संत तुकाराम

 १२. समाजनिष्ठेचा उत्तम धडा घालून दिला!

ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिले देवायला ।।
जमानाचा एकनाथ। ध्वज उभारिला भागवत ।।
नामा तयाचा किंकर। तेणे केला हा विस्तार ।।
तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।

          मित्रांनो सामान्य समाज हा जेव्हा धर्माची मूळ तत्त्वे विसरून स्वाच्या आहारी जातो आणि समाजातले जबाबदार जाणते लोक जेव्हा त्याच्या स्वभावनांचा फायदा घेऊन आपलेच भले करू चाहतात परंतु त्या अज्ञानी लोकांना योग्य मार्ग दाखवायला तयार नसतात, अशावेळी
समाजात जे कोणी जिवंत हृदयाचे व स्वतंत्र विचारसरणीचे पुरुष असतात. ते निर्भयपणे कार्य करण्यासाठी पुढे धजत असतात .आणि त्यांचेच नाव इतिहासात अजरामर होते.
       
         महाराष्ट्राच्या इतिहासात असा एक काळ येऊन गेला की, ज्यावेळी समाजातील जाणते लोक समाजजागृती व समाजोन्नतिची आपली
जबाबदारी विसरून पांडीत्याच्या आहारी गेले होते; धर्माच्या नावावर जुनाट रुपयांना कवटाळून बसले होते; आणि बहुजन समाजाला योग्य
मार्गदर्शक कोणी नसल्यामुळलाक अज्ञानाच्या अंधारात चाचपडत। होते. दुःख दैन्य भोगीत होते. जीवनाच्या उन्नतीचे तत्त्वज्ञान संस्कृत
भाषेच्या कडी कुलुपात बंद असल्यामुळभलभलत पच जनतेची दिशाभूल करीत होते आणि समाजाची शकले-शकले पटली होती , मानुसकीचा

--------------------------------

हितबोध


धर्म समाजातून लोप पावला होता; आणि कोरडे कर्मकांड व अमानुष रूढीवाद हे समाजाची गळचेपी करीत होते. अशावेळी श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज व नामदेव महाराज वगैरेंनी तत्त्वज्ञानाची गंगा सोप्या मराठी भाषेतून वाहवली आणि पंडितांच्या डोळ्यात अंजन घालून समाजाला योग्य प्रकाश दाखविला. शुद्ध व विशाल धर्मतत्वांनाच भागवतधर्म या नावाने त्या वेळच्या सर्व महापुरुषांनी समाजासमोर मांडले, ज्यात मानवधर्मच प्रकट झालेला होता.

       श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज व एकनाथ महाराज यांच्यानंतर झालेले श्रीसंत तुकाराम महाराज हे भागवत धर्माचे कळस
आहेत असे समजले जाते व ते योग्यच आहे. त्या जिवंत हृदयाच्या महापुरुषाने उभ्या महाराष्ट्रात धर्माच्या नावावर पोट भरणाऱ्या लोकांना
उत्तम समाजनिष्ठा कशी असावी याचा धडा घालून दिला आहे; अभंगाच्या रूपाने तसेच प्रत्यक्ष आचरण करून देखील रूदीरहित खरा धर्म दाखविला आहे. त्यांचा हा महानपणा जगजाहीर असून त्यांच्या
अंत:काळच्या स्थितीबद्दल व वृत्तीबद्दल इतिहासकार साशंक असावेत ही मोठी खेदाची गोष्ट आहे. कोणत्याही व्यक्तीचा इतिहास लोकांपुढे
कायमचा ठेवीत असताना त्यात साशंकता असणे ही त्या काळातील प्रमुख लोकाचे नावाला काळिमा होय.

         संत तुकारामाच्या अभंगांचा ज्यांनी अभ्यास केला असेल त्यांना अजूनही कळून येईल की, तो पुरुष जातीयवादी नसून मानवप्रेमी व होता त्याने विश्वाचा संसार उत्तम व्हावा म्हणूनच आपल्या।
। संसाराच्या चिद्यड्या लोकांच्या निदर्शनास आणल्या आणि आपला सत्य निष्ट पणा केव्हाही
 लोभाला बळी पडू दिला नाही. देवभोळेपणाने ।

--------------------------------

हितबोध


रूढीला मान तुकवून वेदासारखी ज्ञानवस्तू लोकांत दबून राहू दिली नाही व आपला नम्रपणा म्हणजे भित्रेपणा आहे असे मरेपर्यंतही कुणाला
सिद्ध करू दिले नाही. एवढ्या निर्भय व आत्मवान् सत्पुरुषाला जातीच्या नाबाने लपविणे किंवा त्याच्यामागे वैषयिक भावनेचे वेड चिकटविणे हे
ल्या लेखकानी स्वत:च्या अज्ञानाचे प्रदर्शन करण्यासारखेच आहे.
        संत तुकारामासारखे महापुरुष हे त्या त्या काळचे प्रभारी क्रांतिकारक असतात. जिवंत हृदयाचा पुरूष आपल्या काळात कोणत्या मार्गाने क्रांती करतो, हा विषय प्रामुख्याचा नसून, त्याचा परिणाम पाहावयाचा असतो. ती क्रांती टिकणे जा न टिकणे यावर त्याच्या मानाचे स्वरूप असते. संत
सुकारामानी मठस्थापना केली नसताही, उभ्या महाराष्ट्रात घराघरातून । आपण त्यांचे महत्व अजूनही ऐकतो. यावरून त्यांच्या व्यक्तित्वाची ।
कल्पना येऊ शकते.

       प्रश्न एकच आहे, त्यांचे चरित्र वाचणे मोठे की त्यांनी सांगितलेले काढे चालवणे मोठे? त्यांच्या नावावर वादाची रणे माजवूनच त्यांची
अपेशामाहाला सफल करता येईल काय या बाबतीत मात्र आम्ही सागवतहान पडलो आहोत. संतांनी सांगितलेल्या समतावादी ।
भागवतधर्माला जर आम्ही उचलून धरले; संत तुकारामांनी वैष्णवांकरिता किया वारकयांकरिता घालून दिलेला धडा जर अंमलात येऊ लागला
तर भारच्या राजकारणापेक्षा कितीतरी पटींनी लोकात मोठे कार्य होऊ असे मला वाटते. माझी दृष्टी संतचरित्रांकडे याच प्रवृत्तीने वेधली जाते.
  संत तुकारामासारखे संत केवळ ब्रह्मज्ञान सांगण्यासाठी किंवा भक्ती मार्ग उजळण्यासाठीच
आले होते आणि त्यांनी लोकांना दैववादी

--------------------------------

हितबोध


बनवले, असे जे समजतात त्यांना संतजीवनाचा अर्थच कळलेला नसतो.
न सोसवे आता, न धरवे धीर।
पीडिता हे राष्ट्र पाहूनि जग ।।
असे संतांचे अंत:करण राष्ट्राचे दु:ख, दैन्य पाहन तळमळत असते. आणि म्हणूनच राष्ट्रनिर्मितीच्या कामात अशा जिवंत हदयाच्या सांधुसमाजाचा फार मोठा हात असतो. छत्रपति शिवाजी महाराज संत । तुकारामांच्या पुढे विनम्र होत असत, ते उगीच नाही.

       मी म्हणेन, ज्यांनी संताच्या या सत्य तत्त्वांकडे डोळेझाक केली, ज्याना त्याच्या उज्वल परंपरेला मालिन्य आणले किंवा ज्यांनी विकृत स्वरूपात तिची मांडणी केली त्या सर्वांनाही ते पाप भोगावेच लागेल. राष्ट्रावरही त्याचे दुष्परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीत.

      संत तकारामांच्या भागवतधर्मीय शिकवणीचे मुख्य सूत्र एकच आहे


विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म।
भेदाभेद भ्रम, अमंगळ ।। (तुका.)