आत्मप्रभाव
अध्याय सहावा
।। श्रीगुरुदेवाय नमः ।।
बा रे तू कर्म की कर्माचा कर्ता? लटकीच धरोनिया वार्ता ।
घेती देहाभिमाने माथा । हाचि अभाव जाणावा ।।१।।
कार्यकारण भूती ओळगे । अविद्या तो धावे मागे ।
ते तु घेसी वाडगे । अंगी लावोन सर्वथा ।।२।।
कारण जडबुद्धी उठवी । भूते करिती कार्ये बरवी ।
आवरण घेऊनि तू गोसावी । म्हणसी माझे सर्व हे ।।३।।
हा तो चिदाभासाचा खेळ । जैसे सूर्य योगे मृगजळ ।
वाटते परी मिथ्या सकळ । तू तो ऐसा नव्हेसी ।।४।।
कार्य-कारण-कर्तेपण । हे तो अविद्यात्मक जाण ।
अससी अलिप्त तू पूर्ण । अपूर्ण नव्हे सर्वथा ।।५।।
पूर्णरूपी अपूर्णाची मात । कैसी शोभेल समस्त? ।
पूर्ण ते अपूर्ण न होत । ऐसा वाद श्रुतीचा ।।६।।
कर्म-प्रारब्धाची गणना । नसे तव स्वरूपी जाणा ।
मूळ स्फुरणाच्याही पार प्रमाणा । रूप तुझे जाणपा ।। ७।।
कर्मस्फूर्ति कोठोनि झाली? अंत:करणे उभारिली ।
तयाच्याही पार राहिली । सीमा तुझ्या स्वरूपाची ।।८।।
प्रथम पुरुष-प्रकृती जाण । तयापासूनि त्रिगुण ।
तुज तयांचे जाणतेपण । दृश्य नव्हसी सर्वथा ।।९।।


आत्मप्रभाव
रतिरेताचिये पासूनि । अन्नमयाची उभारणी ।
होण्याजाण्यावरी स्वमनी । अन्नमय असेना ।।२०।।
म्हणोनिया अन्नमय । तू तो नव्हेसी सव्यय ।
त्याते नित्य निरामय । म्हणो नये कदापि ।।२१।।
आपादमस्तकी जो पवन । प्राणमय नाम जाण ।
जडत्व याचे प्रमाण । नव्हे जड तू तैसा ।।२२।।
विकारा भावे म्हणे मी करी । सकळ माझे ऐसे धरी ।
तयास मनोमय निर्धारी । कोश म्हणती ज्ञाते ।।२३।।
तया कोशाचेनि आधारे। कामक्रोधादि बळकट बारे ।
ते क्रोधादि विष वारे । तू तो नव्हेसि जाणपा ।।२४।।
बुद्धी जड चिदाभासी । एकात राही दुसऱ्या उदासी ।
विज्ञानमय कोश तयासी । म्हणती ज्ञाते ।।२५।।
बुद्धी तव प्रगटे आणि आटे । लीन होय अधिक उठे ।
म्हणोनि सत्यत्वी गोमटे । चारी कोश नव्हेती ।।२६।।
पाचवा तो आनंदमय । निद्रारूप निरामय ।
पुण्यकर्मे सुखी होय । सरलिया उदासी ।।२७।।
तयाचीही गणना करिसी । म्हणोनि तू तो नव्हेसी ।
तया उबग प्रळयासी । लाग पडे सर्वथा ।।२८।।
सर्व कोशाते तू जाणसी । म्हणोनि कोश तू नव्हेसी ।
तू तो नव्हेचि गा विनाशी । अविनाशी सर्वदा ।।२९।।
तव शिष्ये प्रश्न केला । स्वामी! ही इंद्रिये कळवा मला ।
कर्मेंद्रिय-ज्ञानंद्रिय संग भला । रूपा माझे स्वामिया! ।।३०।।


आत्मप्रभाव
तुज न साजे दृश्यपण । तू तो अदृश्य द्रष्टा जाण ।
जाणावया साक्षी पूर्ण । जाणपण भिन्न न लागे ।।१०।।
अविद्याभास लटके भान । हे तों तुझेचि आवरण ।
तया ढोंगी गटात जावोन । फससी केवी बापारे! ।।११।।
अवस्था ज्या चार भूती । जागृती स्वप्न ती सुषृप्ती ।
चौथी सुर्या असे जाणती । तुझिया रूपी आवरणे ।।१२।।
प्रथम जागृती लटके भान । मायारूपी मृगजळ पूर्ण ।
ते तो जाण अज्ञान । तू तो नित्य सर्वज्ञ ।।१३।।
स्वप्नावस्था जव प्रगटे । जागृतीचे भान आटे ।
तव तू साक्षित्वरूपे गोमटे । जाणसी स्वप्नखेळासी ।।१४।।
लाधलिया सुषुप्ती पूर्ण । नवचे स्वप्नाचेही भान ।
तई तू साक्षिरूपे जाण । अभावा पाहसी आत्मत्वे ।।१५।।
सुषुप्ती गेलिया प्रगटे तुर्या । तिन्ही अवसथाते जाणे रया ।
सुर्येचा तो द्वैती पय्या । तयाचाही तू साक्षी ।।१६।।
पाहसी चारी अवस्थाला । तव तू अवस्था केसा झाला? ।
दृश्य म्हणवोनि आपुल्याला । द्रष्टेपणा सोडिया ।।१७।।
जरी म्हणशी पंचकोष । मजसवे राहती रात्रंदिस ।
तरी तयांचाही भास । कळवू आदरे सर्वथा ।।१८।।
अन्नमय प्राणमय । मनोमय, विज्ञानमय ।
पाचवा तो आनंदमय । पंचकोश जाणपा ।।१९।।


आत्मप्रभाव
तव बोले करुणाकरू । पुढिलिये निरूपणी अवसरू ।
कर्मेद्रिंय-ज्ञानेद्रिंय-निर्धारू । तू की तयासी जाणता? ।।३१।।
इति श्री वेदान्तसारसंमत । दास तुकड्या विरचित।
आत्मप्रभाव ग्रथं । सहावा अध्याय कथियेला ।।३२।।
     सद्गुरुनाथ महाराज की जय