दिवाळी 

 ३. श्रीमंतांची दिवाळी आणि गरिबांची?

        व्यक्तिगत सुखासाठी वाटेल त्या सणावाराचे नांव घेऊन मनात येऊन ते खावे, प्यावे व खुशाल मजा मारावी, हेच जर दिवाळीसारख्या सणाचे महत्त्व असेल तर ते दुसऱ्या बाजूस-गरीब मजुरांच्या जीवनालाकिती घातुक ठरेल हे सांगावयालाच नको. याची कल्पना दिवाळसण आला म्हणजे गावात निरीक्षक बुद्धीने फिरून पाहिल्यावर सहज
येण्यासारखी असते. काही उपयोग नसताही निव्वळ शौक म्हणून एकाने बारूदखाना व फटाकडे उडवावेत आणि दुसऱ्या काही जणांजवळ खाण्यापिण्याच्या वस्तु घ्यायलाही पैसा नसताना कर्ज काढून त्यांनी या रूढ्यांना बळी पडावे नि त्याचे व्याज सोशीत पुढच्या दिवाळीपर्यंतही रडत दिवस काढावेत; अशी दिवाळी ही दिवाळी आहे की दिवाळखोरी,
हेच मला कळत नाही!

         इतरांसारखे करू नये तर धर्मबाह्य वर्तन होण्याची भीती नि चिंता लागून जाते. कारण, या महासणाला हौसेच्या खाण्याचे पदार्थ केलेच पाहिजेत; नवी वस्त्रे घातलीच पाहिजेत; लक्ष्मी कुठून तरी येईलच म्हणून कर्ज काढून सर्व दारे, खिडक्या, कोनाडे, भिंती यांवर किंबहुना
शेणखताचा उकिरडा, संडास व मागील खंडाऱ्यावर सुद्धा दिवे लावलेच पाहिजेत आणि अंगालाही उटणी, साबण नि सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान केलेच पाहिजे; नाहीतर आपण पापी होऊ-दरिद्री राहू, ही वेडगळ समज धर्मवीर म्हणविणाऱ्या रूढिवीरांनी करून दिली असल्याने ते संस्कार मनातून जात नाहीत; आणि त्याप्रमाणे करायला

----------------------------
हितबोध


जावे तर दुसऱ्याच दिवशी खाण्यापिण्याची मारामार होऊन दुःख भोगण्याची पाळी येते. आजतरी आमच्या लाखो गावातून सोहळा हा अशाच डावाडोल स्थितीत चालू आहे.

 सगळ्यां मिळुनी सुखी व्हा सगळे !

      हे सगळे माझ्या दृष्टीने तरी विपरीतच चालू आहे ! सणावाराला गोडधड न केले तर पाप लागेल, हे म्हणणे व्यर्थ आहे. पण निदान वर्षातून सणावाराच्या रूपाने येणाऱ्या काही ठराविक दिवशीही गरिबांना अंगभर वस्त्र नि पोटभर चांगले अन्न मिळू नये, असे कोण म्हणले? पण ते मिळण्याच्या मोबदल्यात त्यांना वर्षभर चिंता नि दुःख भोगण्याचा
प्रसंग यावा, हे तरी कसे मान्य करता येईल? समाजातील काही लोकांनी खूप चैन भोगावी नि या असंख्य गरिबांवर सणावारीही असा पेचप्रसंग यावा, ही धार्मिक व लक्ष्मीपूजक म्हणविणाऱ्या लोकांना किती नामुष्कीची
गोष्ट आहे ! यातून सरळ मार्ग हाच निघतो की, एकतर त्या गावच्या जमीनदाराने वा धनवानाने दिवाळीच्या सणाकरिता सर्व गाव आपल्या घरी आमंत्रित केले पाहिजे अथवा दुसरे असे की सर्वांना दिवाळी उत्तम प्रकारे करता येईल अशी व्यवस्था तरी करून दिली पाहिजे. अर्थात्ए का दिवाळीपुरतेच असे करून चालणार नाही. तेव्हा सर्वच
सणावारांच्या व्यवस्थेसाठी म्हणून गावातील सर्वच लोक आपापल्या रोजच्या उद्योगातून नित्याच्या गरजा भागवून सणावारांसाठी काही शिल्लक ठेवू शकतील अशी व्यवस्थाच करण्यात आली पाहिजे. नाहीतर हे सण, मानवांनी मानवाची फजिती करून ती हसत पाहण्यासाठी आहेत, असे का म्हणू नये?

 रावणाचे वंशज बनू नका!

       अशा दिवाळीपेक्षा होळीचा सण एकदाचा पुरवला. कारण त्यात शरीराता बाहेकट डाग पडतात; पण तेथे तर मनावरच डाग पडून ते

-----------------------------
हितबोध


प्रत्येक दिवशी सुखवीत असतात की, दिवाळी ही तुम्हा मोठ्या लोकांना मजा करण्यासाठी नि आमची फजिती करण्यासाठीच आहे! आणि वास्तविक त्यांचे म्हणणे तरी कुठे चुकते? आपणाला जनतेचे पोशिंदे किंवा विश्वस्त म्हणवीत असताही जनतेकडे पाहण्याची काळजी धनिक घेतात काय? आपल्या घरच्या मुलाबाळांची, लेकीबाळींची,
साळेजावयांची हौस फेडणे व त्यांना उत्तम अन्नवस्त्र नि उडवायला फटाकडे देणे, याची जशी काळजी घेतली जाते तशी, गावचा कोण माणूस फाटके घालून आहे, कोणाला धड खायला नाही नि कोणाची मुलं हिरमुसली होऊन रडत आहेत इकडे पाहण्याची दृष्टी कां असू नये? गरिबाच्या खुशीकडे बघण्याची ही जबाबदारी जो ओळखत नाही, त्याला मोठी नि समंजस म्हणण्यापेक्षा राक्षस म्हटले तर काय चुकेल?
राक्षसाची व्याख्या हीच आहे की, जो आपल्या स्वाधीन असलेल्या धनाचा, शक्तीचा व सत्तेचा उपयोग स्वत:च घेतो व आपल्याच मुलाबाळांना नटवण्यात सर्वस्व समजतो, किंबहुना यासाठी जो हरत-हेने दुसऱ्याचे रक्तशोषणही करण्यात आनंद मानतो तोच राक्षस ! एरव्ही रामात नि रावणात फरकच काय होता?

         राम अयोध्येचा राजा होता तर रावणही लंकेचा राजाच होता. दोघांच्याही जवळ अलोट धनसंपत्ती होती. पण एकाने देवांना-साधूंना बंदीवासात टाकून मजा भोगली तर दुसऱ्याने दुःखितांचे दु:ख निवारण करण्यासाठी वनवास भोगून सज्जनांच्या सुटकेकरिता प्राण पणाला लावून
युद्ध केले. शोषण आणि सेवा, एवढाच दोघांत फरक ! तेच शोषण जर आमच्या धनिकांना आवडत नसेल तर हा मानवी विकास थोडाच आहे! या देशातील एका तपस्व्याने पायी रखडत गरिबांना जमीन द्या, उद्योगधंद्यांना सहाय्य द्या, विद्यार्थ्यांना शिक्षण द्या म्हणून दारोदारी भटकावं व याच देशातील धनिकांनी आपल्या गावातील गरिबांची मुले

----------------------------
हितबोध


भीक मागताना बघूनही त्यांच्या व्यवस्थेचा उपाय शोधाण्याची चितां न करता दिवाळीच्या निमित्ताने बारूदखाना व भोजनात चबीना उडवावा, हे भूषणावह थोडेच आहे ! हा धर्म थोडाच आहे नि ही श्रीमंताची व्याख्या थोडीच आहे !! मग याला कोणताही समजदार माणूस दिवाळी
कसा म्हणू शकेल?

 दिवाळीतील दिव्य संकेत

      माझ्या मते तर दिवाळीची सध्या केली जाणारी व्याख्याच ची आहे. दिवाळीचे तीनही दिवस काही संकेतांनी सुरू करण्यात आले आहेत असे मी समजतो. ग्रामसफाई, शरीरस्वच्छता, बंधुभगिनींच्या प्रेमाच्या नात्याचा प्रचार, संपत्तीत पावित्र्याचे रक्षण, गोधन-प्रदर्शन इत्यादी गोष्टींचे महत्त्वाचे भाग दिवाळीत एकत्र आणलेले दिसून येतात.
उत्तम गोरक्षणासाठी गायी राखणारांना उत्तेजन देणे, पुढे भरपूर पिकांनी संपत्तीचा साठा वाढावा म्हणून श्रमिकांना उत्तम अन्न व अंगभर वस्त्र देणे नित्यांच्या कार्यात मदत करणे इत्यादी गोष्टींच्या संमीलनालाच दिवाळीचे रूप देण्यात आले असावे असे मला निश्चयाने वाटते. यांतील किती गोष्टी आपण गावाच्या विकासाच्या नि देशहिताच्या दृष्टीने आचरणात
आणतो, आपले कुठे चुकते नि खरोखर काय करायला पाहिजे, हे शोधण्याची व मार्ग सुधारण्याची प्रवृत्ती व्हावी हाच माझ्या लिखाणाचा हेतू आहे. एरव्ही कोणीही कणावर टीकाच करीत राहावे हा भाषणाचा वा लिखाणाचा उद्देश असू नये, तर परस्परांच्या चर्चेतून काही उपयुक्त
सार काढून ते लोकांच्या पुढे ठेवणे योग्य असते.

         रोजच्या जीवनातला शिळेपणा घालवून प्रत्येक सणावाराच्या निमित्ताने ग्रामशद्धी, शरीरशद्धी, धनशुद्धा, भावनाशुद्धी व रूढिशद्धी करावयाची असते. याशिवाय देशशद्धीहा हाऊ शकत नाही. हे छोटे-

------------------------------
हितबोध


छोटे उज्वल तंतू देशाला मजबूत करणारे असतात. परंतु हे सरळपणेसांगून लोकांना पटत नसल्याने, त्याला पापपुण्याचे नाव ठेवून व कथानकाच्या रूपाने परिणाम दाखविणारे बौद्धिक देऊन, ते लोकांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न धर्मप्रचारकांनी केलेला आहे नि धर्माच्या नावाने ते संस्कार लोकात रूढ करून टाकले आहे. पण जनतेने ते सर्व
आज झुगारून देऊन, सण म्हणजे खाण्यापिण्याची चैन व इतर चांगल्या गोष्टी म्हणजे माणसामाणसी (पुजाऱ्यादिकांच्या हातांनी) पार पाडावयाचे दंडक आहेत, अशी खास समजूत करून घेतली आहे. ही भ्रामक समजूत काढून टाकून त्यांना प्रत्येक सणावाराचे यथार्थ रूप व महत्त्व शाळा,
कॉलेजातून व घराघरातून कळविले जाणे आवश्यक आहे.

    नरकासूर अजून मेला नाही!

     घरात लक्ष्मी कुणीकडून येईल याचा नेम नाही; म्हणून घरासभोवतालीही झाडझूड करून गावात सर्वत्र सफाई केली पाहिजे नि सर्वठिकाणी प्रकाश करून ठेवला पाहिजे; नाहीतर ती परत जाईल नि तुम्ही भिकारीच राहाल हे मोठ्या चातुर्याने धर्माने लोकांना गृहशुद्धी व ग्रामशुद्धीच्या हेतुपूर्तीसाठी सांगून ठेवले आहे. अर्थात् हे कार्य नेहमी करणेच आरोग्य व वैभव देणारे आहे. परंतु लोक नेमके लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच ते कार्य करीत असतात, एरव्ही लक्ष्मी झोपली आहे असे
त्यांना वाटत असते की काय कोणास ठाऊक? वास्तविक नेहमी स्वच्छ राहणाराच लक्ष्मीवंत होतो, हे सर्वांना समजावून सांगणे आज अगत्याचे झाले आहे.

        पावसाळ्यात चिघळलेल्या गलिच्छ गटारांची दुर्गंधी व त्यात उत्पन्न झालले रोगजंतू यांनी गावात नरकासुराचे राज्य सुरू झालेले असते. खरूज, गजकर्ण, मलेरिया, कॉलरा इत्यादी अनेक संसर्गजन्य रोग व

--------------------------------
हितबोध


त्वचारोग पावसाळ्यात वाढीस लागत असतात आणि पचनशकतीला कमजोरी आल्यामुळेही रोगांचे शरीरावर जोरदार आक्रमण होत असते. ते सर्व निघून जाऊन पुढच्या शुद्ध जीवनाला सुरुवात होणे अगत्याचे असते. हे सर्व दृष्टीसमोर ठेवूनच धर्म भावनेने नरकासराचा वध आणि
अभ्यंगस्नान यांची सुंदर जोड घालून देण्यात आली आहे. ग्राम शुध्दी व देहशुद्धी ही अर्थात् वर्षांतून एकदोन दिवसांचीच बाब ठरावी असा त्यात उद्देश नाही. रोज पहाटेस स्नान करून अंगावरचे मळ नि जीवजंतू घालविण्याची व निर्मळपणाने राहण्याची आदत लावण्याचा तो समुहर्त आहे. तसे जर न मानले तर, इतक्या वर्षांपूर्वीच्या नरकासुराचा वास वर्षातून एकदाच एवढ्या साऱ्या लोकांना लागतो असे म्हणणे भाग
आहे व तो अर्थ बुद्धीला पटू शकत नाही. फक्त नर्कचतुर्दशीच्याच दिवशी अभ्यंगस्नान करावे आणि एरव्ही भाग्यवान समजून १० वाजेपर्यंत खुशाल
झोपून राहावे, तोंड धुण्यापूर्वीच चहाबिडी प्यावी व आधी भोजन करून मग फुरसदीने स्नान करावे, हा अर्थ मला तरी कधीच पटणार नाही.

 अभ्यंगस्नान कां व कधी?

          हिवाळ्याच्या रूक्ष वातावरणात कातडीला स्वच्छ व स्निग्ध । ठेवण्यासाठी अभ्यंगस्नानाची योजना असून, या विशेष दिवशीच तिची सुरुवात करण्यातही एक उद्देश आहे. नेहमीसाठी आवश्यक असणाऱ्या आदती लावताना त्यासाठी विशेष दिवस निवडला तर उत्साहाने नि साहजिक ओघानेच माणसाचे मन तिकडे वळते. उन्हाळ्यात थंड
मडक्याचे पाणी पिण्यास धर्माने ठराविक दिवस निश्चित करून दिला आहे. त्यात ऋतुमानाच्या विचाराबरोबरच त्या आदतीचे पावित्र्यही असते. अशा वेळी त्या त्या गोष्टींचे महत्त्व सहज पटून समाजात जरूरीच्या गोष्टी परंपरेनेचे अंगवळणी पडू लागतात. नर्कचतुर्दशी हा पूर्वी मारलेल्या

--------------------------------

हितबोध


नरकासुराच्या आठवणीचा दिवस नसेल असे मला म्हणावयाचे नाही; पण ती आठवण आमच्या जीवनात दृढ करण्याच्या पाठीशी आमच्या राहणीतला नरकासुर मारण्याचाच उद्देश असावा आणि त्या निमित्ताने
जीवनातले एक मुख्य अंग-शरीरादिकांची स्वच्छता-याचे महत्त्व सर्वांनी ओळखून वागणूक करावी, असे माझे निश्चित मत आहे.

  भगिनी-प्रेमाचा सुमुहूर्त

           अनेकांच्या भगिनी ह्या अनेकांच्या स्त्रिया आहेत व त्याच अनेकांच्या आयाही आहेत. हे जाळे एवढे मोठे आणि इतके गुंतागुंतीचे आहे की त्यातून, आपल्या पत्नीशिवाय सर्व स्त्रिया ह्या आपल्या आईबहिणी आहेत. असे मानल्याशिवाय, सुटकाच होऊ शकत नाही. सर्व स्त्रियांकडे आई।
वा बहिणीच्या नात्याच्या दृष्टीने आपण बघावे आणि त्यांच्या प्रेमळपणाचे, सहनशीलतेचे कौतुक करावे, सुपुत्राची जननी व वीरपत्नी म्हणून देवीतुल्य आदराने त्यांच्याकडे पाहावे किंबहुना नेहमीच मुलीकडेमहिलांकडे पूज्य भावनेने पाहण्याची दृष्टी वाढवावी, याचे स्मरण करून देणारा हा भाऊबीजेचा दिवस निश्चित करण्यात आला व तसे न वागण्यात पाप होईल हे बंधन धर्माने लोकांना घालून दिले आहे. वीर्यशक्तीचे संरक्षण, समाजाची सुव्यवस्था व माणुसकीची उत्कृष्ट मर्यादा यादृष्टीने ही गोष्ट अत्यंत सहायक असून हेच या दिवसाचे खरे महत्त्व आहे.

           या दिवसाचा अर्थ जर कोणी असा करीत असेल की एकच दिवस बहिणीने भावास ओवाळण्याचा आहे व बाकीचे दिवस रोज झगडा करण्याचे आहेत; किंवा एकच दिवस पतिखेरीज सर्व पुरुषांना भाऊ समजण्याचा आहे नि बाकीचे सर्व वाईट दृष्टीने बघण्याचे आहेत, तर ती गोष्ट केव्हाही बरोबर ठरणार नाही. नात्यातील पवित्र भावना विकसित
करावी, सर्वच स्त्रियांकडे व पुरुषांकडे आदराने बंधु-भगिनीप्रमाणे

-------------------------------

हितबोध


पाहण्याचा परिपाठ ठेवावा, याची दीक्षा देणारा हा दिवस आहे. चंद्राच्या कथेने ग्रंथकर्त्यांनी मोठाच धडा घालून देऊन, नेहमीची आदत लावण्याची सर्वांनाच दृष्टी दिली आहे.

      तेच खरे लक्ष्मीपूजन !
 
        लक्ष्मीपूजनाचा दिवसही तितकाच महत्त्वाचा आहे; पण वर्षभर भलेबुरे कर्म करून पापाने मिळवून आणलेल्या धनाची धूमधडाक्यारे पूजा करणे हा मात्र त्याचा अर्थ असूच शकत नाही, लक्ष्मीचा म्हणजे धनाचा आय-व्यय. जोडूनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी  याप्रमाणे चांगल्या मार्गाने करण्याच्या मुहूर्ताचा तो दिवस आहे.
लक्ष्मी ही गरिबांच्या कष्टाने आमच्याजवळ आली आहे; त्यांच्या हिताकरिता व सर्वांच्याच सुखाकरिता या लक्ष्मीने घरा-घरात नांदावे । नि आम्ही सर्वांनी पावित्र्यपूर्वक तिचा योग्य तो लाभ घ्यावाः । माझ्याजवळच्या धनात संपूर्ण गावाचे कल्याण व्हावे या संकल्पाचे पूजन म्हणजेच लक्ष्मीचे पूजन! लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बहुधा सर्व माल किंवा धन घरी आलेले नसते. फक्त यांच्यासंबंधी संकल्पच करावयाचा
असतो की, मी या धनाचा विनियोग-त्याची विल्हेवाट अमुक प्रकारे करीन. मागच्या वर्षात केलेल्या आय-व्ययाचा आढावा घेऊन पुढील वर्षाचे संकल्पित हिशेब व कार्याची रूपरेखा आखणे, अर्थात् मागील वर्षापेक्षा किती अधिक संपत्ती मिळवायची हा विचार करण्याऐवजी किती अधिक सत्कार्यात पैशाचे वितरण करायचे हे ठरवणे याचाच हा सुमुहूर्त आहे!

     या शुभ-संकल्पाकरिता गावातील सर्व लोकांना धनिकांनी बोलावूनअसे जाहीर करण्याचा मळ रिवाज आहे की, हे गरिबानी, मजुरानो व माझ्या इतर बंधूंनो! या धनात व्यवहारदृष्ट्या आपण सर्वच भागीदार

------------------------------

हितबोध


आहात. आपण सर्व मिळून  सर्वांकरीता हा व्यवहार करीत आहोत. तुमच्या सर्वांच्या प्रसन्नतेत तुमची व माझी थोरवी आहे.हे धन गावाचे आहे. त्याचा मी  संरक्षक आहे. तेव्हा याचा वाईट उपयोग माझ्याकडून होऊ नये याची सर्वांनीच दक्षता घेतली पाहिजे नि परस्परांच्या सहकार्याने आपन सर्व सुखी झालो पाहिजे. आपणा सर्वांना ही उद्योगवर्धिनी, धनधान्योत्पादिनी ,व उत्साहदायिनी लक्ष्मी मदत करो, म्हणूनच हे सामुदायिक पूजन आहे! याप्रमाणे प्रामाणिक लक्ष्मीपूजन झाल्यास गावातील दुःखे आपोआप मिटतील हे निर्विवाद आहे. परंतु आज लोकांनी रडावे व धनिकांनी बँडबाजे लावून फटाकडे उडवावेत हा शुद्ध
आप्पलपोटेपणाचा कहर बहुधा सुरू आहे. धनिक मूळची भूमिका विसरले म्हणूनच संपत्तिदानाची मोहीम आज सुरू करण्याचा प्रसंग आला आहे. दानाशिवाय संपत्ती शुद्ध होऊ शकत नाही आणि अशुद्ध संपत्ती फार काळ टिकत नाही व टिकली तरी हजारो दुःखेच निर्माण करते, हे पटवून देण्याचा आज काळ आला आहे.

 गोधन हेच भारताचे जीवनधन

        गोधन हेही भारताचे मुख्य धन आहे. गायीबैलांवरच भारतीयांचे वैभव अवलंबून आहे. वसुबारस आणि गो-क्रीडन यांना या उत्सवात प्रामुख्याने स्थान देण्यात हाच हेत आहे. सर्व गावातील गायींना व त्यांच्या खेळ क्रीडांचे निरीक्षण मोठ्या उत्साहाने व कौतुकाने करावे.कोणत्या -पालकाने आपली गाय उत्तम दूध देणारी,आदर्श वळू देणारी, देखणी, अगांने धष्टपुष्ट व प्रसन्न चित्ताने कोणाजवळही येणारी अशी ठेवली आहे, देवाप्रमाने तिची सेवा केली आहे हे पाहुन त्याला इनाम द्यावा व आदर्श गायींनाही त्यांच्या उपयोगी पडतील अशा पात्रांची व शृंगारसाधनांची

--------------------------------

हितबोध


बक्षिसे देऊन गौरवाने यासाठीच हा दिवस वर्षेकाठी ठेवला आहे. जनतेत गायीगुरांची व्यवस्था करण्याची आस्था वाढावी व समाजासमोर उजळ माथ्याने आपली गाय  ठेवण्याचे सक्रीय सहास सर्वात यावे यादृष्टीने या महत्त्वपूर्ण दिवसाची योजना आहे. गोपाल गुराख्यांनी प्रसन्नपणे गौरव पुन्हा नव्या दमाने व आपुलकीने कामी लावावे आणि अशा रीतीने समाजातील लहान-मोठ्या थरात नवी चेतना निर्माण करावी ही गोष्ट फार मार्मिकतेने पूर्वीच्या लोकांनी या सणात गोवून टाकली आहे!

................................