गोरक्षण
८. हातचे सोडून पळत्यामागे धावू नका
सृष्टीतील प्रत्येक जीवाकडे तारक मारक न्यायाप्रमाणे कर्तव्य भोपविल्या गेले आहे. जीवापासून जीव उत्पन्न होणे, जीवाने जीव पाळणे
जीवाने जीवांचा संहारक बनणे, या गोष्टी आपणास जीवसृष्टीत प्रत्यही आढळून येतात. जीवो जीवस्य जीवनम् या वचनाप्रमाणे काही प्राणी काही प्राण्यांच्या भक्ष्यस्थानी पडतात. काही प्राणी नाणसाच्या आवश्यक गरजा पुरवणारे असून त्यांची जोपासना केल्यास ते त्याच्या जीवनविकासाला मदत करतील, अशी त्यांना ईश्वरी देणगी आहे. मानवाचे । आरोग्य रक्षण आणि त्याचबरोबर कृषि-संवर्धन ही दोन्ही कामे जोडीने सांभाळणारे प्राणी आपल्या नित्याच्या अनुभवाचे आहेत. उदाहरणार्थगाईचा विचार केल्यास भारतवर्षासारख्या कृषिप्रधान देशासाठी हा जीव
म्हणजे एक बहमोल निसर्गदत्त देणगीच होय. ती दूधदुभत्याचा सुकाळ करते. तिचे मलमूत्रही वाया जात नाही. आपल्या पोटी धडधाकट बैल
निर्माण करून तिने या देशाच्या कृषिसंपन्नतेची इभ्रत सांभाळली आहे.
काही लोक म्हणतात, यांत्रिक पद्धतीने थोड्या वेळात, थोड्या माणसांकडून व थोड्या श्रमात शेती होते. मग तुम्ही गोरक्षणावर जोर का देता? याला माझे असे उत्तर आहे की, आजच्या परिस्थितीत
यंत्रशक्तीसाठी वास्तविक दसऱ्याच्या तोंडाकडे पाहून यंत्राने आम्ही शेती करून देऊ असे म्हणणे व गोरक्षणाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे हातचे
सोडून पळत्याच्या मागे धावण्यासारखे आहे. त्यामुळे आम्ही आमच्याजवळ असलेली शक्ती गमावून बसू. यंत्रातील किरकोळ
--------------------------------
हितबोध
खिळ्यासाठीही दुसऱ्याजवळ आपली बुद्धी गहाण ठेवण्यापेक्षा देशाच्या आजच्या स्थितीत गाईच्या पुत्रांकडून जमीन नांगरा व दूधादह्याने आपले
संतान आनंदी व सशक्त बनवा, असे तुम्हाला परिस्थिती सांगत आहे .
गो-पालनाचे व्यावहारिक मूल्य
गाईच्या पोटी ईश्वराने अमृतासारखे दूधच निर्माण केले असे नाही तर तिची निर्मिती ही सर्वदृष्ट्या मानवाच्या कल्याणासाठी झालेली दिसते. तिच्यापासून मिळणाऱ्या वस्तू आरोग्यवृद्धी करणाऱ्या असल्यामुळे आपण स्वच्छतेने वागल्यास तिच्या भोवतालचे वातावरण सर्वदा निरोगी व पवित्र असते असे दिसून येईल. गाईच्या मलमूत्राचे खत बनते व त्यामुळे शेतीला फायदा होतो, ही गोष्ट तर लोकप्रसिद्धच आहे. आई मेल्यास
गाई माणसाला जगवतात हेही सांगणे नकोच. गाय व माय यांचा सारखा आदर करा, असे जे हिंदूधर्म म्हणतो, त्यात प्रत्यक्षात अनुभवास येणारे
व्यावहारिक सत्य काय कमी आहे? गोदुग्धात बहुमोल सत्त्व आहे, ते इहलोकीचे अमृत आहे, या ऋषींनी केलेल्या त्याच्या गौरवाला आधुनिक
शास्त्रज्ञांनीही संमती दिली आहे, हेही बहुतेकांना माहितच आहे; पण शेण आणि गोमूत्र यांच्यातही अद्भुत शक्ती साठवलेली आहे , हे विसरून
चालणार नाही. एखाद्या शक्तीशाली बनस्पतीप्रमाणे तिच्या मलमूत्रापासून दुर्धर रोगही बरे होतात. शेणाने घर सारविले असता हवा शुद्ध होते व रोगट जंतूंचा नाश होतो, हा त्यापासून काय कमी फायदा
आहे? परंतु ज्याप्रमाणे हवा आणि पाणी हे सहज प्राप्त असल्यामुळे माणसाला त्यांची किंमत वाटेनाशी झाली, त्याचप्रमाणे घरातल्या या
अनमोल गुणी जीवांची किंमत आपल्याला कळेनाशी झाली आहे. असे कितीतरी गुण ज्या प्राण्याच्या अंगी आहेत, त्याला झिडकारून लोखंडी
हितबोध
यंत्रे मात्र कपाळी लावून बसणे आम्हाला कसे बरे आवडेल? गाईबैलांच्या अभावी सहज प्राप्त अशा त्या भरपूर खताला आचवावे लागेल. तात्पर्य
जमिनीवर बिनाबैलाचे इंजीन चालविणे हे आम्हाला पसंत पडणार नाही. गाई-बैलांना सांभाळून स्वावलंबी कलाकृतीने आवश्यक त्या वस्तूंचा
उपयोग केल्यास मला चालेल.
यंत्रापासून अविचाराने बेकारीची भीती
यंत्राची दुरुस्ती गावातच होत असली तर ते ग्रामस्वावलंबन ठरेल व त्याच्या कामात व्यत्यय येणार नाही. तसे जर जमत नसेल तर मध्येच
काम अडून पडावयाचे. पण ही यंत्रे विकत घेण्याची ताकद व त्यांना पचविण्यालायक संपत्ती आज आमच्या कास्तकाराजवळ आहे काय?
याशिवाय आणखीही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हिंदुस्थानची लोकसंख्या दिवसेंदिवस भरमसाट वाढत चालली आहे. या कृषिप्रधान देशात
कोट्यावधी लोक शेतीवर मोलमजुरी करून जगत आहेत. ते तेथे काम करतात त्या क्षेत्रात यंत्रे चालविणे म्हणजे अर्थातच आज राबतात त्यापेक्षा
थोड्या माणसांना काम देणे होय. बाकीच्यांच्या पोटाची रोजी हिसकून, त्यांच्या तोंडचा घास हिरावला जाणे व त्यांच्या पोटाची पुढे सोय न
होणे म्हणजे माणसांना माणसांनी खाण्यासाठी नवी चेतना निर्माण करणेच होय! कोणत्याही गोष्टीपासून फायदा म्हटला म्हणजे तो प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षरूपाने सर्वांच्या वाट्यास आला पाहिजे! नाहीतर समाजव्यवस्था बिघडेल. लोकात गोंधळ माजेल. ते फंदफितुरी व तंटे उत्पन्न करतील
आणि परस्परांचे वैरी होतील. तात्पर्य, अशी बेकारी उत्पन्न झाल्यास अविचाराने कार्यनाश मात्र होईल .आजच्याच परिस्थितीकडे पाहिले असता दिसून येते की, थोड्याशा स्वार्थासाठी लोक आपल्याही
हितबोध
माणसाचा बळी घ्यावयास मागेपुढे पाहत नाहीत. नैतिक मूल्य बरेच घसरले असून, लोक काळाबाजार सोडेनासे झाले आहेत. गरीब
कास्तकारावर याचा एकंदर परिणाम काय होत आहे. याचा विचार आपण केला पाहिजे.
सामुदायिक शेती व सांघिक यांत्रिकीकरण
वास्तविक पाहिले असता कास्तकारांची परिस्थिती आज शोचनीय आहे. शेतीतून मिळालेला दीडदमडी पैसा मुलाबाळांच्या इंग्रजी शिक्षणात व शौकिनीत आणि प्रसंगी सरकारी फंड भरण्यात खर्च होतो आणि त्यातून काही लोकांच्या जवळ जर वाचलाच तर आजच्या घान्यटंचाईच्या काळात महागाईची खरेदी करून कसेबसे काम भागविण्यात निघून जातो. दुष्काळ पडल्यामुळे या पडत्या काळी त्याला
बी देखील मोलाने घ्यावे लागत आहे. शेतीसाठी एखादा बैल कमी पडल्यास त्याला कपाळावर हात देऊन बसण्याची पाळी येते. अशा परिस्थितीत यांत्रिक पद्धतीचा अवलंब करा, असा उपदेश करणे
हास्यास्पदच ठरेल!
हे यांत्रिकीकरण भारतीय शेतकऱ्यांना व्यक्तीश: तरी साधणे शक्य नाही. मात्र यशस्वी करावयाचे झाल्यास ते सांघिक पद्धतीनेच करावे.
लागेल . पण अत्यंत खेदाची गोष्ट आहे की, आमच्यात सामुदायिक वृत्तीचा अभाव आहे. संघशक्तीचे महत्त्व जर आम्ही जाणले असते व
त्याप्रमाणे जर आम्ही वागलो असतो तर भारतवर्षाला असा पडता काळ अनूभवण्याचा प्रसंग कशाला आला असता? हिंदुस्थानला जर कोणता रोग असेल तर तो हाच! मित्रांनो! ज्या ज्या कारणांमुळे भारतीय संघटना
विस्कटली, त्या त्या गोष्टी निस्तरण्यासाठी प्रयत्न चालू असताही, अजून
हितबोध
पाहिजे तसे यश हाती आले नाही, अशी आजची परिस्थिती आहे! सामदायिक शेती जर मजूर लोक करू लागले व स्वावलंबी होऊन यंत्रसामुग्रीही निर्माण करू लागले तर देशाचा काहीअंशी फायदा जरूर होईल, पण त्या उपक्रमामुळे गाई-बैलांचा मात्र नाश होता कामा नये.
ग्रामस्वावलंबनाचा आदर्श ठेवा!
काही वर्षापासून धातूंचा भाव वाढलेला आपण पाहत आहो. याचे कारण धातूच्या बाबतीत देशोदेशी साठेबाजी सुरू आहे. युद्धसामुग्री तयार करण्यासाठी जो तो प्रयत्न करीत आहे. लोखंडाचा भाव जेव्हा
फार वाढला होता, तेव्हाची एक गोष्ट मी आपणाला सांगतो. एका कास्तकाराचा, यंत्राच्या साह्याने चालणारा, लोखंडी नांगर मोडून पडला होता. त्यासाठी बिचारा अर्ज करून करून थकला. तहसिलदारच काय पण पाटीलपटवाऱ्यांच्याही मिंता करून तो शिणला. बिचाऱ्यावर हात
जोडण्यापर्यंत पाळी आली पण त्याचे काम झाले नाही. शेवटी त्याने गावातील त्याच्या परिचयाच्या एका वृद्ध सुताराला बोलावले व त्याच्याकडून एक लाकडी नांगर करून घेतला. पण त्या सुताराचेही
त्याला चार शब्द सहन करावे लागले. त्या वृद्ध अनुभवी सुताराने, आपल्या चालू प्रश्नाला अनुसरून त्याला म्हटले- ऐकलं सावकार, शेवटी तर आमच्याकडेच यावं लागलं; निभणार नाही पहा तुमच्या अशा बादशाहान! म्हाताऱ्याचे अनुभवाचे बोल त्याला पटले व आता राक्षसी सामान मी सोडतो असेच उद्गार त्याच्या तोंडून निघाले. हे सर्व सांगण्यात झा उद्देश असा आहे की, आपल्या खेड्याखेड्यातील घराघरातून याचा सचार झाल्याशिवाय ही यंत्रे भरमसाट पद्धतीने वापरणे केव्हाही एक होणार आहे. त्यापेक्षा गावात वा गावाजवळ ज्या कला ज्या
अवगत झाल्या आहेत, त्याप्रमाणे त्या स्थळी त्यांचा उपयोग
--------------------------------
हितबोध
करून घेणे व त्या पद्धतीत आपल्या शेतीच्या उन्नतीची सांधिक योजना आखणेच शहाणपणाचे होईल.
शेतकरी बंधूंनो, राष्ट्रधर्म जागवा!
शेतकरी बंधूनो! भारतवर्षातील गाईबैलांना पुनरपि हत्त्यासारखे धिप्पाड बनवा! गाईच्या मदतीने माती व बैलांच्या साह्याने शेती
सोन्यासारखी दिसू द्या! जेथे तुम्ही निढळावरील घाम काढून स्वकष्टाने मोत्यासारखी पिके काढू इच्छिता, तेथे ग्रामस्वावलंबनाच्या तत्त्वाकडेही लक्ष देऊन, जमेल तोपर्यंत तेथील यंत्रसामुग्री वापरण्यास विसरू नका! ही लघुयंत्रेही असल्यास चालतील; तीच जमिनीत घालून आनंदाने भरभर
शेती पिकवा व आपल्या राष्ट्राच्या जीवनात आपण सर्वदा सहभागी आहोत, हे लक्षात ठेवून देशाला धान्य पुरवा! ज्या प्रांतात कमी पडेल तेथे ते पाठविण्याची उदार अंत:करणाने मनःपूर्वक तयारी ठेवा! आपण उपयोग घ्या व गरजवंतांची झीज सोसून गरज भागवा! अर्धपोटी निराश्रितांना कोरकुटका देऊन त्यांचे आशीर्वाद घ्या!
घरोघरी गाई पाळा, हेचि आवडे गोपाळा!
या वचनाकडे दुर्लक्ष न करता, गो-पालनाच्या अभावी शरीराने अशक्त व मनाने दुर्बळ झालेल्या तुमच्या मुलाबाळांना गोमातेचे दूध देऊन, भारताच्या पुनरुत्थानासाठी खंबीर बनवा! घरकुटूब. व राष्ट्रकुटुंब अशा उत्तरोत्तर विकसित दृष्टान, आपल्या व आपल्या भोवतालच्या मुलाबाळांकडे पाहून, ते आपलेच आहेत
त्यांना भावी भारतीय समाज मंदिराचे मजबूत आधारस्तंभ बनवा! हीच माझी इच्छा आहे! या परमोच्च सेवेत तुमचे व देशाआहे! हा राष्ट्रधर्म पाळण्याची देव तुम्हास सद्बुद्धी देवो।
--------------------------------
हितबोध