संतांचे खरे कार्य

 २. राष्ट्राच्या उत्कर्षाची संतांवरील जबाबदारी!

पिकली पंढरी पिटला धांडोरा । केणे आले घरा सभाग्यांच्यात
चंद्रभागे तिरी उतरले बंदर । आले सौदागर साधुसंत ।।
वैष्णव मिळोनी केला असे साठा। न घेतो करंटा अभागिया।
एका जनार्दनी आले गि-हाईक । वस्तु अमोलिक साठविती ।।

         ग्रहांची युति झाली म्हणजे जगात जसे मोठेमोठे उत्पात होत असतात तसेच शुभग्रह एकत्र आले म्हणजे जगात महत्त्वाच्या अशा चांगल्या घडामोडीही आपोआप घडू लागत असतात; हाच नियम संतसज्जनांच्या मेळाव्यालाही लागू आहे. हे दैवी शक्तीचे पुरुष लोककल्याणाच्या तळमळीने एकत्रित झाल्यास त्यातूनच जगात शुखशांति नांदविणारी
ईश्वरीशक्ति उदयास येत असते. म्हणूनच पूर्वीच्या काळी महाराष्ट्राचे स्फूर्ति केन्द्र अशा या पंढरी क्षेत्रात श्रीज्ञानेश्वरनामदेवादी संतांनी दोन्ही बाही संतांची सभा। सिंहासनी उभा श्रीविठ्ठल याप्रमाणे पांडुरंगाच्या
अधिष्ठानाखाली संतसभा भरविण्याची प्रथा सुरू केली होती. सर्व संत आपापले पंथभेद आदी विसरून, जनतेत एकाच दिशेने प्रचार करण्याची स्फूर्ती येथून घेऊन जात होते.

   शीतल सूर्य व दयाळू 

          परंतु कालांतराने ती प्रथा बंद पडली; इतकेच नव्हे तर एकत्र काला करण्याची प्रवृत्ती देखील लोकात उरली नाही. अपनी अपनी तानमें चिड़ियाँ भी मस्तान है असा चुथडा झाल्यामुळे जनतेला एकसूत्री मार्गदर्शन होईनासे झाले आणि सारा समाजच गोंधळात पडला.
--------------------------------
हितबोध


संतांचे खरे कार्य

       तुका म्हणे धर्म
       रक्षावयासाठी।
       देवासही आटी जन्म     
        घेणे।।

        अर्थात् जगात न्यायनीतीने रक्षण करण्यासाठी स्वतः देवालाही अवतार घेऊन श्रम करावे लागतात; तेथे संतांनी जर ते कार्य न केले तर देवाला संतोष कसा वाटेल? देवासाठी जीवन घालविण्याचा संकल्प केलेल्या संतांना देवाच्या दीन लेकरांचे दुःख उघड्या डोळ्यांनी पाहता येईल काय? देवाचे म्हणोनि देवी अनादर । हे मोठे आश्चर्य वाटलसे।
आता येराजनां म्हणावे ते काई? जया भार डोई संसाराचा।। हे संत तुकारामांचे शब्द आपण ध्यानात ठेवले पाहिजेत. रंजल्या-गांजल्या
जीवांना दुःखातून सोडविण्यातबखरे साधुत्व आहे. तुका म्हणे संतपण याचे नांव । जरी होय जीव सकळांचा। हे विसरून चालणार नाही.
एक काळ असा होता की, त्यावेळी आत्मसाक्षात्काराचा विचार करण्यासाठी संतांना भरपूर वाव मिळत असे, पण आता परिस्थिती बदलली आहे. डोळ्यादेखत जनता होरपळल असता डोळे लावून ध्यान करणे ही भक्तिनिष्ठा नव्हे-हा दुष्टपणा ठरणार आहे. संत ते समय
ओळखती वेळ।। हे संतपयन दृष्टीपुढे ठेवूनच यापुढे आपण वागले पाहिजे.

     न देखवे डोळां ऐसा हा आकांत । परपोडे चित्त दु:खी होते।
अशी आपली स्थिती झाली पाहिजे. तसेच ज्याला जसा वाटेल तसा उपदेश त्याने समाजाला करीत सुटावे, हा प्रकार बंद करून, बोलणे ते आम्ही बोलो उपयोगी। पडिले प्रसंगी काळा ऐसे - असा निर्धार सर्वांनी केला पाहिजे. कारण आज संतांत एकसूत्रता नसल्यामुळेच धर्मात अराजकता निर्माण झाली आहे.
---------------------------
हितबोध


धार्मिक क्षेत्र म्हणजे जीवनदृष्टीचे केन्द्र
         लोकोद्धाराचे बाशिंग बांधलेल्या संतांवर समाजाच्या सर्वागीण उन्नतीची जबाबदारी नाही असे कोण म्हणेल? धर्म हा समाजाच्या धारण, पोषण व प्रगतीत आहे; तेव्हा सामाजिकता व राष्ट्रीयता यांपासून तो अलिश कसाराह शकेल? समाजाला आपल्या जीवनातील दु:खे नाहीशी
करण्याचे आणि आपली उन्नती करून घेण्याचे मार्गदर्शन जर थोर लोकांकडून आणि तीर्थक्षेत्रातून मिळणार नसेल तर त्यांचा काय उपयोग? धार्मिक क्षेत्र हे देवाचे डोक्यावर बेलपत्ती चढवणे, घंटे बडवणे व ऐदयासारखे दिवसभर पोथी वाचीत बसणे एवढ्यासाठीच नसते, तर ज्या क्षेत्रातून समाजात सुव्यवस्था निर्माण केली जाते त्यालाच धार्मिक
क्षेत्र म्हणतात. या दृष्टिकोनातूनच आपल्या प्राचीन संत-महंतांनी कार्य केले आहे आणि आपण देखील त्याच मालिकेतील आहात. विष्णुमय
जग वैष्णवांचा धर्म हा त्यांचा सिद्धांत जगापासून दूर पळायला सांगणारा नव्हता, तर अवघाचि संसार सुखाचा करीन। आनंदे भरीन तिन्ही
लोक  अशी प्रतिज्ञा करून कमर कसायला लावणारा होता.

राजसत्ता आणि संतकार्य

       अन्याधी लोकांनी सजनांचा छळ करावा व आम्ही फक्त टाळ वाजवावेत, असा उपदेश देण्यासाठी तीर्थस्थानी मेळे भरविले जात नसत; तर त्यात त्यांचा फार मोठा उद्देश होता. परस्परांचे प्रेम वाढवावे व एकमेकां सह्य करून सर्वांनी जीवनाचे ध्येय गाठावे, हीच त्यांची दृष्टी होती. आपल्या जिवंत उपदेशाने त्यांनी सर्व समाज एका सूत्रात बांधला
होता. अनेक राजे आले नि गेले, पण बहुजनसमाजाच्या हृदयावर त्या संतांचेच अधिराज्य अजून देखील चालू आहे; इतके त्यांचे कार्य सखोल होते. जनमानस समाजावून घेऊन मनोवृत्ति निर्माण करण्याचे जे कार्य

------------------------------
हितबोध


संत करीत असतात ते राजसत्तेकडून देखील होऊ शकत नाही. कायद्याच्या बळावर समाजाचे बाह्य  नियंत्रण करते तर संत ह हृय परिवर्तनाद्वारे समाजाचे मार्गदर्शक व संचालन करीत असतात. त्यामुळे कायद्याने न  होणाऱ्या गोही संतवाणी करू शकते. कागदा अपुरा पडतो, तेथूनच
संतकार्याला सुरुवात होते. अर्थात सर्व संतांनी एका धोरमाने व संघटीत शक्तीने कार्य केले तर, समाजावे तुकडे न होता समाजाला हवे तसे सुंदर रूप देता येणे काही कठीण नाही.

 समता वर्तावी, अहंता खंडाधी

       आज भारतासमोर अनेक अटीतटीले प्रश्न उभे आहेत. देशात अन्न नाही. आणि उदद्योगाकडे लोकांची ओढ नाही. लोकात निरक्षरता, अज्ञान आणि गावात घाण साचली आहे. गावोगावी पार्टीचे झगडे आहेत.व्यसनाचे अड्डे आहेत व कोणी पंथासाठी तर कोणी पक्षासाठी लोकांना पिळत आहेत. परदेशातील लोक पंधरा रुपये रोज कमावतात तर आमच्या
धार्मिक भारतीयांना दोन आणे न  मिळता भीक मागावी लागते. एकीकडे करोडोपती तूपरोटी खातात तर दुसरीकडे करोडो कामक-यांना लागोपाठ एकादशः पडतात केवढे भयानक विषमतेचे चित्र आहे हे।
ईश्वर न मानणा-या राष्ट्रांनी समतेचा सक्रिय घोष करावा आणि
कोण्याहि जीवाचा न घडो मत्सर म्हणणाऱ्या आम्ही समतेची वेदवाक्ये फक्त तोंडातच ठेवावी, हा कुठला वेतान्त ! हे कसले भजन !

         आजच्या कुजलेल्या समाजात चारित्र्य निर्माण करणे, ही भयानक विषमता नष्ट करणे आणि .समाजाचे अज्ञान व दुबळेपण घालवून नवे राष्ट्र उदयास आणणे हे आजचे प्रश्न सर्व संतांनी हाताळलेच पाहिजेत, पंचदेष, स्पृश्यास्पृश्य, जातीयता, अमानुष रुढया, स्त्रियांची गळचेपी, लग्रादी कार्यातील अपव्यय, गुंडांची शिरजोरी, खेड्यांची दुर्दशा इत्यादी

-------------------------------
हितबोध


दुःखदायी गोष्टी हरप्रयत्नांनी दूर करून समाजाची सर्वांगीण उन्नती करणारे ज्ञान व कार्य आपण सर्वत्र पसरले पाहिजे .अर्थात नुसती भाषणे करूनच यापुढे काम भागणार नाही तर काही धोरण बांधून सर्वानुमते प्रत्यक्ष कार्यक्रम हाती घेतले पाहिजेत. विषमतेला नमवीमऱ्या भूमी दानयज्ञासारख्या कार्यक्रमांना सहयोग देऊन, लोकांना वैराग्याच्या व मानवतेच्या बोधाने बुद्धीदान, धनदान, कला दान, श्रमदान ,आधी करण्यास आपण प्रवृत्त केले पाहिजे. तसे झाले तर अल्पकाळातच भारतात स्वर्गीय नदंवन फुलु लागेल, आणि पंढरीच नव्हे तर सारा भारत देश भुवैकुंठ बनेल. तेव्हा आपन सर्वजन आजच्या संमेलनात विशाल हृदयाने विचारविनीयम करूण नवोदित भारताच्या सेवेत रममान होण्याचा संकल्प करूया!

.................................