत्ती सुईच्या अग्राइतकीही भूमि
---------------------
हितबोध
देण्यास तयार नव्हती. त्याचा परिणाम अखेर एका भयंकर महायुध्दात झाला आणि करोडो. लोक मृत्युमुखी पडून, कौरवांना संपुर्ण जमीनच नव्हे तर प्राणही गमावून बसणे भाग पडले, ही गोड आपणास करीत आहे. भगवद्रूप सज्जनांची आज्ञा शिरसावंद्य मानुन वेळीच आपल्या अती स्वार्थाला आळा घालणे सर्वांच्या हिताचे होईल यात शंका नाही.
आपल्या देशात मालकी हक्काच्या अतिरेकी अहंकाराने अती स्वार्थांधतेने मोठ्या लोकांनी गरिबांना चेंगरून टाकले आहे. भुक दारिद्रय व कष्ट यामुळे बहुसंख्य जनमुदायात असंतोषाचा अग्रि धुमसु लागला आहे. त्या ज्वाला भडकू नयेत यादृष्टीने त्यांचे प्रकट प्रदर्शन हेच भूमिदान यज्ञाचे घोषवाक्य आहे. देशात धुमसणाऱ्या या अग्गिज्वालांची
उपेक्षा केली किंवा जबरदस्तीने त्यांना दाबून टाकण्याचा प्रयत्न केलातर, ती आग तर शमणार नाहीच पण उलट तिचा भडका उडून ती आवाक्याबाहेर पसरेल. हा प्रचंड देशव्यापी वणवा नंतर काबूत आणणे अशक्य होईल. धुमसणाऱ्या भुकेच्या आगीचा भडका उडून त्यात वरिष्ठ समाजाचाही विध्वंस होतो, असा इतिहासाचा अनुभव आहे. म्हणूनच
ही आग वाढणार नाही अशी दक्षतेने काळजी घेणे आवश्यक आहे. आणि भूमिदान हा त्यासाठी सुंदर असा शामक उपाय आहे. देशात मानवता व समानता यांचे साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी म्हणजेच चळलेल्या व्यवहाराला परमेश्वराने अधिष्ठान मिळवून देण्यासाठी तो एकत्र पवित्र असा महान यज्ञ आहे.
सगळ्या मिळुनी सुखी व्हा सगळे !
आपल्या देशात आपल्याइतकाच हक्क असलेल्या आपल्या शेकडा९० टक्के लोकांची वर्षानुवर्षे विटंबना होत आहे .अशी अति
----------------------------
हितबोध
विषमता ही ईश्वराला किंवा निसर्गालाही मान्य नाही. जे जे ज्यांचेजवळ जास्त असेल ते ते त्यांनी इतरांना देऊन समानतेच्या भूमिकेवर समाज टिकवून धरावा, यातच सर्वांचे कल्याण आहे; आणि हाच क्रान्तिकारी मूलमंत्र विनोबाजींनी सांगितला आहे. मोठमोठ्या राजांनी व धनिकांनी यज्ञादिकांच्या निमित्ताने आपले द्रव्यभांडार खुले करून व समाजहिताच्या कार्यासाठी अपार दान देऊन, समाजात संपत्ति खेळती ठेवण्याचे कार्य वेळोवेळी केल्याचे शेकडो दाखले आपल्या इतिहासात आहेत.
राज्यवैभवाचा त्याग करणाऱ्या हजारोतेजस्वी पुरुषांचे आदर्श या देशापुढे आहेत. भारत देश अशी भगवानश्रेणीची माणसे उत्पन्न करण्याची खदान आहे. इतस्त्र तत्वज्ञान खूप असेल पण असा पुरुषार्थ क्वचितच आढळेल.
यज्ञदानतपावर आधारलेली भारताची ही संस्कृति वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळेच केवळ अहिंसेने, नुसत्या भूदानयज्ञाच्या निमित्ताने, भूदानयज्ञाच्या निमित्याने आर्थिक क्रान्ती आपल्या राष्ट्रात होणे शक्य आहे.
कालगती ओळखून पाऊल टाका !
भूमिदानाच्या मंत्राप्रणाणे आपण वागू लागलो तर, विषमता वाढविणारी मालकी नष्ट होऊन येथे समता नांदू लागेल; दैन्य संपून देशात सुखसमृद्धी वाढू लागेल; भारताची उज्ज्वल संस्कृती पुन्हा जगाच्या गुरुस्थानी अधिष्ठित होईल; शोषणरहित असे ग्रामराज्य निर्माण होऊन संगळ्यांचाच विकास होऊ लागेल. हे कार्य सरकार केवळ कायद्याच्या
बळाने करून घेऊ शकणार नाही. समाजाच्या विचारात व हृदयात अनुकूल बदल झाल्याशिवाय कायदा उजेड पाडू शकत नाही व बळजबरीने केलेली गोष्ट ही चांगला टिकाऊ परिणामही करू शकत नाही. यासाठीच ही विचारजागृती समाजात सर्वत्र अत्यंत झपाट्याने केली जाणे अगत्याचे आहे. या गोष्टीला विरोध करणारे स्वत:ची हानी
------------------------------
हितबोध
करून घेतील, असा निसर्गाचाच ओघ आहे.
या भूदानयज्ञात जनतेचा जो प्रचंड उत्साह व जिव्हाळा कि येतो, तो या गोष्टीचाच निदर्शक आहे की, समाजात समतेचा विचारयत बेफाम वेगाने वाहू लागले आहे. या प्रवाहाला वाईट वळण न लागता शांततेच्या मार्गाने समाजाला सुखमय स्वरूप प्राप्त व्हावे असेच कोणीही सुज्ञ माणूस म्हणेल, त्यादृष्टीने भूदानवाच्या रूपाने अभिनव क्रांतीचे है
अमोघ अस उदयास आले आहे ही गोष्ट लक्षात घेऊन, या यज्ञात सर्वस्व अर्पण करण्याची तयारी प्रत्येकाने केली पाहिजे.
विचारक्रांतितूनच टिकाऊ समाजक्रांती!
कोणी कोणत्याही संस्थेचे अथवा पक्षाचे असोत, त्यांनी यापुढे हा पुनित यज्ञ यशस्वी करण्याच्या कामी रात्रंदिवस झटले पाहिजे. आपापल्या क्षेत्रातूनच का होईना, प्रत्येकाने या कार्याला यथाशक्य प्रोत्साहन दिले पाहिजे. लोकांचे हृदयपरिवर्तन होऊन ते स्वयंस्फूर्तीने भूमिदान करतील अशी उच्च भावना त्यांच्यात प्रेमाच्या मार्गाने जागृत केली पाहिजे.
विनोबाजी म्हणतात, मला जमीन किती मिळाली याचे महत्त्व नाही, विचारपरिवर्तन किती झाले हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. अर्थात् दबाव शकून जनीन मिळविण्याऐवजी, लोकांची हृदये जिंकून व त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देऊनच भूदान मिळविता आले पाहिजे. काम करणारामध्ये जर सत्यता आणि जिव्हाळा असेल तर त्यांचा इष्ट परिगाम जनतेवर झाल्याखेरीज राहणार नाही.
इंग्रजांच्या राज्यात लोक गांधीजींच्या चळवळीची थट्टा करून म्हणत असत की, चरख्याने का कधी स्वराज्य मिळू शकते? परंतु आश्चर्यवत् वाटणारी तो गोष्ट आज सत्य झाली आहे. त्याप्रमाणेच विनोबाजीद्वारा प्रचारित भूमिदान यज्ञाद्वारे केवळ अहिंसक मार्गाने
-------------------------------
हितबोध
आर्थिक क्रांतीचे सुखस्वप्नही प्रत्यक्षात येईल यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. गावोगावी जाऊन आपण लोकांना समजविणे पाहिजे की, जमीन कसणारांची आहे. आणि त्यांना हक्क त्यांना देणे आपले कर्तव्य आहे. हेच कार्य प्रधान समजुन यावर्षी अन्य कामांना गौण स्थान देण्याचा मी निश्चय केला आहे. सर्वांनी जर मनावर घेतले तर हे यज्ञकार्ये अल्पावधीत सफल झाल्या शिवाय राहणार नाही, असा विश्वास वाटतो, आजच्या या प्रसंगी जगच्चालक परमेश्वराला अशी प्रार्थना आहे की, आचार्य विनोबांना उदंड आयुष्य लाभावे आणि त्यांच्या संकल्पना प्रमाणे भारतात खून खराबिशिवायच अपेक्षित आर्थिक क्रांती उदयास यऊन हा अद्भुत चमत्कार साऱ्या विश्वाने चकित नेत्रांनी अत्यंत लवकर प्रत्यक्ष पाहून नवी लाट सर्वत्र निर्माण करावी!
........…..…...…..