महापुरुष
१०. थोर वीर पुरुष पर्वतांसारखे असतात!
प्रिय मित्रा ! या विशाल पर्वताकडे पाहा तर किती मजबूत आणि सौंदर्यवान आहे हा! वास्तविक प्रत्येक मनुष्य देखील पर्वतासारखाच विशाल होऊ शकतो; पण त्याने आपल्या वृत्ती आपल्याच संकल्पाने आकूंचित करून घेतल्यामुळे तो आपल्याला दुबळा, दरिद्री, जातीय, देशाचा, कुळाचा व विशिष्ट धर्मांचा समजतो! त्याने जर का या
पर्वताप्रमाणे आपले विचार दृढ केले असते तर तो पर्वतालाही आपल्या डोळ्यात दाबू शकला असता, नाही का?
तो बघ! त्यावरील एकही दगड निसटत नाही आणि सुटलाच तर शेकडो दगडांना धक्के देत व फोडीत मुळाशी आलाच म्हणून समज.
माणसाची वृत्ती अशीच वीरत्वाची असावी. एकतर तो पुरुष काही चिंतीत नाही आणि विवेक करून संकल्प केला की, तो पूर्णत्वाला नेल्याशिवाय
राहत नाही, असे वर्तन असते धीर वीर पुरुषाचे!
त्याचे हृदय पर्वताप्रमाणेच मजबूत असते बाबा! हे बघ! एखादा विशिष्ट बिंदू वरून पाझरला की, तो गंगाच घेऊन निघतो. त्याला कुणी
म्हणो वा न म्हणो, तो वाहण्याचे सोडत नाही. त्याचे पाणी कोणी घ्या वा घेऊ नका; पण तो आपल्या स्फूर्तीने वाहत जाऊन समुद्राला भेटणारच. असेच असते थोरांचे हृदय! एखाद्याकरिता त्यांच्या डोळ्यातून पाणी आले की तो त्यात पाझरणार नि मग प्राण गेला तरी त्या ध्येयपूर्तीशिवाय मागे पाहणार नाही. त्याचे अनेक मित्र त्याला साथ
देवोत अथवा न देवोत, पण तो त्या ध्येयाला प्राप्त करणारच. त्याकरिता
--------------------------------
हितबोध
मान, अपमानच नव्हे तर फकीर बनून दारोदार लागला तरी त्याने त्याच्याकरिता पाणी सोडले, त्याच्या कामाला तो खंड पडू द्यायचा नाही. त्याचे कार्य पूर्ण झाले तरच त्याला शांती, एरव्ही नाही! असे हे पर्वताच्या पाण्याप्रमाणे थोर लोक असतात.
किती दया त्यांच्या हृदयात भरलेली आहे रे! हे बघ! सुंदर सौंदर्यवान झाडांचे समूह एकदा उद्भवले की ते लतांनी, फुलांनी व फळांनी सुशोभित दिसतात. एवढेच नव्हे तर त्यांच्या सावलीत कोणीही बसा त्याला ते विश्रांति व सुख देतात. त्यांच्या अंकुरांबद्दल त्यांना कितीतरी अभिमान असतो बरे ? शत्रूने अंकूर तोडल्यावरही त्यांचा निश्चय सुटत नाही; एक शाखा तोडली तर शतपटीने पुन्हा अंकुर निर्माण करून आपल्या लताव सौंदर्य द्विगुणित वाढविण्याचे धाडस त्यांच्यात असते!
मित्रा! असेच गंभीर पुरुषाचे असते. तो मित्र लोकांचीच नव्हे तर शत्रूचीही इतकी सेवा करतो की, त्याची सेवा जर शत्रूला रूचत नसली तर विरोध होऊनही तो मागे फिरत नाही. अखेर आपला प्राण धोक्यात घालूनही तो सहस्त्र प्रवाहांनी सेवा रूजू करतो. प्रसंगी आपल्या देहाची आरति देऊनही हजारो रूपांनी आपले सत्यसेवेचे कार्य पूर्ण करीत असतो.
पर्वतावरच्या वृक्षाप्रमाणेच गंभीर पुरुषाचे कार्य असते. हाही एक पर्वतच आहे .असे समज. ही बघ त्याची जडता! एकदा तो जागा धरून बसला की, युगे बदलली तरीपण हा आपला निश्चय ला
नाही बाबा! आणि एकदा बसतो म्हणजे काय? एखाद्याका घोडाच असतो हा! शेकडो घातूचा, शकडो रसांचा आणि वल्ल्यांचा समूह घेऊन हा आपले आसन दृढ करीत असतो. आपल्या मनात अत्यंत गम धरून राहतो हा. लोक याला दाबून टाकतील म्हणता? छे। त्याच्या छातीवर दुनिया बसू दे! जराही डगमगणार नाही तो! असेच
--------------------------------
हितबोध
महापुरुषांचे आसन असते. तो एखाद्या कार्यासाठी आसन घालून बसला की त्याला कोणी हालवू शकतो म्हणता? एकदा त्याला आपला निश्चयच
करू दे, मग दुनिया एकीकडे झाली तरी त्याचा पाय एक इंचही कोणी वळवू शकणार नाही! तो आपल्याच विचाराने कोणतीही गोष्ट करेल!!
त्याच्या स्वत:च्या विचाराने कितीतरी लोक घेरल्या गेले असतात. अनेक रत्नांप्रमाणे शोभिवंत असे त्याचे ग्रहमंडळ बसले असते व अनेक
कार्यांनी ते नटलेले असते. आणि त्याचा का जम बसला तर पर्वताप्रमाणे तो जड होऊन बसतो. धरणीकंपाने एकदाचा पर्वत दुभंग होईल पण
त्याने निर्माण केलेले विचार नाहीसे होऊ शकत नाही, असा आपल्या निश्चयाने जड होऊन बसलेला हा महान पुरुष असतो!
हे बघ! कितीतरी लोक त्यावर घाण करतात, त्यावरील किती खणतात. दगड उचलून नेतात. ढोरेही चढतात . पोरेही खेळतात. मोठेमोठे तपस्वीही बसतात, निंदकही एकांत साधतात. काही धन आणून लपवितात तर काही काढूनही नेतात; परंतु ही सर्व त-हेची कृत्ये तो आपल्या पोटात साठवून घेतो नि परोपकाराला कधीही विसरत नाही,
असे या महापर्वताचे स्वरूप आहे.
ज्ञानवान पुरुषाचेही अगदी असेच असते पाहा! त्याची निंदा कितीही करू दे, किंवा त्याची स्तुती कितीही करू दे, त्याच्यावर जबाबदारी
कितीही टाकू दे, त्याला जराही त्याची खंत वाटणार नाही. त्याची मुद्रा पर्वताप्रमाणे निश्चल आणि गंभीर असते. लोकांना काय हवे ते त्याच्याजवळ मिळेल, कुणाचा काहीही संपर्क आला नसला तरी त्या
बाबतीत त्याचा उतावळेपणा मात्र राहणार नाही. काय व्हायचे ते पर्वताप्रमाणे धीर गंभीरपणेच होईल!
मित्रा! त्याची सर्व शांत मुद्रा तुला आतापर्यंत सांगितली. तो बघ
--------------------------------
हितबोध
ज्वाला दिसते ती! हा त्या पर्वताचा जणू तिसरा नेत्रच आहे! आणि जेव्हा ही ज्वाला जोराने पेट घेते ना, तेव्हा तर त्यात धरणीकंप होण्याइतकी शक्ती असते बाबा! आणि जरा का कधी त्यात असलेल्या
उग्र रसाच्या संघर्षाचा प्रसंग आला तर दुनिया हादरू लागते, फाटू लागते, शेकडो गावेची गावे त्यात गडप होऊन जातात! मग त्याला कोण विझवणार? तो आपल्यातच विझला तर बरे! नाहीतर मेघमंडळ जरी त्यात कोसळून पडले तरी ती ज्वाला अधिक पेटेल पण शांत होणार नाही! असेच या वीर्यवान पुरुषाचे असते. एकदा का त्याच्या मनात
दुनियेत पालट करावयाचा झाला की, दुनिया ओरडू दे, शत्रू तुटून पडू दे, गावेचीगावे ओसाड पडू दे, पण त्याच्या मनाने कल घेतला की, तो बंद पाडायला कोणीही समर्थ नाही! मोठमोठ्या सत्ताही उलथून
पाडण्याची त्याच्या नेत्रात ताकद असते व त्याचे प्रत्यंतर आपण आपल्या डोळ्यांनी पाहतोच एकदा एका त्यागी पुरुषाने आपला डोळा उघडला
नि ज्याच्या राज्यात सूर्य कधीही मावळत नाही अशा सत्ताधीशालाही मागे फिरविले! उदंड प्रतिकाराने अस्पृश्यता निवारण केली!
हा त्या तपस्वी पुरुषाच्या वृत्तीचा परिणाम आहे. अशाच अनेक महात्म्यांच्या कथा आपण एकत आलो ना? हा त्यांच्या दयेचा व उग्रतेचा
परिणाम आहे! असे लोक पर्वतांच्या ज्वालाप्रमाणे उग्रही असतात.
मित्रा! असे कितीतरी गुण या पर्वतात तुला आढळतील. तू नेहमी पर्वताकडे व समुद्राकडे पाहून, त्या विशालतेची कल्पना आपल्या हयात
साठवीत जा, माझेही हृदय असेच सेवाभावी होऊ दे, अशीच त्या गुरुदेवाला प्रार्थना करीत जा; म्हणजे तुझे संकल्प पूर्ण होऊन ते कार्यात लागतील व तूही तसाच पुरुष होशील जसे की थोर पुरुष असतात!!
-------------------------------
हितबोध