प्रकरण दहावे* 

         *सद्गुरु-लक्षणे* 

सद्गुरु कैसा करावा हा प्रश्न । याचे सांगतो गा निरूपण।
कवणा गेलिया शरण। मुक्ति लाभे? ॥१।।

कवण सद्गुरु कैसा करावा? कवणापायी भाव ठेवावा? 
की जो तया अन भवा। पाववील ॥

जगी बहुविध संतजन । कित्येक ते पोटाकारण।
कित्येक ध्यानस्थ मौन धरून। बसती पहाडी ।।३।।

कित्येक भजनी संत होती। कित्येक नवविधा पंथ धरिती। कित्येक योगरूपे राहती। जगामाजी॥४॥


आनंदामृत       

कित्येक मचविती ढोंग। कित्येक घेती स्वामी- सोंग।
कित्येक औदासीन्याचा रोग। शिरी धरिती ।।५।

कित्येक दाविती चमत्कार । भूत - भविष्याचे आडंबर।।
कित्येक परोक्षी निर्भर। जगामाजी ॥६॥

कित्येक नारळ दुपट्टा घेती। जनी बहूत शिष्य करिती।
शिष्यास सेवे राबविती। मी गुरु* म्हणवोनिया ।।७।।

कित्येक विदेहरूपे राहती। कित्येक कोणासहि न कळती।
कित्येकांची सिद्ध स्थिति। अबाधित राहे ॥८॥

गुरु शोधावा यामधून । सत्य मत तयाचे जाण ।
नित्यानित्य-विवेक करून । पाहील जो सत्यवस्तु ॥९॥

न घे जो शिष्याची सेवा। शिष्य गुरुत्वे मानावा ।
सत्य - स्वरूपी मेळवावा। ऐसे मत ॥१०॥

शमदमादि साधने । ठेवियली स्वाधीन जेणे।
स्वरूपावाचून अन्य नेणे। सोहं तोचि सद्गुरु ॥११॥

ऐसा करावा सद्गुरुराव । तेथे वसावा शुद्ध भाव ।
करील जो पार नाव। सत् शिष्याची ॥१२॥

जी जी निघेल परमार्थ शंका। सदगुरु फेडोल ती कुशंका।
सत् शिष्याचा मान राखा। असे म्हणोनिया ॥१३॥

ज्याचा असेल शुध्दभाव । तया नलगे काही उपाव ।
कोणताहि फळे त्या गुरुदेव । सुदृढतेने ॥१४॥


आनंदामृत       

शद्ध भाव व्हावयासी। जावे लागे संतापाशी।
या कारणेच मानसी। गुरु भजावा ।।१५।।

जयाची फिटे अज्ञानदृष्टि । लागे चित्तशद्धीचिये पाठी I तये स्वरूप-ज्ञानासाठी। सद्गुरु करावा ।।१६ ।।

अद्वैत करील जो वृत्ति । षविकारांतुनि फिरवी मति 
सदा नामस्मरण-पंक्ति । घोषवी जो ॥१७ ।।

ऐसा काढावा शोधून । सिद्धस्थिति ज्याची जाण ।
तया साष्टांगे नमन। करावे वेगी ।।१८ ।।

करावे आज्ञेचे पालन। वेचूनि घ्यावे ज्ञानकण ।
तत्त्वनिष्ठेने सेवा पूर्ण । शंका-समाधान निश्चये ।।१९।।

यास्तव शिष्य कैसा असावा? जेणे परमार्थ साधावा।
जयास मोक्षचि व्हावा । यमनियमी बरबा तोचि तो ॥२०॥

अपरोक्ष नाही मज ज्ञान । मी तो बालक अज्ञान ।
परी सद्गुरुकृपे करून । वदलो असे ॥२१॥

इतिश्री आनंदामृत ग्रंथे। वेदान्तसार संमते ।
तुकड्यादास विरचिते । दशम प्रकरण संपूर्णम् ।।११।।