श्रेष्ठ साहित्य कोणते? 

 1१. विश्वसाक्षात्कारातून विश्वकल्याण साधणारे!

           मी साहित्य पुस्तकातून शिकलो नाही. अफाट जनसागरातून, हृदयाच्या गाभाऱ्यातून, आंतरिक उचंबळीतून मी साहित्य शिकलो.साहित्याची कल्पना ह्या जनसागरात मिळाली.

          पद्धतशीर जीवन जगण्याला सुरुवात जेथे झाली तेथे साहित्यिकांचा समूह आला! पद्धतशीर जीवन जगण्याचे ज्ञान येणे, पद्धतशीर जीवनाचे
सक्रिय-तत्त्वज्ञान समजू लागणे हे ज्याला साधले. तो साहित्यिक मार्गाला लागला आचाराविचारातील शुद्धता, संकुचित वृत्तीचा लोप, संघर्षहीनता, परस्पर सहकार्याची ओढ, गरिबांबद्दल प्रेमभावना,
समाजोन्नतीच्या कल्पना याविषयीच्या विचारांची निर्मिती मनात होणे
म्हणजे ग्रामसाहित्य तयार झाले !

            प्रत्येकाला आपली भावना विश्वव्यापी करावयाची आहे. प्रथम  आप्त व नंतर विश्वालाच आपले घर मानणे, किंबहुना हे सारे चराचर
विश्व माझेच स्वरूप आहे ही जीवनाची अत्युच्च कल्पना असून ती साऱ्या समाजात पसरावयाची आहे. परंतु या उच्चतेला पोहचण्यासाठी
पायऱ्यांनी जावे लागणार आहे; अनुभव घ्यावे लागणार आहेत. या अनुभवांच्या मार्गाने जातांना जे सामान सामन्यांना गोळा करावयाचे
आहे ते त्यांना साहित्यातून मिळायला हवे. साहित्याने ते पुरविले पाहिजे. हे साहित्य, हे सामान साहित्यात आहे, ग्रामीणात आहे, संतात आहे,
सर्वत्र आहे. सेवाग्रामला अखिल भारतीय कुंभार परिषद झाली. मी कुंभारांच्या सामानात, मडक्यातही साहित्य पाहिले. मी तेही साहित्यच

--------------------------------

हितबोध


समजतो. जीवनाला सामान देणारे, सामान पुरविणारे, साहित्याचा पुरवठा करणारे ते सारे साहित्य ! काही साहित्य कलात्मक असेल, काही साहित्य कलात्मक नसेल, काही कलागुणात कमी पडेल. पण कलात्मकतेचा अंश कमी असणारे जीवनसाहित्य साहित्यच नव्हे असे म्हणता येणार
नाही. हे साऱ्या जगाचे नाटक प्रतिदिनी चालले आहे. नाट्यसाहित्य किती विशाल आहे!

           सारे साहित्य जगाच्या पसाऱ्यात रंगले आहे. आपापल्या परीने ह्या साहित्यातला रंग अनुभवावयाचा आहे. हा अनुभव घेणाऱ्या
साहित्यिकात एखादा परब्रह्माच्या महानंदात रमून साहित्याच्या पराकोटीला आपल्या साहित्यिक भावना नेऊ शकतो वमहान साहित्यिक
म्हणून तो अमर ठरतो. त्याची कला, त्याचे साहित्य अमर, अजर, विश्वात्मक ठरते.

           कुणी म्हणतात, विदर्भ साहित्य-संमेलनाचे प्रयोजन नाही. कुणाचा विरोध महाराष्ट्र साहित्य परिषद भरवताना होतो. कुणाला हिंदी साहित्यसंमेलनाची आवश्यकता नाही असे वाटते. परंतु ह्या कशाचेच प्रयोजन नाही असे नाही. प्रांतिक भाषांची किंवा एका राष्ट्रभाषेचीच संमेलने
भरावी, असे नसून, मी तर म्हणेन की कुटुंब साहित्याचीही संमेलने भरावी, ग्रामसाहित्याची संमेलने व्हावी, भारतीय सर्व भाषांची एकत्र
संमेलने व्हावी, इतकेच नव्हे तर, विश्वसाहित्य संमेलनाचीही नितान्त आवश्यकता आहे असे मला वाटते.

           मला मुंबईला जायचे आहे. मला ठराविक मानिच जावे लागेल. स्टेशनास्टेशनावर थांबावे लागेल. जीवनाच्या मार्गानेही लागले. गांधीजी नेहमी विश्वदर्शनाचे आत्मसाक्षात्कारावे 
धोरण सांगत. पण विश्वदर्शन करताना शोषण गुलामी, अपराध, अन्याय,

--------------------------------

हितबोध


अमानुषता डोळ्यांनी बघणे हे आत्मसाक्षात्कारी पुरुषाला शोभणार नाही. त्यांचे हे कृत्य वेडेपणाचे आहे, माझ्या विश्वसाक्षात्कारासाठी मला
विश्वकल्याणाच्याच मार्गाने गेले पाहिजे!

           माणसाला मानव करावयाचे आहे; त्याला दानव व्हायचे नाही. महामानव नच झाला तरी चालेल पण माणूस मानव झाला पाहिजे.
माणसाला माणूस करायचे आहे, कणूस नाही. त्याला सर्व जीवनाचे मनोहर हदयंगम दर्शन घडवायचे आहे. त्यातले मांगल्य, त्यातले अभिजात
सौदर्य, त्यातले सारे वर्म, सारे मर्म अनभवावयाचे ज्ञान त्याला द्यावयाचे
आहे. हे कार्य एक सतीचे वाण आहे: एक दिव्य आहे. हे दिव्य साहित्यिकांनी करायला हवे आहे. हे वाण साहित्यिकांनी द्यायचे आहे. परंतु बरेच साहित्यिक विकृतीच्या मार्गाने जातात असे खेदाने म्हणावे
लागते. कला, बुद्धी वा भावना यांचा दुरुपयोग होतो, तो होऊ नये, अॅटमबाब सुद्धा आम्हाला प्रिय व्हावा पण त्याच्या सदुपयोगासाठी!
अनि ओकणारे बाबही इष्टच; पण सामाजिक विषमतेच्या बेड्या फेकून देण्यासाठी त्यांचा उपयोग होईल तर ! गुलामीच्या बेड्या टाकून आगी
लावण्यासाठी ह्या अग्निगोलकांचा उपयोग होईल तर तो बुद्धीचा दुरुपयोग आहे. पोटातली आग न शमवणारे शास्त्रज्ञांचे अग्निशोध कामाचे नाहीत.
विस्तवाचा उपयोग पोटाची भाकरी शिजवायला आहे. बिडी शिलगवून कुठेही जळते थोटक फेकुन आगी लावणे हा त्याचा उपयोग नव्हे.
बिडी फेकणाराला पर्वा नसते, काळजी नसते व कल्पनाही नसते.
आमच्या साहित्यिकांनीही आपल्या साहित्याचा दुरुपयोग होणार नाही यासाठी जागरूक असले पाहिजे. आम्हाला सर्व गोष्टींची गरज आहे.
आम्हाला जगातील नाटके हवीत, आम्हाला नृत्यही हवे, आम्हाला काव्ये हवीत. सारे साहित्य हवे. पण ह्या साऱ्यामुळे मानवी भावनी

--------------------------------

हितबोध


प्रगतीला जाव्या. ध्येयाचे मार्ग दिसावेत, नाटक पाहून आम्ही नाटकी व्हावे आणि विषयांध बनून नातीगोती विसरून सैराट धावावे, ही नाटक
पाहून आमची भावना होऊ नये, कला ही जीवनाची एक पद्धति आहे, मार्ग आहे, रीती आहे, नीती आहे. त्याचा विसर साहित्यास पडता कामा नये.

       साहित्य झब्बूशाहीसाठी, दीन-दुबळ्यांच्या झोपड्या चिरडण्यासाठी नाही. जगाला जागवण्यासाठी, जगाच्या निरीक्षणासाठी,
जगाच्या विशालतेत विलीन होण्याचे शिक्षण घेण्यासाठी साहित्य आहे. साहित्याने भराभर उड्या मारत वा अंतराळातून उडत जायला नको.
अशा तकलादू क्षणजीवी साहित्याचे भवितव्य विनाशाकडे वळणारे असते. असे साहित्य जिवंत राहत नाही. त्याचा उपयोग होत नाही. परिणामकता
त्यात उरत नाही. लढाईत शंभर वीरांवर वार करीत-मारीत समोर चाललात, मागे काय होत आहे इकडे तुमचे लक्ष नाही. वस्तुत: तुम्ही पुढे जात आहात आणि मागचे मरणारे उठून उभे होत आहेत. हे निष्फळ युद्ध आणि परिणाम न करणारी तुमची विनाशी कला एकाच कक्षेत येतात. वरीलप्रमाणे लढणाऱ्या वीरांची गुलामी जशी नष्ट होत नाही
तद्वतच तुमची ही वरवरची साहित्यनिर्मिती ही सुद्धा एक गुलामीच ठरते!

       आमच्या समाजात उत्तम विचार, उत्तम गरजा यांची पूर्तता करावयाची आहे. तळमळ वाटणाऱ्यांनी हे करायला हवे. साहित्यिक त्यातून सुटत नाही, आचार-विचारांचा प्रचार नाही तोवर देशसुधारणेचा
विचार व्यर्थ होय! आमच्या येथच्या शेकडा शंभर लोकांना तसा धर्म समजतो पण त्यातही वास्तवता शेकडा दहांनाही कळत नाही. सर्प दिसला भीती वाटली: झाला तो आमचा देव! झाड पडले, झाले झाड देव!जो आघात करील. जो दाखला देइल, जो गचांडी देईल तो आमचा

--------------------------------

हितबोध


धर्म होतो. आमच्या धर्मकल्पनांची, आमच्या सामाजिक जीवनाची ही अधोगती आहे. ही नष्ट व्हावी असे साहित्यिकास वाटणार नाही तर तो
साहित्यिक तरी कसला? संपूर्ण लोकात मानवता वाढावी, विषमता गाढावी व अधमता सोडावी ही धर्माची प्रगती आहे. समाजाची उन्नती
आहे. साहित्यिकांचा हातभार यासाठी लागावा; नाहीतर ते केवळ भुईला भार च आहेत असे म्हणावे लागेल.

           आमच्या समाजातल्या रूढ्यांनी आमचे जीवन बरबटले आहे. आंब्याला बहर यावा त्याप्रमाणे आमच्या बायकांची अंगे दागिन्यांनी
लदलद बदबदलेली असतात. अंगावर जरीकाठी उपरणे घालणाऱ्याच्या घराबाहेर ५० माणसे उष्टी पत्रावळी चाटण्यासाठी भांडत असतात.
उपडेनागडे अर्थनग्र जीव कुत्र्यापेक्षाही निपट्टर बनून शिते चाटतात. ज्या देशात, ज्या प्रांतात, ज्या गावात साहित्यसंमेलने भरावी, त्याच गावातल्या,
त्याच प्रांतातल्या, त्याच देशातल्या साहित्याला मात्र कुत्र्यापेक्षा निपट्टर जीवन जगणान्या उष्टी शिते चाटणाऱ्या दीन-दरिद्री भुकेकंगालांची
जाणीव नसावी हा दैवदुर्विलासच नव्हे तर काय? साहित्याने आता ही जाणीव करून घेतली पाहिजे. त्याशिवाय साहित्याची व्याख्याच होऊ शकत नाही.

         काहीचे साहित्य कदाचित् दुसरे असू सकते. परंतु मला या देशात तरी तसे साहित्य नको आहे. मला जीवनसाहित्य हवे आहे. समाजातल्या
वैषम्याच्या भींती, विषम स्थिती निवळणारे साहित्य व तसे साहित्य निर्माण करणारे साहित्यिक मला या देशात हवे आहेत. हे कार्य काही कीर्तनांनी करतील,काही भजनांनी करतील, काही कायद्यांनी करतील.. आम्ही हे कार्य विचारांची पेरणी करून, साहित्याच्या माध्यमाने केले
पाहिजे. साहित्याच्या शक्तीची जाणीव मला आहे. साहित्याची महान

------------------------------

हितबोध


शक्ती जगातील मोठ्या शक्तींपैकी एक आहे. त्यात बाणेदारपणा आहे. तेज आहे, ओज आहे. या शक्तीचा उपयोग माझ्या समाजाला व्हावा, आमच्या देशाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठीही शक्ती भक्तीभावाने वेचली गेली पाहिजे.

          समाजाचा विकास कोणत्याही साधनाने का होईना, शीर्घ गतीने व्हावा ही तळमळ आम्हाला लागली पाहिजे. तमाशातूनही ही गोष्ट झाली तरी माझी हरकत नाही. तमाशाच्या संमेलनाचे उद्घाटन याच तुमसरात मी केले. प्रथम जवळच्या प्रेमी लोकांनी मला विरोध केला. मी त्यांना सांगितले, बुवाच्या नावाला बळी पडण्यासाठी झाकून झाकून
राहण्याची माझी इच्छा नाही आणि झाकटाकीपणा करून मला बुवाबाजीही करायची नाही. मग मला कुणी संट्या म्हटले तरी चालेल! मी गेलो. ५०० भडवे जमले होते. त्यात माझा नवा अवतार जाऊन उभा राहिला. मी भाषणात सांगितले, तमाशाची भावनाच खरी म्हणजे न्यारी आहे. मनोरंजनापासून जगाला अलग करता येत नाही ह्याची मला जाणीव आहे. परंतु हे मनोरंजन समाजाला विकृत करणारे विद्रूप साधन ठरू नये. चांगल्या नाटिका, चांगली गाणी, चांगली कृती घालून तमाशांना कलापथकाचे रूप द्या. यात तुमचे पोट भरेल व देशाचेही भले होईल. त्यांच्याकडून तसे अभिवनच घेतल्याशिवाय मी उद्घाटनाची दोरी तोडली नाही. जगातल्या साऱ्याच गोष्टींचा उपयोग करून घ्याय
आम्ही शिकलो पाहिजे. तमाशाच का त्यातून वगळता?
      विदर्भ साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुजराती-मातृभाषः । आहेत. मराठी साहित्य संमेलनात गुजरातीचा हा प्रवेश. ही
वस्तुस्थितीतली कल्पनाच मोठी गोड आहे. प्रत्येकाने आपल्या भाषेत । प्रेम कायम ठेवन भारतीयता-विश्वात्मकता सुद्धा साधावा, म्हणूनच मी

--------------------------------

हितबोध


सुरुवातीला विश्वसंमेलनाची कल्पना व्यक्त केली. आपण सारे साहित्यिक विश्वाचे साहित्य संमेलन घेण्याचे ठरवू या! अनेक भाषा एकत्र येण्याचे
वितुष्ट न येता त्या परस्पर सहकार्याने वाढू शकतात, हे या विश्वसाहित्य संमेलनाच्या कल्पनेने आपण शिकू या!
           सर्व समाजाला पुढे न्यायला साहित्यिकांचे संमेलन हा एक स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमातून समाजाला जीवनाचे साहित्य, जीवनाचे
सामान मिळेल, जीवनाची सेवा मिळेल, सर्व काही मिळेल, अशी विविधांगी दृष्टी साहित्यिकांची असावी! जनसंख्येवर कार्याचे मोजमाप
होत नाही. काही थोड्या फार साहित्यिकांनी माझे विचार आत्मसात्के ल्यास मला समाधान वाटेल! दुसरा शिकलेलाही माणूस आम्ही उचलून
धरू शकतो; हे कृतीने दाखवून देणारे विदर्भ-साहित्य संघाचे हे संमेलन आमच्यातल्या पहिली-दुसरीच्या किंवा अंगठेछापाच्या लोकांना
साहित्याचा दरवाजा उघडून देऊ चाहते हे पाहून मला आनंद होतो. साहित्य हे जर सर्व समाजाला सामर्थ्य देऊन पुढे नेण्याचे, प्रोत्साहन
देण्याचे साधन आहे, तर आमच्या साहित्य संघाचे वा साहित्य संमेलनाचे। क्षेत्र मुठभरासाठीच मोकळे न राहता समाजव्यापी व्हायला हरकत नाही.
म्हणूनच मला वाटते, साहित्य संघात घोंगडेवालेही आता सदस्य करून घेतले पाहिजेत. त्यांच्यासाठी साहित्याचे दरवाजे, साहित्याचे सारे रस्ते।
मोकळे व्हावे! यारे बारे लहान थोर, भलते याती नारी नर ही भावना । साहित्य संघाने ठेवून आपल्या क्षेत्राचा विस्तार करायला हवा; तरच ते ।
साहित्य आणि तरच तो साहित्यिकांचा संघ!!

--------------------------------

हितबोध