खरा धर्म

 ६. सत्कार्यात सहकार्य हाच खरा सत्कार !

    पूजनीय श्रीगुरुदेव आणि उपस्थित सज्जनांनो !

          यापूर्वी मुंबईत मी बरेचदा येऊन गेलो; परंतु यावेळी या सत्काराच्या । कार्यक्रमास तोंड देण्याचा प्रसंग येईल, याचे स्वप्न मला कधीच पडले नव्हते. मध्यप्रान्त-व-हाडमध्ये सत्कारसमारंभाचे व मानपत्रे देण्याचे प्रसंग अनेकदा येऊनही मी त्यास विरोध केला; परंतु आज मात्र ह्या सर्व गोष्टी
मी सहन केल्या आहेत. याला कारण आपण बहुतेक अपरिचित मंडळी मला संत समजून दुसरेपणाने पाहण्याऐवजी आपल्यापैकीच एक समजून केवळ प्रेमळ आत्मीयतेने गौरवीत आहात आणि म्हणूनच मी हा
मोठेपणाचा आव स्वीकारून बसलो आहे. सदर्ह प्रसंगाने आपणा सर्वांचा परिचय होऊन त्यामुळे माझ्या कार्यास अधिक जागा मिळाली असेच मी समजतो. आपणा सर्वांची भेट घेऊन आपणात मिसळावे आणि आपली शक्य ती सेवा करून एकमेकां साह्य करू। अवघे धरू सुपंथ या
वचनाप्रमाणे आपणा सर्वांस आजच्या महत्त्वाच्या कर्तव्यमार्गावर बरोबर घ्यावे याच हेतूने मी येथे आलो आहे. भारताच्या सात लाख खेड्यात सर्वत्र आग भडकली असता आपण एकमेकांच्या सत्कारात वेळ दवडणे वास्तविक अनुचित आहे आणि म्हणूनच कार्यकर्त्या पुरुषाने असल्या
गोष्टीस फाटा दिला पाहिजे; परंतु आपल्या सर्वांची जोड माझ्या उद्दिष्ट कार्यास या प्रसंगाच्या निमित्ताने मिळत आहे. याच एका भावनेने प्रस्तुतच्या सत्कारसमारंभाची टाळाटाळ मी करू शकलो नाही.

       माझ्या मते असल्या सत्काराद्वारे कार्यकर्त्यास कर्तव्यभ्रष्ट करण्याचा जनतेचा हेतू नसून वास्तविक अधिक उत्तेजन देण्याचाच तो प्रयत्न असतो.

--------------------------------

हितबोध


परंतु पुष्कळदा कार्यकर्त्यावर याचा अनिष्ट परिणाम झालेला आढळून येतो; तसेच जनताही केवळ सत्कार करणे हेच आपले काम से पुढे पाऊलच टाकीत नाहीत. म्हणूनच अशा सत्काराऐवजी ससहकार्य करणे हाच खरा सत्कार समजणे श्रेयस्कर ठरते आणि कार्यकर्ता पुरुष व्यक्तीच्या सत्काराऐवजी आस्ते आस्ते आपल्या कार्य वाढता व्याप पाहूनच समाधान पावतो व त्यातील लोकांचा वा
उत्साहच त्यास आपले प्रयत्न द्विगुणित करावयास लावतो. फळा अपेक्षा किंवा पारितोषिकाची हाव धरून तो कार्य करीत नसतो. आपल्या । सतत कर्तव्यपालनातच त्याला सुखाची गुरुकिल्ली सापडते आणि म्हणूनच
सत्काराचे महत्त्व त्याला वाटेनासे होते. तो सत्कारास स्वत:चा सत्कार। समजण्याऐवजी आपल्या कार्याचा गौरव समजून वाढत्या गतीने आपला नियोजित मार्ग आक्रमित जातो. आपणा सर्वांना हीच दृष्टी देऊन कार्यास लागणे आवश्यक आहे व मी आज हेच समजत आहे की मला माझ्या
कार्यास याहीपेक्षा अधिक जोराची चालना देण्याचा इशाराच आपण या सत्काराद्वारे करीत आहात; तसेच वाढत्या जबाबदारीबरोबरच आपला पाठिंबाही आपण मला देत आहात!

 सर्वांगीण ग्रामसेवेचा स्वाभाविक सन्मार्ग

        मी कोणत्याही एका विशिष्ट संस्थेचा पक्षपाती नाही. एकंदर मानवजातीचे कल्याण होऊन सर्वांना सुख मिळावे, मानवधर्माची सर्वास जाणीव व्हावी, हा माझा दृष्टिकोण आहे. परंतु अखिल विश्वाचा विचार करीत असताना आमच्या सभोवार पसरलेल्या सात लाख खेड्यांचा प्रश्न आधी विचारात घेणे हे आमचे सर्वप्रथम कर्तव्य ठरते. शहरांपेक्षा
सात लाख खेड्यातील ग्रामीण जीवन हेच आमच्या आर्यावर्ताचे खरे जीवन आहे. अनादी कालापासून चालत आलेली भारतीय संस्कृती ही

--------------------------------

हितबोध


मानवधर्माची जागती ज्योत असून ती नष्ट होऊ द्यावयाची नसल्यास ऋषिकालीन भारताची स्वतंत्रता व सुव्यवस्था ह्याच उच्चतेस नेऊन पोहचवणे अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी, आधी हिंदुस्थानातील सात लाख खेड्यातील प्रत्येक जीवास स्वराज्य व सुराज्याचा उपभोग घेता यावा यादृष्टीने सतत प्रयत्न व्हावयास पाहिजेत. हे लक्षात घेऊनच
मागासलेल्या लोकांची सर्वांगीण उन्नती करण्याकरिता आपल्यापरीने सर्व प्रकारे प्रयत्न करण्याचे मी ठरविले आहे. महात्मा गांधी हे प्राचीन काळच्या ऋषिमुनींचा एक आदर्श असून तेही अशाच त-हेचे महत्त्वाचे कार्य आज करीत आहेत.

       खेड्यांच्या सुधारणेच्या दृष्टीने कित्येक व्यक्ती व संस्था आज कार्य करीत आहेत. परंतु सर्व गोष्टी एकाच दिशेने साध्य होत नाहीत; शिवाय खेड्याने मानसशास्त्र लक्षात घेता त्यांच्या जीवनाशी समरस होऊन त्यात इष्ट परिवर्तन घडवून आणण्याचे सर्वांनाच पूर्णतया साधत नाही. यासाठीच
धार्मिक प्रवाहातून खेड्यांची शक्य तेवढी सर्वांगीण उन्नती करणाऱ्या संस्थेची आवश्यकता आहे आणि म्हणूनच श्रीगुरुदेव सेवामंडळ या संस्थेची स्थापना करून त्याद्वारे मी खेड्यातून कार्य सुरू केले आहे. मनुष्याच्या जीवनास उपयोगी व उन्नतीस आवश्यक अशा सर्वच बाबी
हाती घेऊन मनुष्यसमाजास सुखी करण्याकरिता मी सामुदायिक प्रार्थना, व्यायाम चालवले आहेत. जनसेवा हीच ईश्वरसेवा समजून श्रीगुरुदेव सेवामंडळ आपले कार्य करीत असून व-हाड-मध्यप्रांत, मध्यहिंदुस्थान,
खानदेश व कित्येक संस्थाने यातून त्याच्या कित्येक हजार शाखा आज पसरलेल्या आहेत. भारताची संस्कृती व लोकहृदय लक्षात घेता येथे ईश्वरी प्रेमश्रद्धेवर कार्याची उभारणी करणे अधिक परिणामकारी होत असून अन्य राष्ट्रातही हीच दृष्टी शांतीप्रस्थापना करण्यास उपकारक
होणार आहे. हे लक्षात घेऊन समाजास रूचेल व पचेल अशा पद्धतीनने

------------------------------

हितबोध


कार्य करण्यास म्हणूनच मला कधी भजनी, कधी व्याख्यान
संस्थाचालक नि कधी बुवा बनावे लागले व लागत आहे; आणि रीतीने माझे कार्य अधिकाधिक यशस्वीच होत आहे असे मला दिसते. सुमारे  वीस वर्षांपासून मी पंढरपुरात प्रवेश केला. वारकऱ्याची भाव पत्करली. आरंभी भजनातून चल ऊठ भारता आता, ही वेळ निजण्याचीअशासारखी भजने ऐकताच तेथील बुवालोक उठून जा असत, पण आता ती परिस्थिती अगदी बदलून गेली. भजनांद्वारे ।
त्यांच्या मुलांच्या व बायांच्या तोंडी इतका घुसलो की त्यांच्या घराघरात भजने सुरू झाली आणि आता ते सर्व बुवा देखील प्रेमाने भजनात रंग लागले आहेत. लाखो कट्टर वारकरी आता भजनास हजर असतात सर्वसामान्य समाजात देखील असाच बदल आज झाला आहे आणि दारोदारी फिरणारे भिकारी देखील रस्त्यावरून वा रेल्वेमधून सुद्धा माझी
हाक साहजिकपणे जनतेच्या कानी घालीत आहेत.

 खराखुरा धर्म

        माझ्या मते, मनुष्याच्या हृदयात खरी मानवतेची ज्योत पेटवणे. त्याचे देवत्त्व जागृत करण्याचा प्रयत्न करणे, त्याची दृष्टी व्यापक बनवून राष्ट्र किंबहुना विश्व सुखी करण्याच्या खऱ्या कर्तव्याची त्याला जाणीव करून देणे हेच भजनाचे, धर्माचे व पोथीपुराणाचे कार्य आहे. ज्यांनी धर्माचा अर्थ व्यक्तीच्या व आध्यात्मिक हितमार्गापुरताच मर्यादित करून
घेतला आहे त्यांना देशसेवेचा-राष्ट्रोद्धाराचा पाठ शिकवणे: आणि जे केवळ भौतिक दृष्टीनेच जीविताचे व राष्ट्राचे कोडे उलगडू पाहत आहेत त्यांना जीवनाच्या व्यापकतेबरोबरच त्याच्या खोलीची-गांभीर्याचीन अंतिम ध्येयाची जाणीव करून देणे व त्या अध्यात्माचे बळकट अधिष्ठान व्यवहारास देऊन त्याद्वारे विश्वात शांती निर्माण करण्याची योजना करणे

--------------------------------

हितबोध


हेच भजनाचे उद्दिष्ट व धर्माचे मर्म आहे. संपूर्ण विश्व हे एक मंदिर असून । त्यातील प्रत्येक जीवमात्राची सेवा हीच परमेश्वराची सेवा आहे. याच दृष्टीने आपण भजनादिकांकडे पाहिले पाहिजे. केवळ गीत गाणे म्हणजे भजन असून त्याच्या भावात रंगणे, अर्थबोधात बुडी देणे आणि त्यातील
तत्त्वे अंमलात आणून तद्नुसार विश्व वैकुंठरूप समजून जनसेवा करणे हेच खरे भजन आहे, हाच खरा धर्म आहे! 

            धर्म म्हणजे टिळेमाळ, पूजाअर्चा, तीर्थयात्रा, व्रतवैकल्ये, दानपठण असाच आकुंचित अर्थ आज लोक करून बसले आहेत आणि त्यापुढे आपले स्वाभाविक मानवी कर्तव्य ते विसरून गेले आहेत. माणसाशी माणसाप्रमाणे वागावे, आपल्यावरून दुसऱ्याचे सुखदुःख लक्षात
घेऊन त्यांचेशी वर्तन करावे, त्यासाठी वास्तविक धर्मनियमांकडे पूर्ण डोळेझाक करून बहिरंगाकडेच सर्व झुकले आहेत. समाजात अनेक पंथ, मते, पक्षोपपक्ष निर्माण होऊन खऱ्या मानवतेच्या अभावी घराघरात व राष्ट्राराष्ट्रात द्वेषमत्सरांनी तीव्र स्वरूप धारण केले आहे. ऐक्यभावना
नष्ट झाली आहे. आपत्काळी किडेमुंग्या व जंगली जनावरे देखील एकत्रित होतात परंतु माणसे अशाही प्रसंगी आपल्या मानवबांधवांच्या प्रेतांच्या टाळूवरील लोणी खाण्यात गर्क झालेले दिसतात. स्वत:च्या स्वार्थापुढे समाजाची राखरांगोळी झाली तरी त्यांना पर्वा वाटत नाही. रानकुत्रे संघटित होऊन वाघाला सुद्धा फाडून खाऊ शकतात हे दिसत असूनही,
केवळ स्वत:च्या क्षुद्र व दुर्बल बुद्धीने परस्परात असंघटना माजवून आम्ही आमच्या दैन्यशृंखला कायम ठेवतो आणि ब्रह्ममायेच्या व बंधमोक्षाच्या चर्चा मात्र अखंड करीत बसतो यालाच धर्म किंवा परमार्थ म्हणता येईल
काय? अशाप्रकारे जिवंतपणी मुर्दाड बनवणारा नि मेल्यावर मोक्ष देणारा तथाकथिक धर्म मलातरी नको आहे. जिवंतपणीच संसार स्वर्गतुल्य बनवणारा धर्म मला हवा आहे.

-----------------------------

हितबोध


धर्माचा अर्थ आणि संतांचा भावार्थ

        ज्याप्रमाणे मनुष्याला स्वार्थपटू असुर बनवण्यासाठी धर्म त्याप्रमाणेच तो त्याला एककल्ली संन्यासी बनवण्यासाठीही नाही. प्रतेक मनुष्याला स्वत:बरोबरच समाजाचे ऐहिक व पारमार्थिक कल्याण करता यावे: जात, पंथ, पक्ष, मते यातील भेद मानवतेने-बंधुतेने भरून काढून 
प्रत्येकास संसारातच स्वर्गसुख व मोक्षसुख अनुभवता यावे; याकरिताच धर्म आहे. असा खरा मानवधर्म जगात नांदावा, विश्वबंधुत्वाची कल्पना जगात रूजावी, अशी खटपट करणारा मी माणूस आहे; आणि माझा असा विश्वास आहे की, ह्या भावना समाजात पसरविण्याचे कार्य प्रत्येक युगाचे सत्पुरुष समाजाच्या हासकाळी करीत आले आहेत. ज्ञानेश्वर.
एकनाथ, रामदास, नानक, कबीर इत्यादी संतांनीही कालानुरूप हेच कार्य केले आहे आणि पंढरपुरच्या वाळवंटात नामदेव-तुकारामांनी लाखो वारकऱ्यांना संघटित करून हाच संदेश दिला आहे.

धर्म म्हणजे समाजधारणेची योजना हे जर खरे आहे तर, समाजाचा ऱ्हास व अकल्याण ज्या ज्या गोष्टींनी होत असेल ती ती गोष्ट दुरुस्त करणे हे प्रत्येक धार्मिकाचे कर्तव्य ठरत नाही काय? मग देशभक्ती व देवभक्ती अगदी भिन्नस्वरूपी आहेत असे म्हणण्यात काय अर्थ आहे?
देश हे देवाचेच व्यक्त स्वरूप असल्यामुळे खरी देशभक्ती ही देवभक्तीच आहे आणि त्याकरिता आपल्या जाति, पथ, पक्ष इत्यादीकांचा संकुचित अभिमान सोडून बंधुत्वाने वागणे व संघटितपणे राष्ट्रसेवा करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे, असे मी समजतो. धार्मिक वातावरणातून समाजधारणेस
आवश्यक असणाऱ्या गोष्टींची शिकवण देणे जरूरीचे असर
पण जरूरीचे असते. पूर्वीच्या कुशलपणे व तत्परतेने करीत असत असेच सिर अनेक ठिकाणी स्वार्थ, अभिमान व अज्ञान वाट मंदिरे, उत्सव हे राष्ट्रास जीवन देण्याचे प्रचारकार्य फार
परतेने करीत असत असेच दिसून येईल. परंतु आज
स्वार्थ, अभिमान व अज्ञान वाढून त्यांचे रूप पार बदलून

--------------------------------

हितबोध


टाकलेले दिसते. संघटनेऐवजी विघटना आणि तत्त्वाऐवजी दंभ सर्वत्र बोकाळलेला दिसतो. प्राचीन संतांचा सुधारणाप्रिय दृष्टीकोण लक्षात घेऊन त्याला अनुसरून सध्याच्या सामाजिक, राजनैतिक वगैरे बाबीतील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा मार्ग आजचे धार्मिक म्हणणारे लोक सोडून
बसलेले दिसून येतात. कालमानाने करावे लागणारे बाह्य परिवर्तन धार्मिकांच्या शब्दनिष्ठ वृत्तीला त्रासदायक वाटत असून आपल्या या कतीने ते संतांच्या भावार्थास मात्र हरताळ फासत आहेत. अर्थात् यात बदल करण्याचा प्रयत्न करणे प्रत्येक विवेकी पुरुषाचे काम आहे.

 अस्पृश्यांना ईश्वर-मंदिरात मज्जाव का? 

         अस्पृश्यांचा प्रश्न आज तीव्र स्वरूपात आपणापुढे उभा आहे. पूर्वी अनेक कारणांनी या आपल्या मानवबांधवांस-यांच्या पूर्वजांवर लादण्यात आलेली बंधने तोडून यांचा विकास व उन्नती करण्यास मदत करणे हे प्रत्येक शहाण्या माणसाचे कर्तव्य ठरत नाही काय? अशास्थितीत
संतांनी ज्या हेतूने मैदानात गोपालकाला करण्याची प्रथा सुरू करून स्पृश्यास्पृश्य भाव, जातीयता व सांप्रदायिकता यांना कमी करण्याचा प्रयत्न केला त्याच हेतूने मानवतेच्या नात्याने सर्वांना न्याय्य अधिकार देणे केव्हाही उचितच ठरेल. परंतु भक्तीच्या क्षेत्रात देखील अजून हे _परिवर्तन समाधानकारकरित्या दिसून येत नाही; आणि म्हणूनच यावर्षी
मी पंढरपुरास जाऊनही पांडुरंगाच्या दर्शनासाठी देवळात गेलो नाही. देव सर्वाचा नि सर्वाकरिता आहे; तसेच तो पतितपावन परमात्मा कोणाच्या दर्शनस्पर्शनाने अपवित्र न होता उलट सर्वांना पवित्र बनवणारा आहे; मग आम्ही हा मानवहीन भेद कां वाढवावा? ज्या देवळात म्हणोनि
भक्ती गा एथ सरे। जाति अप्रमाण या ज्ञानेश्वरी वचनाच्या विरुद्ध वर्तन होते, ज्या मंदिरात वाट भक्तांची पाहत उभा असणाऱ्या ईश्वरमूर्तीस आपल्या भाविक लेकरांशी केवळ जातिभेदाच्या लोकनिर्मिती

--------------------------------
हितबोध


बंधनामुळे भेटता येत नाही, त्या देवळात नि त्या मूर्तीपुढे जाण्याचा मला अधिकार काय? हा अधिकार माझ्या हृदयाच्या भक्तीमुळे मला मिळतो की माझ्या देहाच्या जातीमुळे? आणि अशा जातीमुळे मिळणाऱ्या।
अधिकाराचा आधार घेणे म्हणजे भक्तीचा, माझ्या अस्पृश्य
मानवबांधवांचा नि ईश्वरी तत्त्वाचा अपमान करणेच नव्हे काय? हे सर्व लक्षात घेऊनच मी असे ठरवले आहे की अशा कोणत्याही जातिनिष्ठ देवळात जावयाचे नाही. ईश्वर आज त्या देवळात काही ठराविक जातींना भेटण्यासाठी बसलेला नसून तो केव्हाच आपल्या उपेक्षित लेकरांना भेटण्यासाठी बाहेर आला आहे. माझा पांडुरंग तुका म्हणे माझी ब्रह्मांड
पंढरी याप्रमाणे मला जनतेत दिसत आहे, म्हणूनच मी आपल्यापरीने जनसेवा करतो व सर्वांना करायला सांगतो.

       याचा अर्थ असा नव्हे की मी मंदिरांचा विरोधक, मंदिरे नष्ट करू इच्छिणारा आहे. माझे म्हणणे एवढेच आहे की मंदिराचे खरे तत्त्वज्ञान अंमलात आणले गेले पाहिजे. त्यांचा उपयोग त्याचसाठी झाला पाहिजे की ज्यासाठी त्यांची निर्मिती करण्यात आली होती. व्यापक लोकशिक्षण, समाजसंघटन आणि पवित्रता हाच मंदिराचा आदर्श भाव
आहे असे मला वाटते. जितके महापुरुष व देवदैवते होऊन गेली तितकी सर्व आम्हास आदर्शभूत असून, त्यांच्या स्मरणजागृतीसाठीच या मठ मंदिरांची योजना आहे; तेव्हा त्या महापुरुषांची तत्त्वे देशकालपात्रविचारे अंमलात आणणे मी अधिक महत्त्वाचे समजतो.

 सृष्टीचा हेतु आणि मानवतेचा सेतू

       सध्याच्या काळ जातीयतेचा नाही. जात, पंथ, विशिष्ट धर्म, राष्ट्र वगैरे सर्वांना मानवतेच्या सूत्रात ओवण्याचा हा काळ आहे आणि यातच सर्वांचे कल्याण आहे. परमेश्वराने जग निर्माण केले ते असंख्य जाती व्हाव्यात, वर्ग पडावेत, त्यांच्यात तेढ माजावी, परस्परांस विघातक ।

--------------------------------

हितबोध


योजना व्हाव्यात, सर्वांची शक्तीयुक्ती असंख्य जीवांच्या विध्वंसास कारण व्हावी आणि मानवी प्रगतीचा मार्ग या विरोधाच्या खाईत गडप व्हावा यासाठी निर्माण केले नाही. नैसर्गिक व अपरिहार्य भेदातही बंधुत्व कायम असावे, परस्पर सहानुभूति व एकभाव जागृत असावा, निसर्गनियम व
धर्मनियम यावर व्यवहाराची बैठक दृढ असावी, द्वेष-क्लेश न उरता जग मानवतेचे मंदिर बनावे आणि सर्व मानवांनी मिळून ईश्वराचा विश्वविकासाविषयीचा सकल्प पूर्ण करण्याकडे आपला मोर्चा वळवावा, या उद्देशानेच ईश्वराने हे विश्वाचे कर्तव्यक्षेत्र आपणापुढे मांडले आहे. आपण परस्परांनी एकमेकांस भिन्न भिन्न वेषभूषा, देशभाषा, रीतिरिवाज नि
संघभेदामुळे वेगळे मानण्याची आवश्यकता नाही. सर्वात आधी आपण सर्व मनुष्येच आहोत; आपली खरी जात मनुष्याची आहे. म्हणून आपण सर्वानी बाकीच्या गोष्टीस अवास्तव महत्त्व न देता, जातिद्वेष-वर्णद्वषमतद्वेषाधिकांनी माणुसकीचे तुकडे न पाडता, मानव बनण्यास शिकले
पाहिजे. उच्चनीच भाव विसरून सर्वांनी एकमेकांचे सुखदुःख आत्मबुद्धीने जाणून सर्वांना सुखी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निरनिराळे वर्ण, वर्ग व्यवसाय हे नाटकातल्या भूमिकांसारखे असून आत पाहता आपण सर्व एकच आहोत. भूमिका टाकून आत्मनिरीक्षण करा; त्यात  एकत्वावाचून दुसरे काहीच सापडणार नाही. त्या अंतर्गत एकत्वाच्या अनुभवाची प्रथम पायरी किंबहुना ओळखण उच्च मानवता हीच आहे.
खऱ्या माणुसकीतच परमेश्वर वास करतो; पाशवी किंवा आसुरी वृत्तीत । नव्हे. खरी मानवता ही देवत्वाची सुरुवात आहे. सर्वांचा मुख्य धर्म एकच असून तो मानवधर्म हाच होय !

 धर्म आणि राजकारण

           धर्म आणि राजकारण यांची ताटातूट होऊ शकत नाही; होणे इष्ट नाही. राष्ट्राच्या उन्नतीकरिता राष्ट्रीय व धार्मिक जागृतीच्या युतीची

----------------------------

हितबोध


आवश्यकता असते व याच मार्गाने विश्वशांती अस्तित्वात येते. मानवतेची प्राणज्योत तेवत नसलेल्या मुडद्यांच्या देशात खरे राष्ट्रतेज निर्माण होणार नाही, प्रभावी संघटना टिकु शकणार नाही व अर्थात् खरी देशसेवाही घडू शकणार नाही. धर्माचा आधार नसलेली संघटना केव्हा पोखरली जाईल, उध्वस्त होईल  किंवा दुष्परिणामी ठरेल याचा भरवसा नसतो.
जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे-खरा धर्म आहे अशी लोककार्याच्या पाठीशी उच्च भावना नसेल तर ती सेवा केव्हा विकृत स्वरूप धारण करील याचा नियम नसतो. मानवता आणि स्वतंत्रता यांचा संगम झाला तरच तो टिकेल आणि सत्परिणामी ठरेल; एरव्ही धार्मिकता व व्यवहार यांच्या संयोगातच खरी प्रगती, शांतता नि स्वतंत्रता आहे यात संशय
नाही. नुसते स्वराज्य हे सुखपर्यवसायी होत नाही, तर ते सुराज्यही असणे आवश्यक आहे; आणि त्यासाठी आपणा सर्वात खऱ्या मानवतेचा उत्कर्ष होणे अगत्याचे आहे. माझ्या कार्याचा प्रवाह वाहत आहे तो या दिशेने!

 माझा स्वतंत्र दृष्टीकोण व सेवामंडळाचे कार्य

        धर्म हा बारावडंबरात नसून तो मनुष्याच्या आंतरिक उदात्ततेत आहे. जातीवरून कोणास उच्चनीच न मानता गुणकर्मावरून प्रत्येकास महत्त्व दिले जावे या मताचा मी आहे. भक्ती वा नामस्मरण हे, आमच्या रामाने राम राहावे व आम्ही सदैव गुलाम राहावे यासाठी नसून, म्हणता
राम, राम मन होई, ध्येय होत रामाचे । धैर्य जिवा ये रावण वधण्या. यासाठी आहे असे मी समजतो. देवाचे डोके थंड करण्यासाठी अभिषेक केला जात नसून आमच्यातील देवत्व जागृत करण्यासाठी ही आदर्शाची पूजा आहे. दिवसभर अनेक पापे करून-अनेका सभर अनेक पापे करून-अनेकांच्या माना मुरगळून रात्रौ देवाजवळ क्षमा मागितल्याने प्रार्थना होत नाही, तर आपले आचरण
सेवाभावयुक्त असेल तरच त्याचा उपयोग होतो. ब्रह्मज्ञान हे
शुद्ध व सेवाभावयुक्त असेल तरच त्याचा उपयोग होतो. ब्रम्हज्ञान हे

--------------------------------

हितबोध


शब्दांनी ठसत नसून त्याचा अनुभव त्यासाठी निर्भयतेने पुढे धजण्यात, जनसेवेसाठी निष्कामतेने कार्य करण्यात आणि आत्मवत् सर्वभूतेषु या धारणेने अवघाचि संसार सुखाचा करण्याचा अंतर्बाह्य प्रयत्न करण्यातचयेऊ शकतो. या दृष्टीने प्रत्येकाने आपल्या कर्तव्याची दिशा ओळखून कार्य करावे; आपल्या कुटुंबाप्रमाणेच आपल्यावर देशाची व धर्माचीही
जबाबदारी आहे हे ओळखून प्रत्येक पाऊल टाकावे; स्वराज्य व सुराज्याच्या कल्पना ध्यानात घेऊन योजना आखाव्या व आपल्यासह सभोवारच्या जनतेच्या ऐहिक व पारमार्थिक कल्याणाची काळजी वाहुन संसारात नंदनवन फुलवावे.

    या दृष्टीने शहरांबरोबरच आमच्या खेड्यापाड्यातून कार्य होणे, त्यांना समजुतीचे शिक्षण देणे अत्यावश्यक आहे; आणि व-हाडमध्यप्रांतात या धोरणाने कार्य करणाऱ्या सेवकांचा एक फार मोठा वर्ग निर्माण होऊन कार्य करीत आहे. राष्ट्राच्या नवनिर्मितीच्या दृष्टीने आपणास सर्वांगीण योजनेचा कार्यक्रम पाहावयाचा असल्यास श्रीगुरुदेव सेवामंडळाचे कार्य पाहून आपले समाधान होईल असा मला विश्वास
वाटतो. ग्रामोद्योग, ग्रामसफाई, साक्षरताप्रसार, वाचनालये, गोरक्षण, व्यायाममंदिर इत्यादी महत्त्वाच्या उन्नतीकारक गोष्टी आज खेड्यापाड्यातून सुरू असून व्यापक लोकशिक्षणाचे, संघटनेचे, शिस्तीचे व सामर्थ्यवृद्धीचे कार्य सामुदायिक प्रार्थना कुशलतेने करीत आहे. ग्रामसुधारणेच्या अशा नानाविध प्रयत्नांनी व आपसातील दुही द्वेष उच्चनीचादी असद्भावनांचा नाश करणाऱ्या अनेक योजनांनी यापुढे राष्ट्रात नवीन तेज निर्माण करण्याची सद्बुद्धी व शक्ती परमेश्वर आपणास
देवो, एवढीच प्रार्थना  करून मी आपले भाषण संपवतो.

--------------------------------

हितबोध