बनविण्याऐवजी असल्या आकुंचित व क्षुद्र भावनांचे थैमान सुरू ठेवावे हि गोष्ट अनुचित नव्हे काय? विशिष्ट जातीत जन्म झाल्यामुळे काही लोकांच्या उच्च भावनांकडेही लक्ष न देता व त्यांना जणू मानवही न समजता त्यांच्याशी असले भेदवर्तन करणे हे धर्मास मान्य आहे असे कोण म्हणतो? त्यांना मंदिरापासून अनके फायदे होण्याचे तर राहोच परन्तु नुसते देवदर्शनही होऊ नये, अशी दुष्ट इच्छा कुणी का करावी?
वास्तविक समाजातील मागासलेले व हीनदीन झालेले लोकच देवाच्या दर्शनाचे सर्वात जास्त अधिकारी ठरतात. औषधीची खरी गरज रोग्यांनाच असते. या दृष्टीने देवळाच्या तत्त्वज्ञानाचा विचार करिता, देवदर्शनाची खरी आवश्यकताव अधिकार आजवर, अस्पृश्य ठरवण्यात आलेल्या वर्गानाच अधिक आहे व सुधारलेल्या, जाणत्या उच्च वर्णियांचापंडित पाठकांचा-अधिकार या बाबतीत दुय्यम दर्जावा आहे-मागाहूनचा
आहे. काही विशिष्ट जातींनी मंदिरांना बळकावून बसावे हा देवाच्या दृष्टीने गुन्हा, समाजाच्या दृष्टीने अन्याय व धर्माच्या दृष्टीने अधर्म आहे, हे विचारांती प्रत्येकास मान्य करावेच लागेल!
नियम तत्त्वनिष्ठ हवेत, जातिनिष्ठ नकोत !
मी पुष्कळदा सांगून गेलो आहे की, देवळात येण्याच्या बाबतीत काही नियमांची अत्यंत आवश्यकता व उपयुक्तता आहे; परंतु ते नियम जातिव्यक्तीवर न आधारता गुणकर्माच्या पवित्रतेवर आधारलेले असले पाहिजेत, शुचिर्भूतपणे म्हणजे शुद्धतेने येण्याचे, शांततेने व शिस्तीने वागण्याचे, स्वच्छ कपड्यांनी तसेच निर्व्यसनी वृत्तीने व गंभीरतेने येऊन
योग्य पद्धतीने दर्शन घेण्याचे असेच ते नियम असले पाहिजेत. संसर्गजन्य रोग एकापासून दुसऱ्यास लागू नये, कुणाकडूनही गंदगी (घाण, मलिनता) पसरली जाऊ नये, कुणाच्या तोंडाचा दारू,तबांखु वगैरेचा
--------------------------------
हितबोध