अध्याय दुसरा
।। श्रीगुरुदेवाय नमः ।।
जय जयाजी निपुणात्मा ! भक्तकाम कल्पद्रुमा ! ।
धावसी दासाचिये कामा । नाम घेता सद्गुरु ! ।। १ ।।
मी तो अज्ञान पामर । न जाणे ज्ञानाचा विचार ।
म्हणोनि जोडोनि द्वय कर । शरण आलो स्वामिया! ।। २।।
कैसा पावेन तुझिया स्वरुपा । नेणेवेचि पंथ सोपा ।
म्हणोनि काळाचे आटोपा। बुडालो सर्वस्वी गुरुमाते! ।। ३ ।।
मी पण देहाभिमानी झाले। माझे करिता व्यर्थ गेले ।
एकाएकी चोर भरले । देहामाजी न सांगवे ।।१५।।
कैसी होईल माझी स्थिती ? काय सांगू अवगुण किती।
व्यर्थ जाईल देहस्थिती । भोगावया जीव हा ।।१६।।
किती सांगावे सांगणे ? पाठी घेतली अवगुणे ।
संसारहेतू तुटे जेणे । ऐसे करा स्वामिया ! ।।१७।।
आता फार काय बोलावे । समर्थाला सर्व ठावे।
दासे दासत्वपण राखावे । ऐसे करी माते वो ! ।।१८।।
सोडूनिया ऐसी माता । इतरा कवणा वंदू आता ? ।
जयजयाजी सद्गुरुनाथा ! पुरवी काजा येवोनिया ।।१९।।
सोडोनिया ज्ञातेपण । सद्-भावे आलो शरण।
दासा दावोनि भवतरण । पार लावी नौकाही ।।२०।।
तोडी द्वैताचा संबंध । मिटवी वैखरीचा वाद।
भरवी आनंद-संवाद । हृदयी माझ्या ।।२१।।
तव रसना अमृत गोमटी । ती या वाचे पूर रोटी ।
भरवी मन हृदय-संपुष्टी । येवोनिया सद्गुरो ! ।।२२।।
देखोनिया शिष्य-भाव । प्रसन्न झाला सद्गुरुराव ।
पुढिलिये प्रकरणी ठेव । दावियेली सद्-भावे ।।२३।।
इतिश्री आत्मप्रभाव ग्रंथ । वेदान्तसार संमत ।
तुकड्यादास विरचित । द्वितीय अध्याय संपूर्ण ।।२४।।
0 सद्गुरुनाथ महाराज की जय ! 0
हा तव अज्ञ पुत्र बापुडा । अंधकारी बुडाला गाढा ।
काढावयासी हा पवाड़ा । चरणी वदिंतो सद्-भावे ।।४।।
सर्वचि माझे ऐसे वाटे । भोगपणी येती काटे ।
म्हणोनि हा बहु ओक्षटे । भोगतसे स्वामिया ! ।।५।।
जी जी भावे करणी । ती ती होतसे शिर-कापणी ।
ऐसाचि हा अज्ञानी । नाना दु:खी बुडाला ।।६।।
मायापाशी गुंडाळला । आळसी झाला उपासनेला ।
न दिसे मार्ग दुजा मनाला । उद्धरावया जीव हा ।।७।।
कळेना काय केवी करावे? कोणा धरूनी काय हरावे ?।
कैसे कृत्य करी घ्यावे ? तुटावया भवपाश ।।८।।
कैसा नेम मी धरावा ? जेणे भवाब्धी हा तगवा ।
शुद्ध प्रेमा हृदयी भरावा । निजानंद पाहावया ।।९।।
बहु पंथ मते फार । न कळे मतांचा विचार ।
न मिळे मार्ग सविस्तर । ऐक्यरुप व्हावया ।।१०।।
मृगजळ सत्यचि वाटे । वाटते पण नवचे, आटे ।
चाखू जाता हदय फाटे । न फिटे भ्रांति-पडळ ।।११।।
माते! तूते न सांगवे । ऐसे अवगुण धरिले जीवे ।
पुन्हा पुन्हा वृत्ती धावे । असत्याकडे ।।१२।।
जडी आसक्ती न सुटे । मन चंचल भटके वाटे ।
स्थिर क्षण न एकटे । निश्चली ते राहात ।।१३।।
पंचविषयी रतले बरवे । जडले सर्वस्वी स्वभावे।
कसे तुटेल न आठवे । मज लागूनि सद्गुरो ! ।।१४।।