व्यायामाचे महत्त्व
५. दुबळेपण म्हणजे दुर्जनांना उत्तेजन
व्यायामाचे बाबतीत आमच्यातील कितीतरी लोकांचा असा गैरसमज झालेला आहे की, त्यांना व्यायाम हा काही ठराविक लोकांकरिता आहे असेच वाटते. ते म्हणतात- माणसाने कवायत करून धष्टपुष्ट होणे किंवा लाठीकाठी फिरविणे हे गुंड मनोवृत्तीचे लक्षण आहे- पोषण आहे, अशा कोत्या विचाराच्या लोकांना मला असे सांगावयाचे आहे की, बाबांनो ! तुमची अशी मनोवृत्ती करून देणारांचा
तुम्हाला लुटण्याचा-तुमच्यावर कुरघोडी करण्याचा विचार आहे; हे विसरू नका. तुम्ही व्यायामबाज बनू नये म्हणणारांचा तुमच्या दुबळेपणापासून वाटेल तसा फायदा घेण्याचाच मानस होता, निदान त्यांना तसा अनुचित फायदा आजपर्यंत घेता आला हे उघडच आहे. वास्तविक प्रत्येक मनुष्याचा प्रत्येक शरीरधारी प्राण्याचा आपले शरीर निरोगी व बलसंपन्न ठेवण्याचा जन्मसिद्ध हक्क आहे, निसर्गसिद्ध धर्म
आहे. बलिष्ठ, ओजस्वी, वीर्यवान, आरोग्ययुक्त व नेहमी सेवेस तत्पर असे माणसाचे शरीर जर नसले तर त्याला जीवनाचा आनंद अनुभवता येणार नाही; किंबहुना जगात जिवंत राहण्याचाही अधिकार नाही. दुर्बल व कर्महीन माणसावर प्रेम करण्यासाठी ही सृष्टी नटलेली नाही. बलहीन माणसाचा व्यवहार हा पोरखेळ ठरतो आणि त्याचा परमार्थ हा
मनाचे मनोरे बनून हवेत विरून जातो. जगातील कोणतीच वस्तु त्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे त्याच्या हाती लागत नाही आणि सर्व बाबतीत पराधीनता व पंगुपणाच वाट्यास येऊन त्याचे जीवन निराशा
-------------------------------
हितबोध
व चिंता यांच्या भाराखाली दबून जाते.
खरे पाहता अशा निर्बल मनुष्याची गणना ही मनुष्यातच करायला नको आहे; कारण अशा लोकांच्या खोगीरभरतीमुळेच राष्ट्राचा सत्यानाश होत आला आहे. दुबळेपण म्हणजे संकटांना आव्हान, शजूंना निमंत्रण
व दुर्जनांना उत्तेजन, हा इतिहासाचा सिद्धान्त आहे. आमच्या भारत देशात अशा आळशी, कर्महीन, बुद्धिशून्य व हतबल लोकांचा सुकाळ झाल्यामुळेच त्यांचा देशाभिमान दुबळा आणि संस्कृतीचा प्रवाह नष्टभ्रष्ट झाला आहे. दुष्ट दुर्जनांनी जग बिघडवून टाकले असे म्हणण्याऐवजी मी
असेच म्हणेन की सात्त्विकतेचे पांघरूण घेणाऱ्या लोकांनी आपल्यामध्ये दुबळेपणा वाढविला, त्यामुळेच हा घात झालेला आहे. गुंड प्रबल झाले असे नाही; पण सज्जन समाज दुर्बल झाला व त्यामुळे बाकीच्या काही मोजक्या लोकातील शक्ती ही घमेंडीचे व गुंडगिरीचे रूप घेऊन नंगा नाच घालू लागली. या पापाचे जबाबदार गुंडाइतकेच सर्व दुबळे सात्त्विक
लोक आहेत हे विसरता येत नाही, व्यक्तीचे दुबळेपण ही राष्ट्रनाशाची खिंड आहे-महान् देशद्रोह आहे, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. आमच्या लोकात शब्दज्ञान कमी नाही परंतु बलाच्या अभावी तशी कृती त्यचिकडून होत नाही. याचा परिणाम असा झाला आहे की, एखाद्या आजारी माणसाच्या डोळ्यांदेखत घरात चोर शिरून त्याने माल लांबवावा परंतु हे सर्व कळूनही त्याला काहीच करता येऊ नये. मग
असल्या पोकळ ज्ञानाचा उपयोग काय?
सर्वांगीण बलाचे महत्त्व
मी बलवंताची व्याख्या एवढीच करीत नाही की, फक्त आखाड्यात उतरलेला किंवा कवायतीने नटलेला तोच बलवंत. माझ्या मते देशाच्या शांती व प्रगतीला तसेच माणसाच्या कर्तव्यपूर्तीला जे जे आवश्यक
--------------------------------
हितबोध
असेल त्या सर्वांची ताकद माणसात असावयाला पाहिजे; ती केवळ शारीरिकत्व नव्हे तर मानसिक, बौद्धिक व आध्यात्मिक रूपाने देखील साठविलेली असावयाला पाहिजे. यांपैकी एखादी शक्ती जर का उणी असली तर तो त्याबाबतीत कुठेतरी बळी पडलाच म्हणून समजा.
प्रकृतीच्या विविधतेप्रमाणे काही प्रमाण कमी-अधिक असलेले चालेल पण जास्तीत जास्त उणीव किंवा अभावच असला तर मात्र त्याला त्या शक्तीस शरण जावेच लागेल व आपल्यात ती शक्ती भरून काढावीच लागेल; तरच त्या माणसाच्या जीवनात, संबंधित संसारात, देशात व त्याच्या अंतरंगात समाधान कायम राहील. नाहीतर, जगातील ती ती
मोठी त्याला दाबून टाकील-गुलाम करून ठेवील. या सर्व प्रकारच्या शक्तीमध्ये पहिले स्थान शारीरिक शक्तीचे, आरोग्य व व्यायाम यांचे आहे; ज्यांच्यामुळे मनुष्य आपले व देशाचे संरक्षण रोगराई व अन्यायअत्याचार यांपासून करू शकतो; तसेच काम करून प्रगतीचे पाऊल टाकण्याची स्वावलंबी धमकही ठेवू शकतो. ही पावरी जो व्यवस्थित साधील तोच पुढे सहजतेने चालू शकतो याप्रमाणे शारीरिक सामर्थ्य हे
जसे स्वावलंबी जीवन जगण्यासाठी अमोल धन आहे तसेच ते
लोकसेवेसाठी अत्यंत आवश्यक असे साधन आहे व हरिभजन कराया पाहिजे दृढ़ काया या समर्थ वचनाप्रमाणे परमार्थप्राप्तीसाठी देखील त्याची तितकीच आवश्यकता आहे. म्हणूनच तुकाराम महाराजासारखे देहाविषयी उदासीन असलेले संत देखील म्हणतात की- नको जाऊ देऊ भंगा। गात्रे माझी पांडुरंगा!
व्यायामाचे नित्य जीवनात स्थान
शरीरसामर्थ्य वाढविण्यासाठी जे लोक कवायत व कसरत करतात, मैदानी, मर्दानी खेळ खेळतात, लाठीकाठी व कुस्त्या यात प्राविण्य
--------------------------------
हितबोध
मिळवितात, ते शारीरिक कष्ट करायला मात्र मुळीच तयार नसतात, शरीरश्रमाच्या कामात त्यांना कमीपणा वाटतो पण ही चूक आहे. नित्याच्या जीवनातील सर्व कामे आनंदाने व उत्साहाने करता यावी आणि जनतेला मदत देता यावी याकरिताच वास्तविक व्यायाम घ्यावयाचा असतो. देशात युद्धकाळ किंवा गावात मारामारी हा प्रश्न नेहमीचाच
असतो असे नाही; आणि त्यांची वाट पाहात राहण्यात व तेवढे करण्यातच जर ते संतोष मानतील तर नेहमी वाईट गोष्टीचे चिंतन करणारे व विघातक बुद्धीचे लोक ठरतील. ही गोष्ट अर्थातच राष्ट्राला व मानवी जीवनाला आवश्यक व लाभदायक असू शकत नाही. आळसात वेळेचा अपव्ययन
करता चपलतेने कार्य करता यावे, मनाची प्रसन्नता ही सत्यसंकल्पनांना प्रत्यक्षात आणण्याच्या कामी लागावी, दीन-दु:खितांच्या अडीअडचणीचे निवारण हे सुलभतेने करता यावे, गावाचा नाश करणारे मतभेद हे गंभीरतेने मिटवता यावेत, गावावरील कोणतेही संकट हिंमतीने
ताबडतोब निवारण करता यावे व कुणावरही अन्याय करण्याची प्रवृत्ती कुणालाही न होईल, अशी दक्षता घेता यावी, याकरिताच ही व्यायामसाधना-ही बलोपासना अत्यंत जरूरीची समजली गेली आहे.
व्यायामासाठी खुराक हवा?
माझे मित्र नेहमी असे म्हणताना दिसून येतात की- व्यायाम म्हटला की त्याला उत्तम खुराक असायलाच पाहिजे. बदाम, पिस्ता, काजू, लोणी वगैरे अत्यंत आवश्यक आहेत, पण हा ग्रह चुकीचा आहे. आरोग्यासाठी व कार्यक्षम शक्तीसाठी इतक्या दूर जाण्याची काही गरज नाही आणि ज्यांना विशेषच व्यायाम घ्यावयाचा असेल त्यांच्यासाठी
सुद्धा ईश्वराने दोन्ही प्रकारची योजना करून ठेवली आहे. जी शक्ती बदामात तीच शेंगदाण्यात व जी ताकद लोण्यात तीच कांद्यात आहे, हे
--------------------------------
हितबोध
कितीतरी तज्ज्ञ लोकांनी सांगितले आहे. हा खुराक साधारण
परिस्थितीतले लोक सुद्धा घेऊ शकतात. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या व्यायामपटूंनी आधी आपली दिनचर्या सुधारली पाहिजे. शीतल स्नान, सात्विक ध्यान, वीर्यरक्षण व मनस्तंभन तसेच रोजचा अभ्यास ही सर्व साधने नष्ट झाली की कोणताही खुराक घेतला किंवा कितीही शक्ती असली तरी ती कुचकामाची ठरणार, शक्तीचे रूपांतर
उष्णतेत होऊन जीवनसत्तव नाहीसे होणार हे निश्चित. व्यायामाची फलनिष्पत्ती या वरील गोष्टीवरच अवलंबून आहे.
व्यायाम म्हणजे युद्धविद्या की जीवनशक्ती?
लाठीकाठीच्या तोफाबंदुकांच्या व्यायामाची मला जितकी गरज वाटत नाही त्याच्या शतपट जीवनातील सर्वच उत्तम कामे धैर्याने व उत्साहाने करण्याच्या परिश्रमात्मक व्यायामाची जरूरी वाटते. मैदानी खेळातील चपलता व कवायतीतील शिस्त ही जीवनातील सर्व व्यवहारात
उतरायला पाहिजे आणि बंदुक चालवावयाचे मनोधैर्य हे सत्यासाठी हृदयावर बंदुकीच्या गोळ्या झेलण्याच्या नीतिधैर्यात सुद्धा रूपांतरित व्हायला पाहिजे. नुसते मारण्याचे शिक्षण म्हणजे जीवनाच्या उन्नतीचे साधन नव्हे. दारूच्या कैफात ज्याप्रमाणे मनुष्य स्वत:चा व जगाचा घात
करू शकतो, त्याप्रमाणेच तो शस्त्रास्त्रांच्या धुंदीत वाटेल तसा अन्याय करण्यालाही प्रवृत्त होतो; पण शारीरिक बलाच्या जोडीला ज्ञानबल व आत्मबल असेल तर प्रत्येकाच्या कामाला योग्य दिशा लागून त्यापासून जगाचे कल्याणच होईल. ज्ञानेंद्रिये व कर्मेन्द्रिये या सर्वावर योग्य दाब राहून व त्यांच्यातील शक्तींचा उचित उपयोग होऊन त्यामुळे मनुष्याचे
आयुष्य सुखरूप होईल. युद्धे अपरिहार्य असली तरी ती भोजनातील खड्याप्रमाणे
--------------------------------
हितबोध
अपवादात्मक आहेत; परंतु व्यायामाचे तसे नाही. व्यायाम ही गोष्ट अत्यंत जरूरीची, रोजच्या दिनचर्येतील व नैसर्गिक आहे. युद्ध संपले म्हणजे व्यायाम नको, असे नाही. तसे जर झाले तर माणसाची इच्छाशक्ती निराश व मनुष्यजीवनच उदास होऊन जाईल. त्यामुळे भोगी व रोगी यांचेच राष्ट्र बनू शकेल आणि राष्ट्रावर परशत्रू, कुटुंबावर गुंड व शरीरावर
विविध विकार चाल करून येतील. असे होऊ नये यासाठी देशातील सर्वच पुरुषांनी व महिलांनी, लहानांनी व थोरांनी योग्य व्यायाम हा घेतलाच पाहिजे. राष्ट्र मजबूत व कार्यक्षम राहावे, प्रत्येक काम व्यवस्थित व विकसित व्हावे यासाठी राष्ट्राचा प्रत्येक घटक हा तसा मजबूत, कार्यक्षम, व्यवस्थित व विकसित जीवनाचा बनायला हवा. नाहीतर ते
राष्ट्र राष्ट्र म्हणण्याच्या योग्यतेचे राहूच शकणार नाही.
शक्तीच्या उन्मादावर सेवेचे औषध
व्यायामाच्या शक्तीमुळे माणूस हिंसक बनतो, असे काही लोकांचे म्हणणे असते. माकडाच्या हाती कलोती म्हणतात त्याप्रमाणे बुद्धिहीनविवेकशून्य माणसाचे तसे होणेही शक्य आहे. व्यायामाची नशा पचवून तिचे रूपांतर लोकसेवेच्या तेजस्वी कार्यात व्हावे असे वाटत असेल तर,
लोकांना सात्त्विक विचारांचा खुराक देणे जरूरीचे आहे. प्रार्थना, सत्संग, मार्गदर्शक बौद्धिक, मानवतेचा व राष्ट्रीयतेचा पाठ, शूरांच्या व श्रेष्ठांच्या चरित्रांचे वाचन इत्यादी गोष्टींनी त्यांच्या हृदयातील विवेकशक्ती जागवली पाहिजे; तिला योग्य चालना दिली पाहिजे. रामनामाने शंकराने हलाहल
विष सुद्धा पचविले आणि त्याचे रूपांतर तिसऱ्या नेत्रातील प्रलयाग्नीत करून दुर्जन व दुष्ट विकार यांना जिंकून घेण्याची शक्ती निर्माण केली. याप्रमाणे आपली शक्ती पचवून, तिच्या ज्वालांची आंच लोकांना लागू देण्याऐवजी तिचा प्रकाश जगाच्या सेवेत लावण्याचे कार्य प्रत्येक
-------------------------------
हितबोध
व्यायाम बाज व्यक्तीने केले पाहिजे . हाच पाठ श्री गुरुदेव सेवा मंडळा ने गावातील व्यायाम प्रेमी तरुणांना देऊन विघातक न बनता विधायक बनण्याचा मार्ग त्यांना दाखवून दिला आहे.सेवा मडंळ मंडळ ही काही फक्त व्यायाम करणाऱ्या स्वयंसेवकांची संघटना आहे असे नाही, तर ही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी योजना आहे. लोकांना सुबुद्ध नागरिक तसेच आरोग्यवान, बलवान, उद्योगी व सेवातत्पर असे देशाचे शिपाई आणि जीवनसंग्रामातील यशस्वी बनविणे हे या सेवकांचे कर्तव्य आहे व अशी सर्व प्रकारची सेवा करणाऱ्या लोकांची ही संघटना आहे. तेव्हा हिच योग्य दिशा घेऊन जनतेने केवळ व्यायाम करूनच न थाबंता आपल्या सर्वांगीण उन्नतीचा लाभ करून घ्यावा आणि आपले जीवन सत्कार्यी लावावे, एवढेच मला प्रार्थवयाची आहे.
..........................