*आ नं दा मृ त*
प्रकरण पहिले
श्रीगणेश - शारदा
॥ श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । । ॐनमोजी विनायका । स्वरूपसुंदरा सुखदायका ! सकळ विघ्न निवारका । मूळपुरुषा गजानना ! । । १ । ।
सरळ सोंड नासिक । लंबायमान लवचिक । दंती तेजाची झुळुक । दीप्ति पड़े मुखावरी । । २ । ।
मस्तकी मुकुट रत्नांकित । कंकण मुद्रिका मंडित हस्त । उदरी त्रिवळी शोभत । त्रैलोक्य संपूर्ण भरले असे
। । ३ । ।
तू सिद्धिबुद्धीचा दाता । सकळ विद्यांचा भर्ता । सकळ कलांचा अधिष्ठाता । सबल मायाभंजना ! । । ४ । ।
तूचि सर्व सृष्टीचा कर्ता । मायातीत गुणभरिता ! तू ब्रह्म सनातन अव्यक्ता ! निर्विकारा जगद्वंद्या ! । । ५ । ।
तुझे वर्णू जाता गुण । वेडावला चतुरानन । । वासुकी पावोनिया शीन । जिव्हा चिरोन बैसला ॥ ६ ॥
श्रुतिस्मृतीचे भांडार । उकलिता सापडे सार । ऐसा अगम्य अगोचर । लंबोदर मूर्ति तू । । ७ । ।
आनंदामृत -२-
तुझा ऐसा गुणार्णव । वर्णावया न चले वाव।।
तेथे मी अल्पमति मानव । काय वर्णं शके? ॥८॥
ग्रंथरचनेची आर्त । मने घेतली स्फूर्त ।
निर्विघ्न करी सावचित्त। विनवणी हेचि असे ।।९।।
आता नमूं शारदा सुंदरी। हंसवाहिनी बीणा करी।
शुभ्रवसन, कंचुकी वरी। शोभे सुंदर मौक्तिकांनी ।।१०।।
कपाळी कुंकुमतिलक। वाटे के वळ माणिक ।
नासिकेचे झळक ती मौक्तिक । प्रभा पडे मुखावरी ।।११।।
रत्नखचित किरीट । मस्त की शोभे लखलखाट ।
पदी जोडवे अनुवट। काय वर्ण शोभा ती ।।१२।।
मस्तकी कुरळ केशकलाप। जण दिसे षट्पदांचा गुंफ।
सुगंध देखोनिया अमूप। भ्रमर घालिती रुंजीते ।।१३।।
आदिमाया मूळप्रकृति । चहू वाचांची जन्मदाती।
सकळ विद्यांची स्फूर्ति । देशी भक्तां लागुनी ।।१४ ।।
तरि या ग्रंथाचिये अवधाने । रस भरी वो रसने ।
दास- इच्छा कृपादाने। पूर्ण करी कृपावं ते! ॥१५॥
आता मागणे यापरी। मम रसनेवरी वास करी।
रंग कला नाना कुसरी। ग्रंथामाजी ओवी वो ।।१६।।
यथामति तुझे स्तवन । केले असे अल्प जाण।
प्रेमभरे करी ग्रहण। हीच सेवा दासाची ॥१७॥
आनंदामृत -३-
गंगोदके गंगापूजन। जेवि करिती सज्जन ।
तेवि वागीश्वरी तू असोन । तुझी वाणी तूज ओपिली ॥१८॥
लोकसेवेचे निमित्त करून । मने घेतली धाव जाण।
म्हणोनि आनंदामृत गंथ प्रमाण । निरूपणार्थ घेतला ।।१९।।
महाराज आडकोजी समर्थ । तुकड्यादास तयाचा अंकित ।
सेवूनि तयांचे पदामृत। चरणी लीन जाहला ।।२०।।
इतिश्री आनंदामृत ग्रंथे। वेदान्तसार संमते ।।
तुकड्यादास विरचिते । प्रथम प्रकरण संपूर्णम् ।।१ ॥
---------------------