नवे जग केव्हा निर्माण होईल?
आजच्या जगाचे रौद्र स्वरूप
वेळोवेळी सहायक म्हणून साथ देण्यासाठी आलेल्या अत्यंत जुनाट रूढ्यांनी आपलेच घोडे पुढे दामटल्याने खऱ्या धर्माचे स्वरूप मागे पडून,
मानवता ही काळोखलेल्या बिळातील किड्यांच्या बुजबुजाटाने पोखरलेल्या पुरातन वृक्षाप्रमाणे रूक्ष बनली आहे. तात्त्विक धर्माला काल्पनिक जातीयतेचे विकृत रूप प्राप्त होऊन त्याचा पुरेपूर परिणाम पवित्र धर्माच्या व प्रशांत ईश्वराच्या नावावर भनायक युद्धाचा वणवा भडके पर्यंत झाला आहे. भौतिक व मानसिक शक्तीयुक्तीचे पुरुष
व्यक्तित्वाच्या महत्त्वासाठी राजकारण व समाजकारणाचेच नव्हे तर सापडेल ते साधन हाताशी धरून मतमतांतरांचा वितंडवाद व काहीही
करून पुढे येण्याचा अंदाधुंद दुंदुभिनाद गाजवीत आहेत. माणुसकी ही सहज फिरताना तर मिळणेच दुरापास्त पण तिची रोपटे महान प्रयासाने
आजच्या तापलेल्या भूमीवर तयार करणेही अत्यंत कठिण झाले आहे. शोध आणि सुधारणा मानवसमाजाला कुणीतरी दिलेला भयंकर शाप
ठरत आहे आणि मानवी विकासाची साधनेच सर्वांच्या अहिताची बंधने बनून जगात हलकल्लोळ माजवीत आहेत. या सर्व भानगडींचा परिणाम
जगाच्या विशेषतः भारताच्या कोनाकोपऱ्यातील गोरगरिबांपर्यंत इतक्या उग्रतेने व्यापला आहे की, दे माय धरणी ठाय अशी त्यांची स्थिती झाली आहे. दलित समाज वर्षानुवर्षे व पिढ्यानपिढ्या आपले
गोट्यामातीचे काम हाडांची काडे करून करीत आला असताही त्याला
--------------------------------
हितबोध
तसूभर देखील कोणी पुढे ढकलीत नाही; उलट त्याला चेंगरून काढण्याच्या नवनव्या युक्त्या उपयोगात आणल्या जात आहेत. हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत असता अंत:करणात अशी भावना पेट घेते की, याचा कोणीच वाली नाही का?
तमसो मा ज्योतिर्गमय
जगाचे हे भीषण स्वरूप पाहून मनाला वाटते, अशा जगात आता जगणेच बरे नाही! .जगाचा चालक ईश्वर आहे व तो न्यायो आहे असे म्हणतात, मग त्याला हा अन्याव नि ही विषमता का पाहवते? तो याची व्यवस्था का लावीत नाही? मित्रांनो! डोके या विचारात सुन्न होऊ लागताच आतून एक ध्वनि येतो; निबिड अंधारात एक आशेचा प्रकाशकिरण प्रगट होऊ लागतो की, व्यवस्था लावण्यासाठी जे पाहिजे तेच चाललेले आहे! समोर दिसणाऱ्या नाटकाच्या पडद्यामागेच पुढच्या प्रवेशाची योजना आखलेली आहे. आजचे भयंकर स्वरूप धारण करून त्याद्वारे विश्व आता नव्या युगाच्या व्यवस्थेलाच कळत नकळत लागले
आहे व आकुंचित वृत्ती आपसातील युद्धाने, मानहानीने, दुर्बलतेच्या पराकाष्ठेने निघून जाऊन त्यांच्यात स्वतःहून सुदरता फुलणार आहे. ते
नवे जग आपण पाहू, या आशेने आपल्या लोकांना आता उत्तेजित पाहिजे व त्याकरिता जी जी साधने आवश्यक असतील त्यांनी करून नवयुगनिर्मितीस जिवाभावाने मदत केली पाहिजे. ते नवे जग आमच्या सर्वांच्या पावलापावलातून त्याचे पडसाद उठू लागले पाहिजेत.
नवे जग तुमच्या हृदयात आहे !
माझ्या तरुण कार्यकर्त्या मित्रांनो! जगात कोणतीही गोष्ट सूक्ष्मातूनच
--------------------------------
हितबोध
स्थुलात येत असते हे पूर्णपणे लक्षात असू द्या. तुमच्या अंत:करणात जे विचार आज तीव्र असतील तेच उद्या आचाराचे रूप घेऊन तसा परिणाम
सृष्टीवर घडवून आणतील. तुमच्या हृदयातील प्रामाणिक आकांक्षा हेच उद्याच्या नव्या जगाचे पवित्र बीज ठरणार हे निश्चित ! परंतु तुमचे हृदय
अर्धवट किंवा डावाडोल असेल, तुमच्या हृदयातील भावना व विचार प्रतिगामी किंवा स्वार्थलोलुप असतील, तर उद्याचे विश्वही तसेच निर्माण
होईल याची खात्री असू द्या. नव्या जगाचे स्वप्न तुम्ही आपल्या मनात जसे रंगवाल तसेच ते तुमच्या द्वारे जगात पूर्ण होऊ लागेल; हा ईश्वराचा कायदा आहे! सामुदायिक प्रार्थना हा अशा नव्या जगाच्या पवित्र
स्वप्नावर दररोज अभ्यासाचे अमृतसिंचन करण्याचा प्रभावी प्रयोग आहे! नव्या जगाचे सुखस्वप्न पवित्र अधिष्ठानाच्या आधारावर निरपेक्ष मनाने सर्वांनी रेखाटून त्यात संकल्पशक्ती ओतीत गेल्यास ते प्रत्यक्षात येण्यास कितीसा वेळ लागणार? तुम्ही ईश्वराचे अस्तित्व न मानणारे असाल तरी हरकत नाही. तुमची ध्येयमूर्तीच ईश्वर आहे असे मी म्हणेन! जगात सत्य, न्याय, समता, शांती इत्यादी ज्या गोष्टी नांदाव्यात असे तुमच्या
प्रामाणिक सद्सद्विवेकबुद्धीस वाटते त्या गोष्टी म्हणजे संतांनी अनुभवलेल्या ईश्वरस्वरूपाच्या खुणा, त्याची किरणेच आहेत हे केव्हाही विसरू नका. ईश्वराच्या या सद्गुणशाली स्वरूपाचे दर्शन घेण्याची उत्कंठा आज साऱ्या जगाला लागली आहे. आणि या एका उत्कंठेच्याच दृष्टीने विचार केला किंवा ईश्वराची ही व्याख्याच नजरेसमोर ठेवली तर मतभेद होण्याचे हजारो प्रसंग टळून विश्वात शांती व सर्वांचे ऐक्य होणे स्वाभाविक आहे. तसेच सर्वांच्या ऐक्यातच नव्या युगाची व नव्या जगाची सुरुवात
करण्याचे यशस्वी सामर्थ्य सावठलेले आहे.
--------------------------------
हितबोध
नव्या युगाचा केंद्रबिंदू तूच!
मित्रांनो तुमच्या आचार विचार उच्चार व प्रचाराने जगाची घडी नवी होऊ द्या. मनुष्य जेव्हा एकजाती विश्व तेवढे एकमती धर्म तेवढे एक पंथी अशा विचारांची व व्यवहारांची लाट युद्धाचे न्यायाने सुखी होऊ द्या आणि आपल्या या नव्या जगाच्या प्रकाशकिरणांनी मागासलेल्या जनमनातील हजारों वर्षाचा अंधार नाहीसा करून सारे विश्व कायमचे बंद करा लहानपणापासून थोरांपर्यंत सर्वांची समानतेच्या न्यायाने सुखी होऊ द्या आणि आपल्या या नव्या जगाच्या प्रकाश किरणांनी मागासलेल्या
जनमनातील हजारो
वर्षाच्या अंधार नाहीसा करून सारे विश्व प्रेम सुखाच्या रंगांनी रंगीत पुन्हा मूळ वैभवाचं नटू द्या. तुम्ही प्रत्येक जण नव्या युगाचे शिलेदार - नव्या जगाचे शांतिदूत आहात तुमच्या पैकी प्रत्येक जण हा नव्या सृष्टीचा खांब! आहे तुमच्यातूनच नवे जग निर्माण होणार आहे तेव्हा यापुढे प्रत्येक पाहूल त्याच दिशेने पडले पाहिजे; तुम्ही स्वतःच त्या नव्या युगातील सर्वांगीण विकास युक्त आदर्श मानव बनले पाहिजे ही एक गोष्ट पुन्हा: पुन्हा मला आपल्या कानावर झाला आहे!
..................................