*:: निवेदन ::*
प्रिय वाचक! वं. महाराजांनी आपल्या वयाच्या सोळाव्यासत्राव्या वर्षी लिहून ठेवलेल्या *आनंदामृत* व *आत्मप्रभाव* या दोन ओवीबद्ध ग्रंथापैकी पहिला ग्रंथ *उद्धवबोधा* सह आपल्या हाती देण्याचा सुयोग आला आहे. १९२७ साली (संवत् १९३८) चिमुर येथील गुरुमूर्ति प्रेमी श्री विठ्ठलराव तुपल्लीवार यांचे घरी वं. महाराजांनी अत्यंत आजारात हा ग्रंथ लिहिला. याच्याच सोळाव्या प्रकरणांत ग्रंथ तात्पर्य सांगतांना ते म्हणतात
स्वानंदाचे अमृत । जे आत्ममंथने होय प्राप्त ।
जयाचेनि जीव प्रशांत । सुखदुःखातील होतसे ।।
ते लाभावे सकळांसी। यावी पात्रता मनबुद्धीसी।
म्हणोनि दाविले बहुसाधनांसी। प्रकृतिभेदा जाणोनि ॥
करोनि सुगम साधन-निश्चय। साधूनि सत्संगाची सोय ।
आत्मरंगी व्हा हो निर्भय । सद्गुरुकृपे-निजभ्यासे ।।
हाचि असे येथिचा सार । करा पावन हा संसार ।
आपण तरोनि व्हा सादर । तारावया सर्व जीवां ॥
या ग्रंथात वं. महाराजांनी मुमुक्षुजनांकरिता अनेक अमोल अशी अनुभूत साधने दिग्दर्शित केली असून विविध प्रकृतीच्या लोकांना त्यांचा उपयोग होईल असा विश्वास वाटतो.
-- प्रकाशन
*अमृत-तुषार*
*मण्डलानिवासी योगमूर्ति श्रीस्वामी सीतारामदास महाराज यांचे।
*परिचायक दोन शब्द*
प्यारे सेवको। श्रीगुरु रामजी के कार्यक्रम देखकर मेरी आत्मा को बहुत ही संतोष हुआ। मेरे राम सब जगह घूम आये। पंजाब, कश्मीर, बंगाल से लेकर ब्रह्मदेशकी सरहद, काशी, मणिपुर, आसाम का पहाडी मुल्क तथा दख्खन हिन्दुस्थान आदि कितनेही प्रदेशो में आजतक भ्रमण हुआ। बडे बडे जपीतपी, ऋषिमहात्मा और प्रकाण्ड पण्डितों को भी देखा। महान निर्भय, चमत्कारी, विद्वान और सामर्थ्यशाली पुरुषो को देखनेका भी मुझे सुअवसर मिला। मगर
श्रीसमर्थ तुकड्यादास महाराजजी सरीखे हमको कहींपर कोई नही मिले। उन्हें मैं सन्त कहुं तो भी मुझे संकोच होता है; महात्मा कहूँ तो भी मेरा दिल नही मानता। उनको मैं अपनी आत्माही कह सकता हूँ। मैं समझता हूँ कि भगवान की एक महान् शक्ति दुनिया मेंमुर्तिमान होकर कार्य कर रही है। श्रीरामजीकी इच्छा से जगत् के कल्याण के लियेही तो इनके जन्मकर्म हैं। भारत का यह सौभाग्य है कि श्रीरामजी की दया से उसे ऐसे महापुरुष का लाभ हुआ।
संदेश -
*मानवी जीवनाचा उत्क्रांति-मार्ग*
अवघाचि संसार सुखाचा करीन।
आनंदे भरीन तिन्ही लोक ।।* - संत तुकाराम
प्रिय वाचकांनो! मनुष्य हा इतर सामान्य जीव कोटीतून उन्नत होत होत या स्थितीत येऊन पोचला आहे. तो ज्या ज्या योनीतून वर आला आहे त्या सर्व योनी या मनुष्ययोनीपेक्षा कितीतरी अविकसित अर्थात्खा लच्या दर्जाच्या आहेत. बुद्धि व इतर महत्वाच्या कार्यशक्तीच्या दृष्टीने अपूर्ण अशा त्या जीवदशेतून उत्क्रांत होत होत आज तो जसा मनुष्यत्वाच्या मार्गावर आला आहे, तसाच तो या स्थानांतूनही वर चढत ।
जाऊन मनुष्यत्वांतून वरिष्ठत्व, साधुत्व नि देवत्व प्राप्त करणार आहे. अशी स्थिती प्राप्त करून घेणे ही गोष्ट काही चमत्कारिक आहे असे नसून, ती त्याची उन्नत होण्याची नैसर्गिक रीतच समजली जाते. ।
ईश्वराने मनुष्यापासून जर काही अपेक्षा केली असेल तर ती हीच की, त्याने ईश्वरत्वापर्यंत आपल्या बुद्धीचा विकास करून *मी तोच आहे* हे ब्रीदवाक्य अनुभवास आणावे; आणि असे एका जन्मात न झाल्यास त्या अनुभवाकरिता जन्मचे जन्म गारद करून-आपली धारणाशक्ती त्या महान् तत्त्वाच्या मार्गात चिकाटीने टिकवून-ते अमरतत्त्व प्राप्त करून घ्यावे. आणि तेच *खरे मनुष्यत्व* मिळविण्याच्या मार्गातील साधुत्व व देवत्व हे प्रमुख टप्पे आहेत, ही। काही मनुष्यत्वाच्या विरुद्ध किंवा विजातीय अशी बाब नव्हे की
जिच्याकरिता मनुष्यत्व हे सोडलेच पाहिजे म्हणजेच साधुत्व किंवा देवत्वमिळते. वास्तविक ह्या गोष्टी वेगळ्या नसून त्या मनुष्याच्या उन्नत कामांच्या पदव्याच आहेत, ज्या मनुष्याला आपल्या उत्क्रांतीच्या मार्गात
मिळत असतात.
जेव्हा मनुष्य खऱ्या ज्ञानाचा व प्रार्थनादी मुख्य साधनांचा अनुभव सक्रियतेने घेऊ लागतो तेव्हा *सर्व जगच देवाने निर्मित आहे असा विचार करून, कोणत्याही कृत्रिम भेदांना विशेष महत्व न देता सत्यालाच अनुसरून वागतो: तात्विकतेशी आपली निती जोडू लागतो व असत्याचा प्रतिकार करू लागतो. आणि हे सगळ करीत असताना
जेव्हा तो *हे सर्व केवळ माझ्याकरिताच नव्हे, तर अखिल जगाच्या धारणेकरिता मी करीत आहे असे मनाने वा मानाने नवे ना आपल्या सद्सद्विवेकबुद्धीने ठरवू लागतो, तेव्हा तो मनुष्य असूनच त्याला साल प्राप्त होत असते. आणि आपल्यापरीने सत्कार्य करीत असता जाता जगात सत्यासत्याच्या निर्णयाचा प्रश्न येऊन पडतो त्यावेळी, अमलामा प्रतिकार समूहाने करण्याची तो जेव्हा तयारी करतो तेव्हा त्यातच त्यान अंगी देवत्व येण्याला सुरवात होते. अर्थात् ही सर्व मनुष्याच्याच दादी अंगे आहेत.
*शक्तिविकास व अंतिम ध्येय*
वास्तविक मनुष्य आपल्या मनुष्यत्वाने खऱ्या देवत्वात समास होण्याच्या तयारीत किंवा प्रयत्नात स्वाभाविकपणेच असतो वो असणे हेच मनुष्यत्वाच्या खऱ्या भूमिकेवर आरूढ होण्याचे लक्षण का असा प्रयत्न करून जेव्हा मनुष्य आपल्यावासना किंबहुना आपले माया त्या आत्मतत्त्वांत विलीन करितो तव्हा तो देवत्वाच्या मूलशनात करितो. नव्हे-स्वत:च तो होऊन बसत असतो. पण व्यक्ति समष्टित्व हे त्याच्या कार्याचे दोन भाग पडत असतात. व्यक्तीश:
आत्मानंदांत मस्त झाल्यावर देखील समष्टीशी-जगाशी समरस होवुन त्याची दुःखे नाहीशी करण्याचा प्रयत्न करणे हा विशेष गुण का निसर्गत:च निर्माण होण्याचा संभव असते.
सामान्य मनुष्यसमाजात एखादा मनुष्य उत्तम काम करणारा असला म्हणजे त्याला मनुष्यसमाजावर आपली सत्ता चालवावयास मिळते.
आनंदामृत
अर्थात् ती आपोआपच वा मतलबाकरिता मिळते असे असून, अनेक लोकांना संघटित करण्याची त्याला बुद्धी प्राप्त झालेली असल्याने व सत्कार्याकरिताच ती मिळत असते. तीच त्याची शक्ती (बेगडी कीर्ति नव्हे) जसजशी वाढत जाते तसतसा तो मनुष्य खऱ्या मनुष्यत्वांत आपला दर्जा मिळवीत असतो; व जेव्हा सर्वच लोक सांभाळण्याची त्यांत शक्ती येते तेव्हा तो अनेक अधिकारी लोकांवरही आपला प्रभाव पाडू शकतो
व आपली उमेद अधिक प्रमाणात ठेवू शकतो. अर्थात् असे करीत करीत मनुष्य स्वतः मनुष्यांचा राजा, मनुष्यांचा गुरु वा संत व मनुष्यांचा देवमनुष्य राहूनच होऊ शकतो. कारण, वास्तविक मनुष्यजीवन हे ईश्वराने निर्माण केलेली प्रगतीची शाळा आहे आणि प्रगतिपथावर उघडलेल्या या शाळेची शेवटची *डिग्री* (पदवी) देवत्व ही आहे.
नवयुगाची मंगल प्रभात
प्रिय मित्रांनो! जगातील सर्व देवता, सर्व अवस्था व सर्व स्थाने तमचीच आहेत. तुम्ही आपल्या धारणाशक्तीने किती मोठे होऊ शकता याचे यथार्थ दिग्दर्शन आतापर्यंतच्या विवेचनांत मी थोडक्यात केलेलेच आहे. मानवी मनाच्या मार्गाने पूर्णत्वाकडे जाण्याचा-उत्क्रांति करून घेण्याचा-वर वर चढण्याचा एकमेव महामंत्र सदा सावधानता (विवेक)
व कार्यतत्परता हाच आहे. या पद्धतीने मार्गक्रमण करीत असता त्यामध्ये राष्ट्रसेवा, देशसेवा, धर्मसेवा इत्यादी गोष्टी सहजासहजीच घडून येतात.
प्रत्येकाची उन्नती हीच राष्ट्रांची उन्नती व हाच विश्वाचा उद्धार आहे. नवयुग निर्माण करावयाचे म्हणजे प्रत्येक व्यक्तीने आपल्या संपूर्ण शक्तीचा उपयोग व सर्वांगीण विकास करण्याचा सतत विचारपूर्वक प्रयत्न करावयास पाहिजे. ज्याप्रमाणे पाण्याचे अनेक बिंदु एके ठिकाणी झाले की पर्वतांना भेदणारी नदी तयार होते. व अनेक नदीचे प्रवाह
एकत्रित झाल्याने त्या स्थितीस समुद्रत्व प्राप्त होते, त्याच प्रमाणेच प्रत्येक मानुस मनुष्यत्वाच्या नात्याने एक झाला की त्यांनाच प्रगल्भ राष्ट्रत्व
आनंदामृत
प्राप्त होते आणि अनेक राष्ट्रे एकाच ध्येयाकरिता उत्साहाने काम करू लागली की त्यालाच प्रभावी व उन्नत देशत्व येते, आणि अशा प्रकारे या सर्व देशाचा ओघ सत्यमार्गाने चालावयास लागला की विराट पुरुषाची सेवा घडू लागून नवे जग किंवा नवयुग (सत्ययुग) निर्माण होते.
मित्रांनो! ही प्रणाली अनुभवण्याकरिता प्रत्येकाला आपापल्यापरीने उन्नत होऊन आपल्यात खरे मनुष्यत्व, शुद्ध त्यागमय साधुत्व व उच्च अर्थाने देवत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करावयास पाहिजे. *माझे करणे माझ्याकरिता नाही, ते राष्ट्राकरिताच आहे.* असे समजण्याला सुरवात
झाली की राष्ट्रात मनुष्यत्व निर्माण होऊ लागलेच म्हणून समजा, आणि अशी सर्वंच माणसे मनुष्यत्वाच्या मार्गाकडे वळली की-*संसार हा स्वर्ग नि त्यात राहणारे मानव देवच आहेत* असे समजण्याला काहीही हरकत राहणार नाही. बिंदु बिंदु साठवून ज्याप्रमाणे विशाल समुद्र बनला आणि
त्यांत रत्ने व मोती याची रास निर्माण झाली त्याप्रमाणेच प्रत्येक उन्नत व्यक्ती मिळून एक स्वर्गतुल्य राष्ट्र निर्माण होईल, आणि या दृष्टीने प्रत्येकाने स्वत:उन्नत होऊन, समष्टीत समरस होण्याचा अवश्य प्रयत्नकेला पाहिजे. प्रत्येक बिंदु ज्याप्रमाणे समुद्रात समरस होण्याकरिता निर्माण झाला आहे. त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती देखील सर्वांतर्यामी व्यापक मूळ स्वरूप जाणून समष्टीशी-विराट पुरुषाशी मिळून जाण्याकरिताच उत्पन्न झाली आहे व त्यातच तिचे सार्थक आणि पूर्णत्व
आहे; खऱ्या आनंदामृताची प्राप्ती होणार आहे. ही गोष्ट लक्षात दान प्रत्येक मनुष्य स्वत:बरोबर समाजास उत्रत करीत पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न करील तर त्यातच सृष्टीचा, धर्माचा, देशाचा मनुष्याचा उद्धार आहे. असे मी समजतो.
- तुकडयादास